बरगंडी (Burgundi) हा जाड मखमली कापडाचा एका प्रकार आहे. गर्द लाल. किंवा मरून रंगात हे कापड येते. बहुधा रेशमी किंवा क्वचित सुती वा पाॅलिएस्टर प्रकारात हे कापड असते. सूटकेसेसना, गाद्यांना किंवा उशांना या कापडाचा अभ्रा घालतात. पडदे म्हणूनही बरगंडीचे कापड भिंती-दरवाजे-खिडक्यांना शोभा देते.

बरगंडी (कापड) बहुधा चीनमधून आयात होते.