निशाणी डावा अंगठा हा इ.स. २००९ साली पडद्यावर झळकलेला मराठी भाषेमधील चित्रपट आहे.

निशाणी डावा अंगठा
दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे
निर्मिती दिलीप जाधव, विक्रम जोशी
कथा रमेश इंगळे उत्रादकर
पटकथा अजित दळवी, प्रशांत दळवी
प्रमुख कलाकार अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, विनय आपटे, मंगेश देसाई, हृषीकेश जोशी, रमेश वाणी, भारत गणेशपुरे, पौर्णिमा अहिरे, लतिका गोरे, हिमाली कारेकर, वंदना सजक्के, मौसमी तोंडवळकर, मंदा देसाई, वीणा जामकर, शर्वाणी पिल्लै, ज्योती सुभाष, विठ्ठल उमप, नंदेश उमप, भरत जाधव, संजय नार्वेकर आणि अंजन श्रीवास्तव
गीते संदीप खरे
संगीत सलील कुलकर्णी
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}

कथानक

संपादन

निशाणी डावा अंगठा

रमेश इंगळे उत्रादकर यांनी लिहिलेल्या निशाणी डावा अंगठा या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट आहे.

   या चित्रपटाची कथा सावरगाव नावाच्या एका गावातील शाळेभोवती फिरते. सरकारने प्रौढ साक्षरता अभियानाचं आयोजन केलेलं आहे. आणि गावातल्या सगळ्या लोकांना शिकवायची जबाबदारी त्या गावच्या शिक्षकांवर येऊन पडते.
    कामापेक्षा जास्त वेळ शाळेत थांबणे कुणालाही पटत नाही, मात्र अचानक केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची Visit आणि शेवटी परीक्षा हे ऐकल्यावर शिक्षकांच्या पायाखालची जमीन सरकते.
    हे सगळे होण्याआधी शिक्षण अधिकाऱ्याची मिटिंग अटेंड करणे. शिक्षण अधिकारी गावात येणार म्हणून सगळ्या गावाची लाईट घालवणे. 

कसेंना कसें हे सगळे शिक्षक त्यांची पडती बाजूं पेलवत धरतात, यानंतर Visit आणि परिक्षेच काय होत हे पाहण्यासाठी नक्की पहा निशाणी डावा अंगठा.

      सलील-संदीप यांचं संगीत असल्यामुळे चित्रपटातील एक अन् एक गाणं उत्कृष्ठ आहे. मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, निर्मिती सावंत, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे आणि अजून अनेक मात्तबर कलाकार आपापलं पात्र इतकं सुरेख रंगवतात की सिनेमा बघताना मजा येते.
      2 तास 08 मिनिटाच्या या चित्रपटाला Imdb वर 7.7 रेटिंग आहे. हा चित्रपट तुम्ही YouTube वर पाहू शकता. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला.

यासारखे अजून Review वाचण्यासाठी पहा,

https://m.facebook.com/dagadfulachakarbhar/