हृदयनाथ मंगेशकर

मराठी संगीतकार
(पंडित हृदयनाथ मंगेशकर या पानावरून पुनर्निर्देशित)

हृदयनाथ मंगेशकर (ऑक्टोबर २६, १९३७ - हयात) हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत.

हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर
आयुष्य
जन्म ऑक्टोबर २६, १९३७
पारिवारिक माहिती
अपत्ये आदिनाथ मंगेशकर
राधा मंगेशकर
वैजनाथ मंगेशकर
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत गायन, संगीतकार
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ १९५५ पासून
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (२००९)

कारकीर्द

संपादन

त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत.

त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात.

गाजलेली गीते

संपादन
शीर्षक गायक/गायिका गीतकार चित्रपट
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या लता मंगेशकर सुरेश भट उंबरठा
चांदण्यात फिरताना आशा भोसले सुरेश भट
मालवून टाक दीप लता मंगेशकर सुरेश भट
सूर मागू तुला मी कसा? अरुण दाते सुरेश भट
तुज मागतो मी आता लता मंगेशकर रामकृष्ण बाबू सोमयाजी
भय इथले संपत नाही लता मंगेशकर ग्रेस
सावर रे लता मंगेशकर मंगेश पाडगावकर
दे मला गे चंद्रिके लता मंगेशकर राजा बढे
रातिची झोप मज येईना लता मंगेशकर शांता शेळके पवनाकाठचा धोंडी
त्या फुलांच्या गंधकोषी हृदयनाथ मंगेशकर सूर्यकांत खांडेकर
ॐ नमोजी आद्या लता मंगेशकर संत ज्ञानेश्वर
तिन्हीसांजा सखे मिळाल्या लता मंगेशकर भा.रा.तांबे
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा लता मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर
जिवलगा, राहिले दूर घर माझे आशा भोसले शांता शेळके
सागरा प्राण तळमळला हृदयनाथ, मीना, उषा आणि लता मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर
हासायाचे, आहे मला लता मंगेशकर आरती प्रभु
जाईन विचारित रानफुला किशोरी अमोणकर शांता शेळके
वादलवारं सुटलं गो लता मंगेशकर शांता शेळके
नीज रे नीज शिवराया लता मंगेशकर राम गणेश गडकरी
कशी काळनागिणी लता मंगेशकर भा.रा.तांबे
नाहि कशी म्हणू तुला लता मंगेशकर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
वेडांत मराठे वीर दौडले सात लता मंगेशकर वि.वा. शिरवाडकर शिवकल्याणराजा
ती येते आणिक जाते महेंद्र कपूर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
हे श्यामसुंदर राजसा किशोरी आमोणकर शांता शेळके

पुरस्कार

संपादन
  • २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
  • पुणे नवरात्र महोत्सवातर्फे दिला गेलेला ’महर्षी पुरस्कार" (२०१४)
  • पुणे-चिंचवड येथील नादब्रह्म परिवारातर्फे नादस्वरब्रह्मश्री पुरस्कार (७ जानेवारी २०१७)
  • पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार (९ ऒक्टोबर २०१७)
  • २०१८ सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१६ मार्च २०१८)

बाह्य दुवे

संपादन