इंदूर संस्थान
(होळकर या पानावरून पुनर्निर्देशित)
इंदूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील सेन्ट्रल इंडिया एजन्सी मधील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाला होळकर संस्थान असेही म्हणत. या संस्थानाचे संस्थानिक होळकर घराणे होते.
इंदूर संस्थान इंदौर संस्थान | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: प्राहोमेशोलभ्या श्रीः कर्तुः प्रारब्धान् | ||||
राजधानी | इंदूर | |||
सर्वात मोठे शहर | इंदूर | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: मल्हारराव होळकर (प्रथम)(इ.स. १७३१-१७६६) अंतिम राजा: यशवंतराव होळकर (द्वितीय) (इ.स. १९२६-१९४८) |
|||
इतर भाषा | मराठी, हिंदी | |||
लोकसंख्या | 1,325,089 (१९३१) | |||
–घनता | 53.9 प्रती चौरस किमी |
क्षेत्रफळ
संपादनइंदूर संस्थानाचे क्षेत्रफळ २४,६०५ चौरस किमी इतके होते. या संस्थानात सुमारे ३,३६८ गावे होती.
राजधानी
संपादनया संस्थानाची राजधानी इंदूर या नगरात होती.
स्थापना
संपादनइंदूर संस्थानाची स्थापना सन १७३३ या वर्षी मल्हारराव होळकर यांनी केली.
स्वातंत्र्योत्तर काळ
संपादनइंदूर संस्थानाचे महाराजा यशवंतराव(द्वितीय) यांनी भारत स्वतंत्र झाल्यावर १ जानेवारी १९५० या दिवशी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले.