नायकः द रियल हिरो हा २००१ साली एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राजकारण आणि त्याच्या मधील भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात शिवाजीराव (अनिल कपूर) कसा लढतो आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो हे दाखविले आहे. यात अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावळ आणि जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

नायक: द रियल हिरो
दिग्दर्शन एस.शंकर
निर्मिती २००१
कथा एस.शंकर
पटकथा एस.शंकर
प्रमुख कलाकार अनिल कपूर,राणी मुखर्जी,अमरीश पुरी,जॉनी लिव्हर,परेश रावळ,शिवाजी साटम आणि सौरभ शुक्ला
संवाद अनुराग कश्यप
छाया के.व्ही.आनंद
गीते ए.आर.रहेमान
देश भारत
भाषा [[हिंदी भाषा|हिंदी]]
प्रदर्शित ७ सप्टेंबर
वितरक सूर्या प्रॉडकशन्स
अवधी १८७ मिनिटे


कलाकार

संपादन

कथानक

संपादन
       शिवाजीराव (अनिलकपूर) हे क्यू टीव्हीच्या टीव्ही रिपोर्टर लालियाचे (पूजा बात्रा)चे कॅमेरामन असतात. सोबत त्यांचा मित्र टोपी(जॉनीलिव्हर) हा स्पोटबोय असतो. त्याला " जा बे छक्के" असे तो म्हणतो कारणकी त्याच्या पोटाला टिचकी दिल्यामुळे. क्यू टीव्हीच्या मालकाला देखील तो जा बे छक्के असे म्हणतो.हे तिघे जिथं मुख्यमंत्र्यांचा (अमरीशपुरी) दौरा आहे तिथे जाऊन शूट करतात.तेव्हा शिवाजीराव यांना मंजुली(राणीमुखर्जी) दिसते.तेव्हा त्यांचे तिच्यावर प्रेम होते.ते तिला मिळण्यासाठी तिच्या गावी फुलगाम येथे जातात आणि भेटतात.एके दिवशी शिवाजीराव आणि त्यांची रिपोर्ट्स टीम शूट करायला जात असताना रस्त्यात मध्येच एक दंगा होतो.तो म्हणजे एका महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांची अंतिम परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर त्यानां जायचे असते.टीव्ह एक बस येते पण, ती थांबतच नाही याच कारणावरून दंगा सुरू होतो.या दंग्याचे स्वरूप मोठ्यात होते.हा दंगा थांबवण्यासाठी स्वत पोलीस कमिशनर येतात.ते मुख्यमंत्र्यांना फोन लावून सांगतात की येथील दंगा थांबवा म्हणून,पण मुख्यमंत्री बलराज चव्हाण हे अतिशय भ्रष्टाचारी मंत्री असतात.ते फोनवर पोलीस कमिशनरला दंगा वाढू द्या म्हणून सांगतात.या सर्व वर्तलाबाची आणि दंग्याची रेकॉर्डिंग शिवाजीराव करून घेतात.ह्या रेकॉर्डिंग मुळे त्यांना मुख्य न्यूझ रिपोर्टर म्हणून स्थान मिळते.हे रेकॉर्डिंग क्यू टीव्हीची  टी. आर. पी. वाढवतो म्हणून त्यांना हे स्थान प्राप्त होते. एके दिवशी जेव्हा शिवाजीराव त्यांच्या स्टुडिओत म्हणजेच क्यू टीव्ही मध्ये येतात तेव्हा त्यांचे त्यांना सांगतात की मुख्यमंत्री यांचा साक्षात्कार घ्यायचा आहे तेव्हा शिवाजी त्यांचा हात थरथर करत हो म्हणतात.

मध्य कथानक

संपादन
          दुसऱ्या दिवशी साक्षात्कार असतो.मुख्यमंत्री आल्यावर साक्षात्कार सुरू होतो.तेव्हा शिवाजी त्यांना समाजातील आणि राजकाणातील प्रश्न  विचारतात.तेवढ्यातच शिवाजी त्यांच्यावर टीका करून म्हणतो की तुम्हाला तुमची खुर्ची आवडतीची आहे.तुम्हाला समाजाचा जराही विचार येत नाही. तुम्हीच जाती - जाती आणि धर्मा - धर्मात वाद निर्माण केले आहेत.तुमच्या मुळेच तो दंगा झाला होता. तेवढ्यातच मंत्री म्हणतात की तुझ्या जवळ याचे काय कारण आहे की मी एवढे सगळे केले आहे.मंत्री शिवाजीला कारण मागतात तेव्हा शिवाजी ती रेकॉर्डिंग त्यांना दाखवतो आणि ती रेकॉर्डिंग सर्व लोकांच्या टीव्हीवर थेट प्रसारित केली जाते.रागात येऊन मंत्री शिवाजीराजांना एक दिवसाचा मुख्यमंत्री व्हायला सांगतात तेव्हा शिवाजी सुरुवातीला नाही म्हणतो पण पुन्हा होकार देतो.
तो दुसऱ्या दिवशी लगेचच मुख्यमंत्री बनतो आणि सर्व काही विकास कामे पूर्ण करण्याकडे वळतो. काहींना मदत करतो,काहींना राहायला नवीन घर देतो, भ्रष्टाचाराला आळा घालतो.त्याचा मॅनेजर बंसल (परेशरावळ) त्याला राजकारणातील सर्व काही शिकवतो.त्यांचा मुख्यमंत्रीपदाच्या दिवशी सायंकाळी ते घरी जात असताना त्यांच्यावर बलराज चव्हाण हा हल्ला चढवतो. ते त्याच्यातून वाचतात आणि त्यांच्या घरी परततात. घरी आल्यावर त्यांचे स्वागत होते. लगेच ते मांजुळी कडे जातात.तिच्याशी भेटतात.
अंतिम कथानक
संपादन
                        हे सर्वकाही झाल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांचा पाच वर्षाचा काळ संपल्यामुळे निवडणुका घोषित होतात आणि सर्वजण शिवाजीराव कडूनच असतात. त्याच्यामुळे शिवाजीराव राजनीतीचा अभ्यास करतात. इकडे बलराज चव्हाणचा रागाचा पारा वाढतच जातो. या रागाच्या पाऱ्यात चव्हाण क्यू टीव्हीच्या स्टुडिओ वर हल्ला चढवितात.शिवाजीच्या घराची तोडफोड करतात. हे सर्व झाल्यावर ते राजकारण नको म्हणतात.बंसल त्यांना समजावतात. शिवाजी विजयी होतात आणि त्यांच्या घरावर हल्ला होतो.त्याच्या मध्ये त्यांचे आई - वडील(नीनाकुलकर्णी आणि विक्रमगोखले) ठार होतात.याचा बदला घेण्यासाठी शिवाजी त्याला राजभवनात बोलवतो आणि शिवाजीचे संरक्षक त्याला गोळ्या घालून ठार करतात.

निर्मिती

संपादन

हा चित्रपट मुधालवान या दाक्षिणात्य चित्रपटाची पुनरावृत्ती आहे. या मुधालवान चित्रपटात अर्जुन सर्जा आणि मनीषा कोईराला यांची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या शिवाजीराव भूमिकेसाठी पहिल्या वेळी शाहरुख खान यांना ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी नकार दिला. मंजुळी या भूमिकेसाठी मनीषा कोईराला,प्रीती झिंटा आणि सुश्मिता सेन या सर्वांना ऑफर देण्यात आल्या होत्या. या सर्वांकडे वेळ नसल्या मुळे त्यांनी ह्या नाकारल्या. मग एस.शंकर यांना शिवाजीराव या भूमिकेसाठी अनिल कपूर तर मंजूलीला राणी मुखर्जी यांना निवडले.