मणिपूर विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या मणिपूर राज्यातील एक विधानसभा निवडणुक आहे. ४ मार्च व ८ मार्च ह्या दिवशी २ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये मणिपूर विधानसभेमधील सर्व ६० जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. काँग्रेस पक्षाचे ओक्राम इबोबी सिंग गेली १५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर होते.
मणिपूर विधानसभा निवडणूक, २०१७
|
२०१२ ←
|
४ मार्च - ८ मार्च, २०१७
|
→ २०२२
|
|
|
|
११ मार्च २०१७ रोजी झालेल्या मतगणनेत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागांवर तर भारतीय जनता पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला. भाजपने स्थानिक पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले व एन. बिरेन सिंह राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. गोव्याखालोखाल दुसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष असून देखील सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आले. ईशान्य भारतामध्ये आसाम व अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूरमध्ये आपली सरकारे स्थापन करून भाजपने ह्या भागात आपली मुळे घट्ट केली.