सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ

सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ (बॉस्नियन: Međunarodni aerodrom Sarajevo; क्रोएशियन: Međunarodna zračna luka Sarajevo; सर्बो-क्रोएशियन: Међународни аеродром Сарајево) (आहसंवि: SJJआप्रविको: LQSA) हा बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाच्या सारायेव्हो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ २ जून १९६९ रोजी उघडला गेला व सुरुवातीस येथून प्रामुख्याने झाग्रेबबेलग्रेड येथे विमानसेवा चालत असे. १९८४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी सारायेव्हो विमानतंळामध्ये सुधारणा करण्यात आल्या.

सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Međunarodni aerodrom Sarajevo
आहसंवि: SJJआप्रविको: LQSA
SJJ is located in बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
SJJ
SJJ
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा सारायेव्हो
स्थळ सारायेव्हो महानगर
हब बी अँड एच एअरलाइन्स‎
समुद्रसपाटीपासून उंची १७०८ फू / ५२१ मी
गुणक (भौगोलिक) 43°49′29″N 18°19′53″E / 43.82472°N 18.33139°E / 43.82472; 18.33139
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 २,७०० डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी ७,०९,९०१
स्रोत: संकेतस्थळ[]
येथे थांबलेले तुर्की एरलाइन्सचे एअरबस ए३२१ विमान

हा विमानतळ सारायेव्होच्या ६ किमी पश्चिमेस स्थित असून बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी बी अँड एच एरलाइन्स‎चे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन