प्रो कबड्डी लीग
प्रो कबड्डी लीग (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव विवो प्रो कबड्डी म्हणून ओळखली जाते) [१] किंवा PKLचे संक्षिप्त रूप ही भारतातील पुरुष व्यावसायिक कबड्डी लीग आहे. ही स्पर्धा २०१४ मध्ये सुरू करण्यात आली आणि स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित केली जाते.[२] स्पर्धेचा ८वा हंगाम कोविड-१९ च्या महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला आणि तो २२ डिसेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला आहे. [३][४]
प्रो कबड्डी लीग | |
---|---|
व्हीव्होद्वारे प्रायोजित कबड्डीचा लोगो | |
खेळ | कबड्डी |
प्रारंभ | २०१४ |
प्रथम हंगाम | २०१४ |
वर्षे | ३ |
संघ | १२ |
देश | भारत |
सद्य विजेता संघ | पुणेरी पलटन |
टीव्ही सहयोजक | स्टार स्पोर्टस् |
संकेतस्थळ | http://prokabaddi.com |
प्रो कबड्डी लीग, २०२३-२४ |
प्रो कबड्डी लीग हंगाम | |
---|---|
२००६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या लोकप्रियतेमुळे लीगची सुरुवात झाली. स्पर्धेच्या स्वरूपावर इंडियन प्रीमियर लीगचा प्रभाव होता. प्रो कबड्डी लीग फ्रँचायझी-आधारित मॉडेल वापरते आणि त्याचा पहिला हंगाम २०१४ मध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सामील होण्यासाठी आठ संघांनी प्रत्येकी US$२,५०,००० पर्यंत शुल्क भरले होते.[५][६]
प्रो कबड्डी लीग यशस्वी होईल की नाही याबद्दल शंका होती, अनेक लीग आयपीएलच्या व्यवसाय मॉडेलचे आणि यशाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि क्रिकेटच्या विपरीत, कबड्डीमध्ये तुलनेने कमी नामांकित खेळाडू होते. तथापि, हे देखील नोंदवले गेले की कबड्डी मोठ्या प्रमाणावर तळागाळातील जनसमुदायामध्ये सुद्धा खेळली जाते, आणि त्यामुळे जर लीग लोकप्रिय झाली तर जाहिरातदारांसाठी विविध ग्रामीण आणि उपनगरांतील दर्शकांना आकर्षित करू शकते.[५]
स्पर्धेचा पहिलाच हंगाम सुमारे ४३.५ कोटी (४३५ दशलक्ष) दर्शकांनी पाहिला, ज्यापेक्षा जास्त पाहिली गेलेली एकच स्पर्धा होती ती म्हणजे २०१४ इंडियन प्रीमियर लीग, जी ५५.२ कोटी (५५२ दशलक्ष) दर्शकांनी पाहिली. जयपूर पिंक पँथर्स आणि यू-मुंबा यांच्यातील पहिल्या सत्राचा अंतिम सामना ८.६४ कोटी (८६.४ दशलक्ष) लोकांनी पाहिला. [७][८] प्रो कबड्डी लीगचे प्रसारक,[९] स्टार स्पोर्ट्सने, त्यानंतर २०१५ मध्ये घोषित केले की ते लीगच्या मूळ कंपनी मशाल स्पोर्ट्समध्ये ७४% भागभांडवल विकत घेतील.[१०]
२०१७ आणि २०१८-१९ हंगामासाठी, प्रो कबड्डी लीगने चार नवीन संघ जोडले, आणि संघांना "झोन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन विभागात विभाजित करण्यासाठी त्याचे स्वरूप बदलले.[११] लवकरच लीग २०१९ हंगामासाठी त्याच्या नियमित दुहेरी साखळी स्वरूपामध्ये परतली.
स्पर्धेचे स्वरूप
संपादनप्रो कबड्डी लीगचे नियम सांघिक इनडोअर कबड्डीप्रमाणेच आहेत, परंतु अधिक स्कोअरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यामध्ये काही अतिरिक्त नियम अंतर्भूत केले गेले आहेत. कबड्डी हा एक सांघिक संपर्क खेळ आहे, जो प्रत्येकी सात खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो.
- खेळाचे उद्दिष्ट हे आहे की, चढाईगीर किंवा ज्याला "रेडर" म्हणून संबोधले जाते, त्याने विरुद्ध संघाच्या अर्ध्या कोर्टात धाव घेऊन, त्यांच्या जास्तीत जास्त बचावकर्त्यांना "डिफेंडर्स"ना स्पर्श करणे आणि त्यांच्या स्वतःच्या अर्ध्या कोर्टात परतणे. हे सर्व त्याने एका दमात आणि विरोधी संघाच्या डिफेंडर्सकडून पकडले न जाता करणे अपेक्षित असते. रेडरने स्पर्श केलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी गुण मिळतात, तर प्रतिस्पर्धी संघाला रेडरला थांबवल्यास एक गुण मिळवतो. संघातील खेळाडूंना स्पर्श केल्यास किंवा टॅकल केल्यास गेममधून बाहेर काढले जाते, परंतु त्यांच्या टीमने स्पर्श किंवा टॅकलमधून मिळवलेल्या प्रत्येक गुणासाठी त्यांना परत आणले जाते.
- सलग दोन चढायांमध्ये गुण न मिळविल्यास तिसऱ्या चढाईला "डू ऑर डाय" रेड असे म्हणले जाते, या चढाईमध्ये चढाईगीराने गुण मिळवणे आवश्यक आहे अन्यथा तो बाद घोषित केले जातो.
- जेव्हा बचाव करणाऱ्या संघामध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडू शिल्लक असतात, तेव्हा चढाईगीराला बाद केल्यास त्याला "सुपर टॅकल" असे संबोधले जाते, ज्यामध्ये एक ऐवजी दोन गुण मिळतात.[१२][१३][१४]
स्पर्धेचे हंगाम
संपादन८ संघांसाठी खेळाडूंची पहिली निवड आणि लिलाव २० मे २०१४[९] रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पटना पायरेट्सने विकत घेतलेल्या खेळाडूंमध्ये भारताचा राष्ट्रीय कबड्डी कर्णधार राकेश कुमार हा सर्वात महागडा होता. त्याला ₹१२.८० लाखांना विकत घेतले गेले.[१५] भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दीपक निवास हुडा यांना तेलुगू टायटन्स फ्रँचायझीने ₹१२.६० लाखांना विकत घेतले.[१५] ताई देओक इओम हा पटना फ्रँचायझीने ₹७ लाखांना विकत घेतलेला सर्वाधिक बोली असलेला परदेशी खेळाडू होता.[१५]
ही स्पर्धा २६ जुलै २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१४ दरम्यानन खेळवली गेली. दोन उपांत्य फेरी, तृतीय स्थान आणि अंतिम सामन्यांसह दुहेरी राउंड-रॉबिन सामने खेळवले गेले. पहिल्या फेरीत ५६ आणि प्लेऑफ टप्प्यात ४ सामने असे एकूण ६० सामने खेळवले गेले. पहिल्या हंगामात ८ संघांनी भाग घेतला होता. पहिला सामना २६ जुलै रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळला गेला आणि अंतिम सामना ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे खेळला गेला. जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगचे उद्घाटन करताना यू मुंबाचा ३५-२४ ने पराभव केला.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा २रा हंगाम हा १८ जुलै ते २३ ऑगस्ट २०१५ दरम्यान खेळवला गेला. दोन उपांत्य सामने, तिसरे स्थान, प्ले-ऑफ आणि अंतिम फेरीसह एकूण ६० सामने खेळले गेले. पहिला सामना १८ जुलै रोजी यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स ह्या संघांदरम्यान खेळला गेला आणि अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे यू मुम्बा आणि बंगळूर बुल्स यांच्यात खेळला गेला. यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभव करून प्रो कबड्डी लीग २०१५चा हंगामाचे विजेतेपद मिळविले.[१६] लीगमध्ये यू मुम्बा प्रथम, बंगळूर बुल्स द्वितीय आणि तेलगू टायटन्स तृतीय स्थानावर राहिले.
स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी ३ऱ्या हंगामाच्या दोन आवृत्त्या होत्या. स्टार इंडियाचे सीईओ, संजय गुप्ता, यांनी पुष्टी केली की स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डीला, प्रो कबड्डी हा प्रत्येकी ५ आठवड्यांचा आणि वर्षातून दोन आवृत्त्या असणारा असा एकूण १० आठवड्यांचा कार्यक्रम घडवायचा आहे. जानेवारी-फेब्रुवारी २०१६ मध्ये एकदा आणि जून-जुलै २०१६ मध्ये एकदा स्पर्धा खेळवण्याचा विचार आहे. त्यात ८ संघ देखील होते. दिल्लीत झालेल्या फायनलमध्ये पटणा पायरेट्सने यू मुम्बाचा ३ गुणांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. पुणेरी पलटण संघ या मोसमात तिसऱ्या स्थानावर राहिला.
स्पर्धेचा चौथा मोसम २५ जून ते ३१ जुलै २०१६ या कालावधीत पार पडला, ज्यामध्ये विद्यमान आठ संघ सहभागी झाले होते. पाटणा पायरेट्सने अंतिम सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा पराभव केला. सीझन ४ मध्ये पहिली व्यावसायिक महिला कबड्डी लीग, महिला कबड्डी चॅलेंजचे (WKC) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या मोसमात आइस दिवाज्, फायर बर्ड्स आणि स्टॉर्म क्विन्स ह्या तीन संघांदरम्यान विजेतेपदाचा थरार रंगला. हैदराबादमध्ये पुरुषांच्या अंतिम फेरीसह आयोजित झालेल्या अंतिम फेरीत, स्टॉर्म क्वीन्सने फायर बर्ड्सचा २४-२३ असा पराभव केला.
२०१७ मोसम हा प्रो कबड्डी लीगची पाचवी आवृत्ती होती आणि त्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, तामिळनाडू आणि गुजरातच्या नवीन संघांसह एकूण १२ संघांचा समावेश होता. हरियाणाचा संघ जेएसडब्लू स्पोर्ट्सच्या मालकीचा हरियाणा स्टीलर्स म्हणून ओळखला जातो. सचिन तेंडुलकर तमिळ थलायवाज् नावाच्या तामिळनाडू संघाचा सह-मालक आहे. जीएम्आर समूहाच्या मालकीच्या उत्तर प्रदेश संघाचे नाव यूपी योद्धा ठरविण्यात आले तर गौतम अदानी यांच्या मालकीच्या गुजरात संघाचे नाव गुजरात फॉर्च्युन जायंट्स असे ठेवले गेले.
मे महिन्यात नवीन मोसमासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता, त्यापूर्वी विद्यमान संघांना प्रत्येकी एक खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी होती. या लिलावात ४००हून अधिक खेळाडूंचा विचार करण्यात आला आणि १२ संघांनी ₹४६.९९ कोटी खर्च केले.
प्रो कबड्डी लीग सीझन ५, २८ जुलै २०१७ रोजी सुरू झाला.
लिलावातील सर्वात महागडा निवड होता रेडर नितीन तोमर, ज्याला उत्तर प्रदेश संघाने ₹ ९३ लाखांना विकत घेतले. बेंगळुरू बुल्सने ८१ लाखांच्या किमतीत निवडल्यानंतर रोहित कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. [१७] सर्वात महागडा परदेशी खेळाडू दक्षिण कोरियाचा ली जांग-कुन होता, त्याला बंगाल वॉरियर्सने ₹८०.३ लाखांमध्ये कायम ठेवले होते.
नवीन हंगाम भौगोलिक व्याप्ती आणि कालावधीच्या दृष्टीने भारतीय क्रीडा इतिहासातील ह्या प्रकारची सर्वात मोठी लीग स्पर्धा ठरली. यात ११ राज्यांमध्ये १३ आठवड्यांच्या कालावधीत १३८ सामने पार पडले.
KBD ज्युनियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलांची कबड्डी स्पर्धा, ज्या शहरांमध्ये सामने आयोजित केले गेले त्या शहरांमधील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
पटना पायरेट्सने अंतिम सामन्यामध्ये गुजरात फॉर्च्युन जायंट्सचा ५५-३८ ने पराभव केला आणि स्पर्धेतील मॅन ऑफ द टूर्नामेंट परदीप नरवालने फॉर्च्युन जायंट्सच्या बचावाविरुद्ध प्रथमच १९ रेड पॉइंट्स मिळवले.
स्पर्धेचे निकाल
संपादनप्रो कबड्डी लीगमध्ये खेळणाऱ्या आठ संघांपैकी तीन संघांनी प्रत्येकी एकदा स्पर्धा जिंकली आहे. लीगच्या इतिहासात जयपूर पिंक पॅंथर्स, यू मुम्बा आणि पटणा पायरेटस् सर्वात यशस्वी संघ आहेत.
हंगाम | अंतिम सामना | अंतिम सामन्याचे ठिकाण | संघांची संख्या | सर्वोत्कृष्ट चढाईगीर | सर्वोत्कृष्ट रक्षक | सर्वाधिक एकूण गूण | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
विजेता | निकाल | उपविजेता | ||||||
२०१४ | जयपूर पिंक पॅंथर्स | ३५-२४
गोलफरक = ११ |
यू मुम्बा | नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, | ८ | अनुप कुमार | मनजीत छिल्लर | अनुप कुमार |
२०१५ | यू मुम्बा | ३६-३०
गोलफरक = ६ |
बंगळूर बुल्स | सरदार वल्लभभाई पटेल इन्डोर | काशिलिंग अडाके | रविंदर पहल | काशिलिंग अडाके | |
२०१६ जानेवारी |
पटणा पायरेटस् | ३१-२८
गोलफरक = ३ |
यू मुम्बा | इंदिरा गांधी इन्डोर स्टेडियम, | प्रदिप नरवाल | मनजीत छिल्लर | प्रदिप नरवाल | |
२०१६ जून |
पटणा पायरेटस् | ३७-२९
गोलफरक = ८ |
जयपूर पिंक पॅंथर्स | गचिबोवली इन्डोर स्टेडियम, | राहुल चौधरी | फाझल अत्राचली | राहुल चौधरी | |
२०१७ | पटणा पायरेटस् | ५५-३८
गोलफरक = १७ |
गुजरात | जवाहरलाल नेहरू स्टेडियम, | १२ | प्रदिप नरवाल | सुरेंदर नाडा | प्रदिप नरवाल |
२०१८ | बंगळूर बुल्स | ३८-३३
गोलफरक = ५ अहवाल |
गुजरात | सरदार वल्लभभाई पटेल इन्डोर | पवन शेरावत | नितेश कुमार | पवन शेरावत | |
२०१९ | बंगाल वॉरियर्स | ३९-३४
गोलफरक = ५ अहवाल |
दबंग दिल्ली | द अरेना इन्डोर स्टेडियम, | पवन शेरावत | फाजल अत्राचली | पवन शेरावत | |
२०२१-२२ |
संघानुसार
संपादनसंघ | २०१४ | २०१५ | २०१६ जानेवारी |
२०१६ जून |
२०१७ | २०१८ | २०१९ | २०२०-२१ |
---|---|---|---|---|---|---|---|---|
गुजरात जायंट्स | उ | उ | ९वे | |||||
जयपूर पिंक पॅंथर्स | वि | ५वे | ६वे | उ | १०वे | १०वे | ७वे | |
तमिळ थलायवाज् | ११वे | १२वे | १२वे | |||||
तेलगू टायटन्स | ५वे | ३रे | ५वे | ४थे | ९वे | ९वे | ११वे | |
दबंग दिल्ली | ६वे | ७वे | ८वे | ७वे | १२वे | ४थे | उ | |
पटणा पायरेटस् | ३रे | ४थे | वि | वि | वि | ७वे | ८वे | |
पुणेरी पलटण | ८वे | ८वे | ३रे | ३रे | ४थे | ८वे | १०वे | |
बंगळूर बुल्स | ४थे | उ | ७वे | ६वे | ७वे | वि | ४थे | |
बंगाल वॉरियर्स | ७वे | ६वे | ४थे | ८वे | ३रे | ६वे | वि | |
यू मुम्बा | उ | वि | उ | ५वे | ८वे | ५वे | ३रे | |
यूपी योद्धा | ६वे | ३रे | ५वे | |||||
हरयाणा स्टीलर्स | ५वे | ११वे | ६वे |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "विवो प्रो कब्बडी लीग २०२१| वेळापत्रक, ताजा गुणफलक, बातम्या, , संघ, खेळाडूंची यादी आणि इतर". विवो प्रो कब्बडी लीग २०२१| वेळापत्रक, ताजा गुणफलक, बातम्या, , संघ, खेळाडूंची यादी आणि इतर (इंग्रजी भाषेत). 2021-12-02 रोजी पाहिले.
- ^ "आयपीएलच्या धर्तीवर कबड्डी". बीबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). ७ ऑगस्ट २०१४. २५ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
- ^ "विवो प्रो कबड्डीचा ८वा हंगाम २२ डिसेंबर पासून". प्रो कबड्डी. ५ ऑक्टोबर २०२१. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "प्रो कबड्डी लीग २०२१- संघ, खेळाडू यादी". स्पोर्टिंग क्रेझ (इंग्रजी भाषेत). १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "कबड्डीला आयपीएल सारखी वागणूक". बीबीसी न्यूझ. ६ ऑगस्ट २०१४. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कबड्डी डिझर्व्ज लीग ऑफ इट्स ओन आनंद महिंद्रा". दि इकॉनॉमिक टाईम्स. १० एप्रिल २०१४. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले. no-break space character in
|title=
at position 16 (सहाय्य) - ^ "प्रो कबड्डी लीग व्ह्युवरशीप सेकंड ओन्ली टू आयपीएल". द हिंदू. १५ सप्टेंबर २०१४. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "साधा, दृष्य, मजेदार: कबड्डी हा प्राचीन खेळ पुनरुत्थानाचा आनंद घेत आहे". द गार्डियन. १० ऑक्टोबर २०१६. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "प्रो कबड्डी लीगच्या खेळाडूंचा लिलाव २० मे रोजी". टाइम्स ऑफ इंडिया. १७ मे २०१४. २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "स्टार स्पोर्ट्सचे प्रो कबड्डी मालक मशाल स्पोर्ट्स मध्ये ७४% भाग भांडवल". स्पोर्ट्स बिझनेस डेली (इंग्रजी भाषेत). १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "प्रो कबड्डी लीग २०१७". फर्स्टपोस्ट (इंग्रजी भाषेत). २७ जुलै २०१७. १३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कबड्डी विश्वचषक २०१६: स्वरूप, नियम आणि खेळ कसा कार्य करतो यासाठी एक सुलभ मार्गदर्शक". फर्स्टपोस्ट (इंग्रजी भाषेत). ५ ऑक्टोबर २०१६. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कबड्डी १०१: चढाई, बचाव, पुनरुज्जीवन, पुनरावृत्ती". इएसपीएन.कॉम. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ "कबड्डीबद्दल आपल्याला माहित असावी अशी प्रत्येक गोष्ट". द इंडियन एक्सप्रेस. ३० जानेवारी २०१६. १४ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b c Special Correspondent (२१ मे २०१४). "राकेश कुमारसाठी सर्वाधिक बोली". द हिंदू. २१ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "प्रो कबड्डी लीग सीझन२-निकाल". १ जुलै २०१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "प्रो कबड्डी लीग २०१७ लिलाव: १० महागडे खेळाडू; आणि लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी". माय खेल (इंग्रजी भाषेत). ८ ऑगस्ट २०१७. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.