नटसम्राट (चित्रपट)

(नटसम्राट (२०१६ मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


नटसम्राट- असा नट होणे नाही हा एक कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित चित्रपट आहे. नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला असून याला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. नाना पाटेकर यांनी उत्कृष्ठ प्रकारे नटसम्राट मोठ्या पडद्यावर लोकांना दाखवून त्यांची मने जिंकली ह्या चित्रपटाने तब्बल ५० कोटी रुपये कमावले

नटसम्राट
दिग्दर्शन महेश मांजरेकर
प्रमुख कलाकार नाना पाटेकर
विक्रम गोखले
सुनील बर्वे
मृण्मयी देशपांडे
मानसी नाईक
संवाद कुसुमाग्रज
संगीत अजित परब
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी १ इ.स. २०१६
वितरक झी स्टुडीओ
निर्मिती खर्च ₹५० कोटी

कथासूत्रसंपादन करा

नटसम्राट गणपतराव बेलवलकर नाटक व्यवसायातून निवृत्ती पत्करतात. पत्नी कावेरी, मित्र राम, मुलगा, सून, मुलगी यांच्याबरोबर समारंभ साजरा करत असतानाच बेलवलकर आपलं घर मुलाच्या नावावर करण्याची घोषणा करतात आणि बाकीचे संपत्ती मुलीच्या नावावर करतात. नटसम्राट अशीच त्यांची ख्याती असते. ते शरीराने निवृत्त झाले असले तरी मनाने निवृत्त झालेले नसतात. ते नाटकातच रमलेले असतात. या गोष्टीचा त्यांच्यावर आणि सभोवतालच्या लोकांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. लागते. जे होतं ते सारं मुलामुलींच्या नावे केलेलं असतं. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट गलितगात्र होतो. त्याच्या आयुष्याची एक असह्य फरफट सुरु होते.त्यानां पागल समजले गेले आणि पागल बनवले गेले त्यामुळे त्यांनी घर सोडले व पागल खाण्यात राहायला गेले