मलाक्का

(मालाक्का या पानावरून पुनर्निर्देशित)

मलाक्का (भासा मलेशिया: Melaka; जावी लिपी: جوهر ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिण भागात वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मलाक्का पर्लिसपेनांग यांच्या पाठोपाठ तिसरे छोटे राज्य आहे. मलाक्क्याच्या उत्तरेस नगरी संबिलान, तर दक्षिणेस जोहोर वसले आहे. बांदाराया मलाका येथे मलाक्क्याची राजधानी असून ७ जुलै, २००८ रोजी या शहरास युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला.

मलाक्का
Melaka
मलेशियाचे राज्य
ध्वज

मलाक्काचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
मलाक्काचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी बांदाराया मलाका
क्षेत्रफळ १,६५० चौ. किमी (६४० चौ. मैल)
लोकसंख्या ७,७०,०००
घनता ४६६.७ /चौ. किमी (१,२०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-04
संकेतस्थळ मलाक्का.ऑर्ग

मलाक्का मलेशियाच्या इतिहासातील सर्वाधिक जुन्या सल्तनतींपैकी एक आहे. मात्र इ.स. १५११ साली पोर्तुगीजांनी मलाक्क्याची सल्तनत जिंकून घेतल्यावर राजेशाही संपुष्टात आली. तेव्हापासून आजतागायत सुलतानाऐवजी यांग दि-पर्तुआ नगरी, अर्थात राज्यपाल, हा शासनप्रमुख या नात्याने राज्यकारभार सांभाळतो.

भूगोल संपादन

१,९५० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेले मलाक्का मलय द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशा किनाऱ्यावर वसले आहे. मलाक्का व इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांदरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे. द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दोन तृतीयांश अंतरावर वसलेले मलाक्का पूर्वीपासून मलाक्क्याच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील व्यूहात्मक महत्त्वाचे केंद्र आहे.

पुलाउ बसार, पुलाउ उपे ही बेटे व तांजुंग तुआन नावाचे एक्स्क्लेव्ह मलाक्क्याच्या सरहद्दीतच मोडतात.

प्रशासकीय विभाग संपादन

प्रशासकीय दृष्ट्या मलाक्क्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन होते :

  1. आलोर गजा जिल्हा
  2. मलाक्का तंगा जिल्हा (मध्यवर्ती मलाक्का)
  3. जासीन जिल्हा

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत