छऊ नृत्य

ओरिसा व बिहारमधील नृृत्य
(छाऊ नृत्य या पानावरून पुनर्निर्देशित)

छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसाबिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.

स्वरूप

संपादन

छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.[]

वैशिष्ट्ये

संपादन

प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.[]

ओडिसातील नृत्य

संपादन

ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतीय संस्कृृती कोश खंड तिसरा
  2. ^ भारतीय संस्कृृती कोश खंड तिसरा