ब्रत्तान्य प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ब्रत्तान्य (ब्रेतॉन: Breizh, फ्रेंच: Bretagne, fr-Bretagne.ogg उच्चार , इंग्लिश लेखनभेदः ब्रिटनी) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात बिस्केचा उपसागरइंग्लिश खाडी ह्यांच्या मधील एका द्वीपकल्पावर वसला असून तो ऐतिहासिक ब्रत्तान्य प्रांताचा व भौगोलिक प्रदेशाचा ८० टक्के व्यापतो. ह्या ऐतिहासिक प्रदेशाचा उर्वरित २० टक्के भाग सध्या पेई दाला लोआर प्रदेशामधील लावार-अतलांतिक विभागात मोडतो. ऱ्हेन ही ब्रत्तान्य प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ब्रेस्त हे येथील एक प्रमुख शहर आहे.

ब्रत्तान्य
Bretagne
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ब्रत्तान्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ब्रत्तान्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी ऱ्हेन
क्षेत्रफळ २७,२०८ चौ. किमी (१०,५०५ चौ. मैल)
लोकसंख्या ३४,३३,१५५
घनता १३३ /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-BRE
संकेतस्थळ bretagne.bzh

ब्रिटनी हे ह्या प्रदेशाचे नाव पाचव्या ते सातव्या शतकांदरम्यान ग्रेट ब्रिटनमधून येथे स्थलांतरित झालेल्या लोकांमुळे पडले आहे.


विभाग

संपादन

ब्रत्तान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: