एन. बीरेन सिंह
नोंगथोंबाम बीरेन सिंह ( १ जानेवारी १९६१) हे भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
एन. बीरेन सिंह | |
विद्यमान | |
पदग्रहण १५ मार्च २०१७ | |
मागील | ओक्राम इबोबी सिंग |
---|---|
मणिपूर विधानसभा सदस्य
| |
विद्यमान | |
पदग्रहण २००२ | |
मतदारसंघ | हाइनगांग |
जन्म | १ जानेवारी, १९६१ इम्फाल, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
२००२ साली सक्रिय राजकारणात प्रवेश करून बीरेन सिंह मणिपूर विधानसभेवर निवडून आले. २००४ साली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य बनले व २०१६ पर्यंत कॉम्ग्रेस पक्षात राहिले. ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग ह्यांच्यासोबतच्या मतभेदावरून काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१७ मणिपूर विधानसभा निवडणूकीमध्ये बीरेन सिंह ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा पराभव केला व मणिपूर राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले. १५ मार्च २०१७ रोजी बीरेन सिंह ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०२२ मणिपूर विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ६० पैकी ३२ जागांवर विजय मिळवून सत्ता राखली व बिरेन सिंह मुख्यमंत्रीपदावर राहिले.