बूर्गान्य

(बुर्गुंडी या पानावरून पुनर्निर्देशित)

बूर्गान्य (फ्रेंच: Fr-Bourgogne.ogg Bourgogne ; इंग्लिश लेखनभेदः Burgundy, बरजंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागात स्थित असून तो ऐतिहासिक बरजंडी प्रांताचा एक भाग आहे. कृषीप्रधान व ग्रामीण स्वरूपाच्या बूर्गान्यमध्ये तुरळक लोकवस्ती आहे. येथील लोकसंख्या घटत चालली असून सरासरी वय वाढते आहे. येथील बरजंडी वाईन जगप्रसिद्ध आहे.

बूर्गान्य
Bourgogne
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

बूर्गान्यचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बूर्गान्यचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी दिजॉं
क्षेत्रफळ ३१,५८२ चौ. किमी (१२,१९४ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३८,५८८
घनता ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-D
संकेतस्थळ bourgogne.fr
बूर्गान्यचा नकाशा

२०१६ साली बूर्गान्य व फ्रांश-कोंते हे दोन प्रदेश एकत्रित करून बूर्गान्य-फ्रांश-कोंते ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

इतिहास

संपादन

इ.स. ४११ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यावर जर्मनीतील बरजंडियन्स ह्या नावाने ओळखली जाणारी जमात या प्रदेशात आली व त्यांनी येथे आपले राज्य वसवले. त्यांनीच या प्रदेशाला त्याचे नाव दिले. यानंतरच्या काळात आपले राज्य टिकवण्यासाठी त्यांना रोमन व हूण सैन्याशी सतत झुंजावे लागले. इ.स. ९००च्या सुमारास याचे तीन छोट्या राज्यांत विभाजन झाले - लेक जिनिव्हाजवळील अपर बरजंडी, प्रोव्हांस जवळील लोअर बरजंडी व फ्रान्समधील डची ऑफ बरजंडी. अपर व लोअर बरजंडी इ.स. १०३२मध्ये पवित्र रोमन साम्राज्यात विलीन झाले तर फ्रान्सने डची ऑफ बरजंडी इ.स. १००४मध्ये बळकावले.

विभाग

संपादन
 
बूर्गान्यमध्ये बनवलेली वाईन

बूर्गान्य प्रशासकीय प्रदेश खालील चार विभागांमध्ये विभागला गेला आहे.


हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: