नगरी संबिलान
नगरी संबिलान (भासा मलेशिया: Negeri Sembilan; चिनी: 森美兰 ; जावी लिपी: نڬري سمبيلن ; सन्मान्य नाव: दारुल खुसुस (खासा प्रदेश) ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. नगरी संबिलानाच्या उत्तरेस सलांगोर व क्वालालंपूर, पूर्वेस पाहांग, तर दक्षिणेस मलाक्का व जोहोर ही राज्ये आहेत. सरेंबान येथे नगरी संबिलानाची प्रशासकीय राजधानी असून क्वाला पिला जिल्ह्यातील सरी मनांती येथे शाही राजधानी आहे.
नगरी संबिलान Negeri Sembilan 森美兰 نڬري سمبيلن | ||
मलेशियाचे राज्य | ||
| ||
नगरी संबिलानचे मलेशिया देशामधील स्थान | ||
देश | मलेशिया | |
राजधानी | सरेंबान | |
क्षेत्रफळ | ६,६४५ चौ. किमी (२,५६६ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १०,१४,००० | |
घनता | १५२.६ /चौ. किमी (३९५ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | MY-05 | |
संकेतस्थळ | http://www.ns.gov.my/ |
नगरी संबिलान हे नाव सध्याच्या इंडोनेशियातील पश्चिम सुमात्र्यातून आलेल्या मिनांकाबाऊ लोकांनी या परिसरात सर्वप्रथम वसवलेल्या नऊ नगरांवरून पडले, असे मानले जाते. येथील स्थापत्यावर व मलय भाषेच्या बोलीवर अजूनही मिनांकाबाऊ अस्तित्वाच्या खुणा आढळतात.
मलेशियाच्या संघातील अन्य राज्यांहून नगरी संबिलानाचे राजतंत्र आगळे आहे - अन्य राज्यांप्रमाणे येथे वंशपरंपरागत राजेशाही नसून सुंगई उजोंग, जलेबू, जोहोल, रंबाऊ या चार जिल्ह्यांच्या उंदांगांमधून, म्हणजे संस्थानिकांमधून, नगरी संबिलानाचा यांग दि-पर्तुआन बसार, म्हणजे अध्यक्ष, निवडला जातो.
बाह्य दुवे
संपादन- नगरी संबिलान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (भासा मलेशिया मजकूर)
- नगरी संबिलान पर्यटनाविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)