भूपालपल्ली (Bhupalpally) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जयशंकर भूपालपल्ली (आचार्य जयशंकर) जिल्हा हा पूर्वीचा वरंगल जिल्हा करीमनगर जिल्ह्याच्या काही भागांच्या जोडणीसह तयार करण्यात आला आहे. ११-१०-२०१६ रोजी स्थापन झालेल्या जिल्ह्याचे नाव तेलंगणाचे विचारवंत, प्रा. के. जयशंकर सर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[२] हे राज्याची राजधानी हैदराबादपासून सुमारे २१२.३ किलोमीटर (१३१.९ मैल), वरंगलपासून ६७.४ किलोमीटर (४१.८८ मैल) आणि रामगुंडमपासून ७७.२ किलोमीटर (४८ मैल) अंतरावर आहे.

  ?भूपालपल्ली
भूपालपल्ली
तेलुगू : భూపాలపల్లి
तेलंगणा • भारत
—  शहर  —
Map

१८° २५′ ५३.०४″ N, ७९° ५१′ ३७.८″ E

भूपालपल्ली is located in तेलंगणा
भूपालपल्ली
भूपालपल्ली
भूपालपल्लीचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°25′53.04″N 79°51′37.8″E / 18.4314000°N 79.860500°E / 18.4314000; 79.860500

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
५२.६२ चौ. किमी
• २०२ मी
हवामान
वर्षाव

• १,०८५.९ मिमी (४२.७५ इंच)
प्रांत तेलंगणा
जिल्हा जयशंकर भूपालपल्ली जिल्हा
लोकसंख्या
घनता
साक्षरता
४२,३८७
• ८०६/किमी
७६.५६ %
भाषा तेलुगू
संसदीय मतदारसंघ वरंगल
विधानसभा मतदारसंघ भूपालपल्ली
स्थानिक प्रशासकीय संस्था नगर पंचायत, भूपालपल्ली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 506169
• +०८७१५
• TS–25[१]

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १०,४३८ कुटुंबांसह ४२,३८७ होती. एकूण लोकसंख्येमध्ये २१,८१० पुरुष आणि २०,५७७ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९४३ स्त्रिया. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ३५६८ आहे जी भूपालपल्लेच्या एकूण लोकसंख्येच्या ८.४२% आहे. सरासरी साक्षरता दर ७६.५६% होता.

९२.८६% लोक हिंदू आणि (५.५२%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.५६%), शीख (०.०१%), बौद्ध (०.००%), जैन (०.०२%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.०४%) यांचा समावेश होतो.[३][४]

तेलुगू भूपालपल्लीमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

भुगोल संपादन

भूपालपल्ली हे उत्तर अक्षांशाच्या १८°२५′५३.०४″N आणि पूर्व रेखांशाच्या ७९°५१′३७.८″E वर स्थित आहे. भुवनगिरीची सरासरी उंची २०२ मीटर आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०८५.९ मिलिमीटर (४२.७५ इंच) आहे.[५][६]

प्रशासन संपादन

भूपालपल्ली नगर पंचायत २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली. नागरी संस्थेचे कार्यक्षेत्र ५२.६२ किमी २ (२०.३२ चौरस मैल) क्षेत्रफळावर पसरलेले आहे.[७] भूपालपल्ली हे शहर भुवनगिरी विधानसभा मतदारसंघात येते. जो वारंगल लोकसभा मतदारसंघात मोडतो.

वाहतूक संपादन

भूपालपल्ली येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते. राष्ट्रीय महामार्ग ३५३सी हा भूपालपल्ली शहरातून जातो.

हे देखाल पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ https://www.transport.telangana.gov.in/html/registration-districtcodes.html
  2. ^ "Jayashankar Bhupalpally District | Welcome to Jayashankar Bhupalpally District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-02-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2016-06-15. 2022-02-08 रोजी पाहिले.
  4. ^ "Bhupalpalle Census Town City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-08 रोजी पाहिले.
  5. ^ "Bhupalpally topographic map, elevation, relief". topographic-map.com (इंग्रजी भाषेत). 2022-02-08 रोजी पाहिले.
  6. ^ ":: Rainfall Integration::". www.tsdps.telangana.gov.in. 2022-02-08 रोजी पाहिले.
  7. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. Archived from the original (PDF) on 2016-06-15. 2022-02-08 रोजी पाहिले.