द्रायुगतिशास्त्रामध्ये एखाद्या बिंदूला प्रवाहाच्या वेगाचे स्थानिक माध्यमातील आवाजाच्या वेगाशी गुणोत्तर म्हणजे माख क्रमांक (M) होय. माख क्रमांक ही मितिहीन राशी आहे.

जिथे:

M = माख क्रमांक, (प्रवाह वेग/ध्वनिवेग)[]
u = प्रवाहाची स्थानिक गति, आणि
c = माध्यमातील आवाजाचा वेग.

व्याख्येनुसार, माख १ म्हणजे आवाजाचा वेग. माख ०.६५ म्हणजे आवाजाच्या वेगाच्या ६५% वेग (सबसॉनिक), आणि माख १.३५ म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा ३५% जास्त वेग (सुपरसॉनिक).

माख क्रमांकाचे वर्गीकरण

संपादन
वर्ग माख नॉट मैल/तास किमी/तास मीटर/सेकंद सामान्य वैशिष्ट्ये
सबसॉनिक <०.८ <५३० <६०९ <९८० <२७२ सडपातळ पंखांची प्रोपेलरने चालवलेली टर्बोफॅन विमाने.
ट्रान्सॉनिक ०.८-१.२ ५३०-७९४ ६०९-९१४ ९८०-१,४७० २७३-४०९ प्रवासी विमाने, काही लढाऊ विमाने.
सुपरसॉनिक १.२–५.० ७९४-३,३०८ ९१५-३,८०६ १,४७०–६,१२६ ४१०–१,७०२ आधुनिक लढाऊ विमाने, एफ-१०४ स्टारफायटर, एसआर-७१ ब्लॅकबर्ड आणि कॉंकॉर्डे.
हायपरसॉनिक ५.०–१०.० ३,३०८-६,६१५ ३,८०६–७,६८० ६,१२६–१२,२५१ १,७०२–३,४०३ ६.७२ माख वेगाचे एक्स-१५ सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. बोइंग एक्स-५१
उच्च-हायपरसॉनिक १०.०–२५.० ६,६१५-१६,५३७ ७,६८०–१९,०३१ १२,२५१–३०,६२६ ३,४०३–८,५०८ माख ९.६ एवढा सर्वोच्च वेग असणारे नासा एक्स-४३ सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे.
पुनर्प्रवेश वेग >२५.० >१६,५३७ >१९,०३१ >३०,६२६ >८,५०८ स्पेस शटल

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ निमकर, द. पां.; करंदीकर, शं. वा. झोत प्रचालन. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. 21 फेब्रुवारी 2017 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: authors list (link)