दालन:मंदिर/निवडक मंदिरे
निवडक मंदिरे 1
अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे.
मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला असणारा एक अर्धमंडप, मंडप, अंतराळ, व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर अलंकृत चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आणि वर कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत.
निवडक मंदिरे 2
दालन:मंदिर/निवडक मंदिरे/2 तुळजापूर
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सति जाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला. यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.
भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.
स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥
या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.हा कळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.
गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते. गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)
सभामंड्प ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह ,खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.
येथील काही प्रेक्षणीय स्थळे:- १)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे. २)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे. ३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे. ४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे. ५)रामवरदायणी -येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावा ची पाण्याची ठिकाणे आहेत. ६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे. ७)गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे. ८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे. ९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य महाराजांचा आश्रम येथे आहे १०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.
निवडक मंदिरे 3
दालन:मंदिर/निवडक मंदिरे/3 दुर्गा मंदिर ऐहोळे कर्नाटक मधील हे सर्वात प्रसिद्ध व भव्य मंदिर आहे.याचे विधान चापाकार आहे.मंदिराच्या बाहेरच्या बाजूस स्तंभमालिका( दिल्लीतील संसद भवन प्रमाणे)आहे.गर्भगृह, मंडप व मुख्य मंडप अशी याची रचना आहे. मंदिरातील स्तंभ चौकोनी आहेत. मंदिराचे छत सपाट आहे. मंदिराच्या भिंतीवर कोनाडे किंवा देवकोष्ट केलेली आहेत. या कोनाड्यांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. संदर्भ : प्राचीन कलाभारती, म.श्री.माटे,कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे
निवडक मंदिरे 4
दालन:मंदिर/निवडक मंदिरे/4 कोणार्कचे सूर्यमंदिर ओरिसा किंवा कलिंग शैलीचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोणार्कचे सूर्य मंदिर होय.दुर्दैवाने आता या मंदिराची पडझड झालेली आहे.केवळ जगमोहन सभामंडप सोडले तर इतर कोणताच भाग सुस्थितीत नाही. काही विद्वानांच्या मते हे मंदिर पूर्ण बांधून झाले नसावे.कलिंग देशातील गंग वंशातील राजा नरसिंह देव आणि राणी सीता देवी यांनी हे मंदिर बांधले.हे मंदिर तेराव्या शतकात बांधले गेले आहे.
कोणार्कचे सूर्यमंदिर 250 मीटर लांब व 162 मीटर रुंद असून त्याचा विस्तार प्रचंड आहे. सबंध मंदिर साडेतीन मीटर उंचीच्या पिठावर बांधलेले आहे.याच चौथऱ्यावर मुख्य मंदिराच्या तीन बाजूला पूर्वी तीन सूर्य मंदिरे होती. मंदिरासमोर नाट्यमंदिर होते.मंदिराच्या प्रांगणात अग्नि शाळेची वास्तू होती.तसेच मंदिराच्या चारही दिशेला गोपुरे होती. गोपुरापासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या व मानवांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत.
निवडक मंदिरे 5
दालन:मंदिर/निवडक मंदिरे/5 कंदरिया महादेव मंदिर,खजुराहो खजुराहो येथील मंदिरे चंदेल घराण्यातील राजांनी बांधलेली आहेत. भारतीय मंदिर वास्तुकलेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे चंदेल शैलीतील खजुराहो येथील मंदिरे होय. येथील मंदिरे इसवी सन 950 ते 10 50 काळात उभारण्यात आली.
खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरातील मंडप व महामंडप यांच्या बाह्य बाजू अतिशय प्रेक्षणीय आहेत.हे मंदिर नागर स्थापत्य शैली मध्ये बांधलेले आहे. मंदिरावरील शिल्प कामांमध्ये पारंपारिक रूपके वापरलेली आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर विपुल शिल्पकाम केलेले आहे. येथील मिथुन शिल्प किंवा कामशिल्प अतिशय प्रसिद्ध आहेत. कंदारिया महादेव मंदिर तीस मीटर लांब व 30 मीटर रुंद आहे. हे मंदिर उंच पिठावर बांधलेले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.अर्धमंडप,मंडप, महामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणामार्ग अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या तीनही बाजूला सज्जे केलेले आहेत. या मंदिरावर पायथ्यापासून ते शिखरापर्यंत असंख्य कोन व प्रतीकोन केलेले आहेत. इतके कोन व प्रतिकोन भारतातील इतर कोणत्याही मंदिरांवर दिसत नाहीत.
निवडक मंदिरे 6
दालन:मंदिर/निवडक मंदिरे/6 बृहदेश्वर मंदिर तामिळनाडूतील तंजावर येथे चोल घराण्यातील राज राज यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर आकाराने प्रचंड स्वरूपाचे आहे आहे. या मंदिराचे गर्भगृह तीस चौरस मीटर असून त्याची उंची 60 मीटर आहे. भारतातील सर्वात उंच शिखर असलेले हे अद्वितीय असे मंदिर आहे. गर्भग्रह,अंतराळ, मंडप,मुख्य मंडप आणि नंदीमंडप अशी या मंदिराची रचना आहे. गाभार्याच्या भोवती प्रदक्षिणामार्ग आहे. गाभार्याच्या भिंतीवर चोल काळामध्ये शिवपुराणातील चित्रे रंगवलेली आहेत बृहदेश्वर मंदिराचा परिसर आयताकार आणि विस्तृत आहे. भोवती भिंत व ओवर्या आहेत. तीन बाजूने प्रवेश द्वार आहेत.पूर्वेकडे द्राविड पद्धतीचे गोपूर आहे.
निवडक मंदिरे 7
विरुपाक्ष मंदिर
विरुपाक्ष मंदिर कर्नाटकातील पट्टदकल येथे आहे. हे मंदिर द्राविड स्थापत्यशैली मध्ये बांधलेले आहे.पट्टदकल हे ठिकाण बदामी पासून 16 किलोमीटर अंतरावर आहे. सुरुवातीच्या काळात बदामी हे शहर चालुक्यांचे राजधानीचे शहर होते. विरूपाक्ष मंदिरात तीन मुख्य मंडप मंदिरासमोर नंदी मंडप आहे.मंदिराच्या भिंतीला जाळीदार खिडक्या (जाल वातायन)व बाह्य भिंतीवर देवकोष्ठे आहेत. शिवाची वेगवेगळ्या रूपातील मूर्ती या देव कोष्टात बसवलेले आहेत. प्रवेश द्वारावरील भिंतीवर गोपुरा सारखी रचना केलेली आहे. या मंदिरातील भिंतींची विभागणी अर्धस्तंभनी दर्शवलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर शिवपुराणातील अनेक कथांचे शिल्पांकन केलेले आहे. गर्भग्रह,अंतराळ, सभामंडप, मुख्य मंडप व नंदीमंडप अशी या मंदिराची रचना आहे. <ref> प्राचीन कलाभारती म. श्री. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे <ref>
निवडक मंदिरे 8
लिंगराज मंदिर
लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिशा येथे आहे. भुवनेश्वर येथील सर्व मंदिरांमध्ये हे सर्वात मोठे व भव्य आकाराचे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ.सन 1000 च्या सुमारास झालेली आहे. मंदिराची उंची 45 मीटर आहे. गर्भगृह,जगमोहन (सभामंडप) अशी या मंदिराची सुरुवातीच्या काळातील रचना होती. नंतरच्या काळात दोन मंडप बांधण्यात आले. मंदिराच्या बाह्य भिंतीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहामध्ये त्रिभुवनेश्वरची मूर्ती आहे. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग,पृथ्वी व पातळ अशी संकल्पना त्यामागे आहे. मंदिरावर उंच शिखर असून शिखरावर असलेल्या उभ्या रूंद पट्ट्यांवर प्राण्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. लिंगराज मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरे आहेत. यामध्ये विष्णू ,गणपती, सुभद्रा, पार्वती,कार्तिकेय व बलराम इत्यादी महत्वाची मंदिरे आहेत. <ref> प्राचीन कलाभारती,म. श्री. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे <ref>
निवडक मंदिरे 9
चन्नकेशव मंदिर
चन्नकेशव मंदिर कर्नाटकातील बेलूर या ठिकाणी आहे. या मंदिराच्या गा भार्याचे विधान नक्षत्रा कृती आहे मंदिराच्या भिंतींवर विपुल प्रमाणात मूर्ती काम केलेले आहे गाभाऱ्यासमोर अंतराळ आणि त्याच्यासमोर नवरंग आहे. नवरंगाच्या तीनही बाजूला दगडाच्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. प्रवेश द्वारावर द्वाराशाखा आहे. मंदिराच्या अधिष्ठानावर अनेक थर आहेत. अधिष्ठानावर गजथर, नरथर, अश्वथर ,व्याल कोरलेले आहेत गाभार्याच्या भिंतीवर कोणाडे करून देव-देवतांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. या कोनाड्या भोवती तोरणे ,मकर तोरणे कोरलेली आहेत. मंडपाला सज्जे केले असून त्यांना आधार देण्यासाठी विविध अवस्थांमधील स्त्री मूर्ती बसवलेल्या आहेत. त्यांना कर्नाटकात मदनिका असे म्हणतात; तर उत्तर भारतात सुरसुन्दरी असे म्हणतात.सध्या मुख्य गाभार्या वरचे शिखर पडलेले आहे आणि मंडपावरचे छत सपाट आहे. <ref > प्राचीन कलाभारती. म. श्री. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे <ref>
निवडक मंदिरे 10
घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून हे ज्योतिर्लिंग वेरूळ येथे आहे औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात वेरूळ नावाचे गाव आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली या संदर्भात पद्म पुराणामध्ये कथा दिलेली आहे. घृष्णेश्वर मंदिराला धार्मिक दृष्ट्या फार महत्त्व आहे भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग असून घृष्णेश्वर मंदिर त्यापैकी एक आहे.
घृष्णेश्वर मंदिराची रचना गर्भ ग्रह व सभामंडप याप्रमाणे आहे. हे मंदिर दक्षिण दिशेकडे मुख करून बांधलेले आहे. सभामंडपामध्ये सोळा स्तंभ आहेत गर्भ ग्रहांमध्ये काळ्या पाषाणाचे स्वयंभू शिवलिंग आहे शिवलिंगा समोर पार्वतीची संगमरवरी दगडाची मूर्ती आहे मंदिराचे शिखर अत्यंत सुंदर आहे. सध्या शिखरावर सोन्याचा कळस आहे. मंदिराभोवती प्रशस्त आकाराचे प्रांगण आहे. मंदिराजवळ प्राचीन तळे असून त्याला शिवालय तीर्थ असे म्हणतात. राष्ट्रकूट घराण्यातील श्री कृष्ण पहिला या राजाने हे मंदिर बांधले. पुढील काळात अनेक राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मोगल काळामध्ये हे मंदिर उध्वस्त झाले होते मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई होळकर यांनी सर्वप्रथम या जागी शिवमंदिर बांधले. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला.
निवडक मंदिरे 11
निवडक मंदिरे 12
निवडक मंदिरे 13
निवडक मंदिरे 14
निवडक मंदिरे 15
निवडक मंदिरे 16
निवडक मंदिरे 17
निवडक मंदिरे 18
निवडक मंदिरे 19
निवडक मंदिरे 20
निवडक मंदिरे 21
निवडक मंदिरे 22
निवडक मंदिरे 23
निवडक मंदिरे 24
निवडक मंदिरे 25
निवडक मंदिरे 26
निवडक मंदिरे 27
निवडक मंदिरे 28
निवडक मंदिरे 29
निवडक मंदिरे 30
निवडक मंदिरे 31
निवडक मंदिरे 32
निवडक मंदिरे 33
निवडक मंदिरे 34
निवडक मंदिरे 35
निवडक मंदिरे 36
निवडक मंदिरे 37
निवडक मंदिरे 38
निवडक मंदिरे 39
निवडक मंदिरे 40
निवडक मंदिरे 41
निवडक मंदिरे 42
निवडक मंदिरे 43
निवडक मंदिरे 44
निवडक मंदिरे 45
निवडक मंदिरे 46
निवडक मंदिरे 47
निवडक मंदिरे 48
निवडक मंदिरे 49
निवडक मंदिरे 50