दि.वि. जोशी
प्राचार्य दिनकर विष्णुपंत जोशी उर्फ दि. वि. जोशी (२६ ऑगस्ट १९२६ - २० डिसेंबर २००५) हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते.[१] बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध, कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.[ संदर्भ हवा ]
दि.वि. जोशी | |
---|---|
जन्म नाव | दिनकर विष्णुपंत जोशी |
जन्म |
२६ ऑगस्ट, १९२६ जळगाव (जामोद) जि. बुलढाणा |
मृत्यू | २० डिसेंबर, २००५ (वय ७९) |
शिक्षण | M. A. (Marathi) |
साहित्य प्रकार |
बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध, कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा |
वडील | विष्णुपंत गोविंद जोशी |
बालपण व शिक्षण
संपादनदि. वि. जोशी यांचे बालपण हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येथे गेले. त्यांचे पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण जळगाव (जामोद) येथे झाले व पुढील शिक्षण हे खामगाव येथील शासकीय शाळेमध्ये झाले.[ संदर्भ हवा ]
त्यांनी जे जे स्कुल ऑफ आर्टस् चा पदवीपर्यंत चा अभ्यासक्रम पूर्ण केला परंतु वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने परीक्षा देता आली नाही. पुढे वडिलांच्या पश्चात घरची जबाबदारी पेलत त्यांनी अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयामध्ये मराठी साहित्यात एम. ए. केले. ते जळगाव (जामोद) येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राध्यापक राहिले व पुढे प्राचार्य पद देखील त्यांनी सांभाळले.[ संदर्भ हवा ]
व्यंगचित्रे
संपादनदि. वि. जोशी यांनी व्यंगचित्रांद्वारे अनेक मासिकांमधून समाजात घडलेल्या घटनांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजदर्शन घडवले. पुण्यात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले.[ संदर्भ हवा ] सन १९४७ ते १९६० या कालावधीत उद्यम, किर्लोस्कर, मनोहर, वसंत, हंस या मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या चित्रांना प्रथम-द्वितीय-तृतीय क्रमांक मिळाले. कमीतकमी वेळात दि.वि. जोशी यांनी काढलेले व्यंगचित्र मार्मिक भाष्य करून जाई.[ संदर्भ हवा ]
व्यंगचित्रे : हास्य फवारे (व्यंगचित्रांचा संग्रह)
साहित्यिक लिखाण व पुस्तके
संपादनकादंबरी
संपादनबालकादंबरी
संपादननाटकाचे नाव | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|
स्वप्नगंधा | ||
उनाड राजा | 1964 | |
बुमचिकि | 1969 | |
राक्षस परी आणि पियूची गोष्ट | ||
राजकुमार चकोर आणि राक्षस | नागपूर प्रकाशन | 1984 |
सोन्याचे मांजर[४] (पारितोषिक प्राप्त) | ॠचा प्रकाशन | 2007 |
चिपकचंडी[५] (बालसाहित्य) | ॠचा प्रकाशन | 2007 |
दिपकळ्या[६] (बालसाहित्य) | ॠचा प्रकाशन | 2005 |
पुराणातील संस्कारकथा[७] | साकेत प्रकाशन | 2013 |
सावली हरवली | प्रपंच प्रकाशन | 2005 |
नाटके
संपादननाटकाचे नाव | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|
कळीचा नारद | ॠचा प्रकाशन | |
रंगला डाव आता | ॠचा प्रकाशन | |
प्रपंच करावा नेटका | ॠचा प्रकाशन | |
हसली माझी व्यथा | ॠचा प्रकाशन | |
चंद्रमे जे अलांछन[८] | ॠचा प्रकाशन | 2006 |
स्वप्नांना पंख नसतात[९] | ॠचा प्रकाशन | 2006 |
अतिथी[१०] | ॠचा प्रकाशन | 2012 |
एक मिनीट फक्त[११] | ॠचा प्रकाशन | 2012 |
चोरीचा मामला (विनोदी नाटक)[१२] | ॠचा प्रकाशन | 2012 |
नशीबवान[१३] | ॠचा प्रकाशन | 2012 |
नामानिराळा[१४] | ॠचा प्रकाशन | 2012 |
तेथे पाहिजे जातीचे[१५] | ॠचा प्रकाशन | 2012 |
पुनःप्रत्यय[१६] | ॠचा प्रकाशन | 2012 |
रस्ते[१७] | ॠचा प्रकाशन | 2012 |
ही गोष्टच वेगळी[१८] | ॠचा प्रकाशन | 2012 |
एकांकिका [ संदर्भ हवा ]
संपादन- पैशाला पाय फुटतात
- प्रपंच करावा नेटका
- ताकापुरते रामायण
- व्हायचं तेच झालं
- भिंतीला कान असतात
- सारी सोंगे येतात
- घोडं पेंड खाते
- कथा एका मुलाची
- राखावी बहुतांची अंतरे
- स्वप्न एका सामान्याचे (याचे उर्दूत भाषांतर झाले आहे.)
- एक होता आदम
- हेचि दान देगा
- वशिल्याचे तट्टू
- बराय मंडळी
- जुलमाचा रामराम
- आत्याबाईंना मिशा आल्या
- एकाच माळेचे मणी
- नकटीचे लग्न (दूरदर्शनवर १४-१०-१९९१ रोजी प्रसारित)
- अखेर माणूसच मेला (जातिभेद निर्मूलन : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
- दि. वि. जोशी यांच्या प्रयोगक्षम पाच एकांकिका (जेव्हा सरहद्द लढतो, हॅम्लेट वेडा नाही, हा खेळ मांडियेला, प्रतिशोध, वेंधळा)
- रहस्यमय चकवा (दि.वि. जोशी नाट्यसंच)
- चक्रव्यूह (प्रयोगक्षम एकांकिका)
- घर सापडलंय (प्रयोगक्षम एकांकिका)
- असंही घडू शकतं (प्रयोगक्षम एकांकिका)
- आमचं काय चुकलं (ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रयोगक्षम एकांकिका)
- द. ह. शतवादी[१९] (विनोदी एकांकिका)
- तिसरा अंक (प्रयोगक्षम एकांकिका)
- परिवर्तन (प्रयोगक्षम एकांकिका)
- पाण्यावेगळी (प्रयोगक्षम एकांकिका)
- माळवतीच्या सावल्या (प्रयोगक्षम एकांकिका)
- स्वप्नांना पंख नसतात (एकांकिका)
- सांजपक्षी (प्रयोगक्षम एकांकिका)
- सेन्ससचा माणूस (प्रयोगक्षम एकांकिका)
- वरदान यौवनाचे (प्रयोगक्षम एकांकिका)
- मला शिकायचं आहे (प्रयोगक्षम एकांकिका)
कथासंग्रह
संपादनकथासंग्रहाचे नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
काटशह[२०] | रहस्यमय नभोनाट्य | ॠचा प्रकाशन | 2010 |
डांगरवाडी[२१] | कथासंग्रह | ॠचा प्रकाशन | 1964 |
ऋचा[२२] | रूपक कथा | ॠचा प्रकाशन | |
रहस्यमय आखरी डाव[२३] | गूढकथा संग्रह | ॠचा प्रकाशन | 2012 |
रहस्यमय गफलत[२४] | गूढकथा संग्रह | ॠचा प्रकाशन | 2012 |
श्रेष्ठ भारतीय बालकथा - तमिळ[२५][२६] | भाषांतर | साकेत प्रकाशन |
कथा व कविता
संपादनप्रा. दि. वि. जोशी यांच्या १०० च्या वर कथा, २५ च्या वर लघुकथा, ५० च्या वर कविता, ४० च्या वर ललित बंध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या साहित्याचा वसा पुढे दि. वि. जोशी यांनी चालविला. अर्थात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ज्याप्रमाणे विनोदातून समाजातील व्यंगांवर मार्मिक टीका केली त्याचप्रकरच्या साहित्याचा प्रभाव दि. वि. यांच्या लिखाणावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.[२७]
आपण सर्वांनी ऐकलेली “सोन्याची कुऱ्हाड” ही दि. वि. जोशींनी लिहिलेली प्रसिद्ध गोष्ट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे यांनी सन १९८९ ते १९९६ (तिसरी माला) ला इयत्ता २ री च्या मराठी बालभारतीच्या अभ्यासक्रमास होती.[२८]
इतर मानसन्मान
संपादन- Who's who of Indian Writers, 1999 ; साहित्य कला अकादमी [१]
- विदर्भ साहित्य संघ जिल्हास्तरीय साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष (१९९०)[ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्र राज्य साहित्य परीक्षण मंडळ कादंबरी नेमणूक (१९९७)[ संदर्भ हवा ]
- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या साहित्यावर एम. फील व पी.एच.डी चे प्रबंध सादर.[ संदर्भ हवा ]
- पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या वेळी नभोनाट्य समीक्षक (नागपूर)[ संदर्भ हवा ]
- जळगाव नभोवाणी लोकसंगीत परीक्षक.
- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ द्वारे दरवर्षी मास्टर ऑफ आर्ट्स (मराठी) मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यास "साहित्यिक स्व. श्री दि. वि. जोशी स्मृती सुवर्णपदक" दिले जाते.[२९]
- "दिपकळ्या'' रुपककथा संग्रहास कविवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे वाङमय पुरस्कार प्राप्त. (२००७)
- "डोंगरकुस'' ह्या कादंबरीस स्व. नानासाहेब वरणगावकर स्मृति राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त (२०१२)
- "चंद्रमे जे अलांछन'' नाटकास दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी साहित्य साधना गौरव पुरस्कार (२०१२)
संदर्भ
संपादन- ^ a b Dutt, Kartik Chandra (1999). Who's who of Indian Writers, 1999: A-M (इंग्रजी भाषेत). New Delhi: Sahitya Akademi. p. 528. ISBN 978-81-260-0873-5.
- ^ "Dongarkus". www.bookganga.com. 2024-06-19 रोजी पाहिले.
- ^ "डोंगरकूस|Dongarakus". MarathiBoli (इंग्रजी भाषेत). 2023-02-11. 2024-06-24 रोजी पाहिले.
- ^ जोशी, दि. वि. (2007). सोन्याचे मांजर. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2007). चिपकचंडी (बालसाहित्य). Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2005). दिपकळ्या. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2013). पुराणातील संस्कारकथा. साकेत प्रकाशन. ISBN 9788177867749.
- ^ जोशी, दि. वि. (2006). चंद्रमे जे अलांछन. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2006). स्वप्नांना पंख नसतात. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). अतिथी. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). एक मिनीट फक्त. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). चोरीचा मामला (विनोदी) (विनोदी नाटक). Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). नशीबवान. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). नामानिराळा. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). तेथे पाहिजे जातीचे. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). पुनः प्रत्यय. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). रस्ते. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). ही गोष्टच वेगळी. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. द. ह. शतवादी. ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2010). काटशह (रहस्यमय नभोनाट्य). Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2006). डांगरवाडी. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. ऋचा ( रुपक कथा ). Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). रहस्यमय आखरी डाव. Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ जोशी, दि. वि. (2012). गफलत (रहस्यमय). Nagpur: ॠचा प्रकाशन.
- ^ भांड, बाबा. श्रेष्ठ भारतीय बालकथा - तमिळ. जोशी, दि. वि. द्वारे भाषांतरित. साकेत प्रकाशन. ISBN 9788177865950.
- ^ जोशी, दि. वि. श्रेष्ठ भारतीय बालकथा - तमिळ. साकेत प्रकाशन.
- ^ "श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ते दि. वि. जोशी - जळगावचा संपन्न वारसा ". बुलढाणा: दैनिक लोकमत. 2014.
- ^ Joshi, Di. Vi. (1990). इयत्ता दुसरी : मराठी बालभारती [धडा क्र. २१ : सोन्याची कुऱ्हाड] (Marathi भाषेत) (तिसरी माला (सन १९८९ ते १९९६) ed.). Pune: महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. pp. 53–56.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "List of Medals & Cash Prizes" (PDF). Sant Gadge Baba Amravati University. Amravati. p. 9List of Medals & Cash Prizes : Page No. 9, Regulation No. 66/2007, Name of Medal : Sahityik Late Shri. D. V. Joshi Memorial Gold Medal