देशस्थ ब्राह्मण ही महाराष्ट्रीय सनातन वैदिक हिंदूंच्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी लोकसंख्येने सर्वात मोठी पोटजात आहे. मराठी ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती कर्‍हाडे, चित्पावन, देवरुखे , दैवज्ञसारस्वत ह्या आहेत. देशस्थ ब्राह्मणांच्या ऋग्वेदीयजुर्वेदी ह्या दोन शाखा आहेत. कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, जोशी ही देशस्थांमधली प्रमुख आडनावे आहेत. यांशिवाय दहा हजारांहून कितीतरी अधिक आडनावे देशस्थांत असतात. त्यांच्या या विशाल संख्येमुळे पंचांगांत त्यांच्या आडनावांची जंत्री दिलेली नसते. रुईकर पंचांगात एक छोटी जंत्री दिलेली आहे.[ संदर्भ हवा ]

देशस्थ ब्राह्मण समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रातकर्नाटकच्या उत्तर भागात आढळतो. यांची आडनावे काहीवेळा त्यांच्या पूर्वजांच्या गावाच्या नावापासून तयार होतात. उदाहरणार्थ बीडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे मूळ गाव हे बीड असते. धारवाडकर आडनाव असलेल्या व्यक्तीचे धारवाड. कविवर्य कुसुमाग्रज हे मूळचे शिरवाड गावचे म्हणून त्यांचे आडनाव शिरवाडकर. त्याव्यतिरिक्त काही आडनावे त्यांच्या उद्योगव्यवसायामुळे ठरत असत. जसे कुलकर्णी हे आडनाव कुळांच्याकडून कर गोळा करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचे तर जोशी हे आडनाव पंचांग पाहणाऱ्या व्यक्तीचे. कधीकधी आडनाव हे शारीरिक व मानसिक गुणावरून असते. उदाहरणार्थ बुद्धिसागर म्हणजे बुद्धीचा सागर किंवा सागरासम अफाट बुद्धी असलेला.[ संदर्भ हवा ] काही काही आडनावे क्वचितच असतात जसे गाडे, ससाणे, गाडेकर हीही आडनावे देशस्थ ब्राम्हणांत येतात

आदी शंकराचार्यांनी भारताच्या चार टोकांना धर्मपीठे स्थापन केली. या चारही पीठाच्या व्यवस्थेसाठी शंकराचार्यांनी कोल्हापूरकडील चार देशस्थ ब्राह्मणांची मुख्य पुजारी म्हणून नेमणूक केली होती. ही परंपरा आजही चालू आहे. जगद्‍गुरू शंकराचार्यांच्या केरळमधल्या कालडी या गावातील वेदपाठशाळेचे मुख्य कमलाकर नावाचे देशस्थ ब्राह्मण आहेत. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या आसपास स्थायिक झालेल्या मराठी ब्राह्मणांपैकी जवळजवळ सगळे देशस्थ ब्राह्मण असतात.[ संदर्भ हवा ]

देशस्थ ब्राह्मणांच्या संस्थासंपादन करा

  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था, कसबा पेठ, पुणे आणि कांदिवली, कुर्ला, गोरेगाव, डोंबिवली, दादर, बोरीवली, मालाड, मुलुंड (सर्व मुंबई).
  • देशस्थ ऋग्वेदी मंगल कार्यालय, तपकीर गल्ली, पुणे
  • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे
  • देशस्थ संघ, विले-पार्ले (मुंबई)
  • देवरुखे ब्राह्मण संघ, गिरगांव, मुंबई
  • देशस्थ ऋग्वेदी संस्था, नाशिक
  • ब्राह्मण कार्यालय, चित्रशाळेसमोर, सदाशिव पेठ, पुणे