प्रतिमा गौरी बेदी (१२ ऑक्टोबर १९४८-१८ ऑगस्ट १९९८) ह्या एक ओडिसी नृत्यांगना होत्या.[] त्या सुरुवातीला मॉडेल होत्या. त्यांनी १९९० साली, बंगलोरजवळ नृत्यग्राम, ह्या नृत्य विद्यालयाची स्थापना केली.[]

प्रतिमा बेदी
आयुष्य
जन्म १२ ऑक्टोबर १९४८
जन्म स्थान दिल्ली
संगीत कारकीर्द
कार्य ओडिसी नृत्य
पेशा नृत्यांगना

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

प्रतिमा ह्यांचा जन्म दिल्लीत झाला.[] त्या त्यांच्या चार भावंडामधील दुसऱ्या होत्या. त्यांचे वडील लक्ष्मीचंद गुप्ता हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील एका अगरवाल कुटुंबातील होते. त्यांची आई बंगाली होती. त्या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून पाठींबा न मिळाल्याने त्यांना आपले गाव सोडावे लागले. त्यानंतर ते दिल्लीला आले. १९५३ साली, त्यांचे कुटुंब गोव्याला स्थलांतरीत झाले, आणि १९५७ मध्ये मुंबईला राहायला गेले. वयाच्या नवव्या वर्षी, प्रतिमा ह्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे कर्नाल जिल्ह्यातील एका गावी पाठवण्यात आले जिथे त्या शाळेत गेल्या. त्या परत आल्यावर, त्यांना किमीन्स हायस्कूल, पाचगणी येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून पदवी( १९६५-६७) घेतली.[]

कारकीर्द

संपादन

१९७५ च्या ऑगस्टमध्ये, वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, त्यांनी भुलाभाई मेमोरियल इन्स्टीट्यूटमध्ये दोन नृत्यांगनांचे ओडिसी नृत्य पाहिले आणि त्यांचे आयुष्य बदलले.[] या नृत्य प्रकारात खूप वेगळे ताल, लय आणि अवघड हस्त आणि मुद्राभिनय असला तरीही त्यांना ते खूप आवडले. त्या गुरू केलुचरण मोहपात्रा ह्यांच्याकडे नृत्य शिकण्यास गेल्या. त्यांनी दिवसाला १२ ते १४ तास रियाज केला. त्यांच्यासाठी नृत्य ही एक जगण्याची पद्धत होती. आपली शैली अजून चांगली करण्यासाठी त्यांनी मद्रासच्या गुरू कलानिधी नारायण ह्यांच्याकडे अभिनयाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी देशभरात आपली कला सादर करायला सुरुवात केली. त्याच काळात त्यांनी जुहू, मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये स्वतःचे नृत्य विद्यालय स्थापन केले. त्याचे नाव पुढे ओडिसी डान्स सेंटर झाले.

त्यांनी 'टाईमपास' या नावाने इंग्रजीमध्ये आत्मचरित्र लिहिले आहे.[]त्याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील ह्यांनी केला आहे.[]

नृत्यग्राम

संपादन

बेंगलोरजवळ नृत्याग्राम हे भारतातले पहिले मोफत नृत्य शिकवणारे गुरुकुल त्यांनी स्थापन केले.[] येथे सात गुरुकुल आहेत आणि सात वेगवेगळ्या नृत्य शैली आणि छाऊ आणि कलारीपायटू ह्या दोन मार्शल आर्ट्स शिकवल्या जातात. नृत्यग्रामचे उद्घाटन ११ मे १९९० रोजी त्यावेळचे पंतप्रधान, व्ही. पी. सिंग ह्यांच्या हस्ते झाले.

शेवटची वर्षे

संपादन

प्रतिमा ह्यांनी निवृत्ती घेतली हिमालयात जायचे ठरवले. त्या सुरुवातीला लेहला गेल्या. त्यांनी ऋषिकेशयेथे दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या “मी स्वतःला हिमालयाकडे समर्पित करायचे ठरवले आहे. ह्या पर्वतांनी मला इथे बोलावले आहे. ते चांगल्यासाठीच असेल.” ऑगस्ट मध्ये त्या कैलास मानसरोवराच्या तीर्थ यात्रेला निघाल्या. त्याच काळात पिठोरगड जवळच्या मालपा गावात दरड कोसळली. त्या वेळी त्या बेपत्ता झाल्या. काही दिवसांत त्यांचा मृतदेह भारत-नेपाळ सीमेजवळ सापडला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "NRITYAGRAM - artists - protima". www.nrityagram.org. 2020-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "NRITYAGRAM - artists - protima". www.nrityagram.org. 2020-03-30 रोजी पाहिले.
  3. ^ Bedi, Protima; Ibrahim (2003-04). Timepass (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-028880-3. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Bedi, Protima; Ibrahim (2003-04). Timepass (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-028880-3. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Rediff On The NeT: The Rediff Interview/Protima Bedi". www.rediff.com. 2020-03-30 रोजी पाहिले.
  6. ^ Bedi, Protima; Ibrahim (2003-04). Timepass (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-028880-3. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "टाईमपास-Timepass by Protima Bedi - Mehta Publishing House - BookGanga.com". www.bookganga.com. 2020-04-03 रोजी पाहिले.
  8. ^ Kaggere, Niranjan; Iyengar, Vidya (2017-08-12). "Protima Bedi's legacy, Nrityagram, will soon dance to Govt's tunes". The Economic Times. 2020-03-30 रोजी पाहिले.