बी अँड एच एरलाइन्स
(बी अँड एच एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
बी अँड एच एरलाइन्स (बॉस्नियन: B&H Airlines) ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९४ साली एर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना करून बी अँड एच एरलाइन्स ही नवी कंपनी निर्माण केली.
| ||||
स्थापना | १९९४ (एर बोस्ना नावाने) | |||
---|---|---|---|---|
हब | सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे | बंजा लुका | |||
विमान संख्या | २ | |||
मुख्यालय | सारायेव्हो, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | |||
संकेतस्थळ | http://www.bhairlines.ba/ |
बी अँड एच एरलाइन्सचे मुख्यालय सारायेव्हो येथे असून सारायेव्होच्या सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. सध्या ह्या कंपनीकडे केवळ २ ए.टी.आर. ७२ बनावटीची विमाने आहेत व ती सारायेव्हो, बंजा लुका, कोपनहेगन व झूरिच ह्या चार शहरांना विमानसेवा पुरवते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत