युरोफायटर टायफून
युरोफायटर टायफून ही विमाने जर्मनी आणि इंग्लंड यांनी एकत्रितरित्या बनवलेली आहेत.
युरोफायटर टायफून | |
---|---|
उडणारे एक युरोफायटर टायफून विमान | |
प्रकार | हलके लढाऊ विमान |
उत्पादक देश | जर्मनी आणि इंग्लंड यांनी एकत्रितरित्या. |
उत्पादक | युरोफायटर जीएमबीएच |
पहिले उड्डाण | २७ मार्च १९९४ |
समावेश | ४ ऑगस्ट २००३ |
सद्यस्थिती | सेवेत आहे |
मुख्य उपभोक्ता | रॉयल वायुसेना जर्मन वायुसेना इटालियन वायुसेना स्पॅनिश वायुसेना इतर देश |
उत्पादन काळ | १९९४ - आज |
उत्पादित संख्या | ४८८ (नोव्हेंबर २०१६) |
प्रति एककी किंमत | €९ करोड (सिस्टीम किंमत) £१२.५ करोड (निर्मिती आणि विकास मूल्य मिळून) |
इतिहास
संपादनहा प्रकल्प सुमारे इ.स. १९७१ नंतर सुरू झाला इ.स. १९९०च्या दशकात जर्मनीकडे पैसे नसल्याने काहीसा रेंगाळला होता. परंतु, पुढे २००२ नंतर ऑस्ट्रिया, स्पेन व इतर देशांनी या विमानांच्या खरेदीत रस घेतल्याने प्रकल्प परत रुळावर आला. हे विमान अनेक विमान कंपन्यांना एकत्र आणून बनवलेले आहे.
स्वरूप
संपादनकार्बन फायबर आणि इतर साहित्याद्वारे हे हलके लढाऊ विमान बनवले जाते. नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज कॉकपीट आणि एकापेक्षा अधिक धोक्यांकडे एकावेळी लक्ष पुरवण्याची क्षमता या विमानात आहे. सुखोई एम के आय जसे हवेतल्या हवेत निरनिराळ्या प्रकारे वळवता येते; तसेच युरोफायटर टायफून विमान हवेमध्ये अतिशय सुळसुळीतपणे हाताळता येते, हा याचा मोठा गूण मानला जातो. तसेच रडारवरून आपले अस्तित्त्व कमी करण्यासाठी असलेले तंत्रज्ञान हे सुखोईपेक्षाही प्रगत असल्याचा दावा केला जातो.
जुळणी
संपादनतंत्रज्ञान
संपादनयुद्धातील वापर
संपादनखरेदी व पुरवठा
संपादनयात अनेक देशांच्या कंपन्या एकत्र झाल्याने त्यांच्याही सुट्या भागांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातली सगळ्यात जास्त विमाने इंग्लंड आणि जर्मनीकडेच आहेत. ऑस्ट्रिया, स्पेन आणि सौदी अरेबियाने काही विमाने खरेदी केली आहेत.
भारतासाठी उपयुक्तता
संपादनभारतासाठी ही चांगली संधी असण्याची प्रमुख कारणे म्हणजे यातील संशोधन कार्यात सहभागी होण्याचे निमंत्रण आहे. याचा अर्थ आधी संशोधित साहित्य भारताला मिळाले तरी पुढील संशोधनासाठी पैसेही गुंतवावे लागतील. मात्र याच वेळी या विमानांचे उत्पादन भारतात करण्याची युरोफायटर टायफून कंपन्यांची तयारी आहे. त्यामुळे भारतात रोजगार निर्मितीला संधी आहे.
वैशिष्ट्ये
संपादन- चालक दल : १ जागा
- लांबी : १५.९६ मी ( ५२.४ फुट)
- पंखांची लांबी : १०.९५ मीटर ( ३५.९ फुट)
- उंची : ५.२८ मी (१७.३ फुट)
- पंखांचे क्षेत्रफ़ळ : ५१.२ चौरस मी( ५५१ चौरस फुट)
- निव्वळ वजन : ११,००० कि.ग्रॅ.
- सर्व भारासहित वजन : १६,००० कि.ग्रॅ.
- कमाल वजन क्षमता : २३,५०० किलो
- आंतरिक इंधन क्षमता : ५,००० कि.ग्रॅ.
- कमाल वेगः
- अति उंचीवर : २,४९५ किमी/तास, माख २
- समुद्रसपाटीजवळ : १,५३० किमी/तास, माख १.२५
- पल्ला : >३,७९० किमी
- प्रभाव क्षेत्र : १,३८९ किमी
- बंदुक : २७ मिमी, १५० गोळ्या
- उडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १९,८१२ मी
अपघात
संपादनहे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- युरोफायटर टायफून अधिकृत आंतरजालीय दुवा (भाषा:इंग्रजी)
- युरोफायटर टायफून ऑस्ट्रियाच्या हवाईदलाकडे (भाषा:ऑस्ट्रियन)
- युरोफायटर टायफून जर्मन हवाईदलाकडे (भाषा:जर्मन)
- युरोफायटर टायफून इंग्लंड हवाई दलात (भाषा:इंग्रजी)
- युरोफायटर टायफून विषयी इंग्लंड हवाई दलाच्या मासिकातील लेख Eurofighter FGR4 (भाषा:इंग्रजी)
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती एप्रिल १, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- युरोफायटर टायफून अनधिकृत आंतरजालीय दुवा (भाषा:इंग्रजी)