दालन:मंदिर/निवडक मंदिरे/5
कंदरिया महादेव मंदिर,खजुराहो खजुराहो येथील मंदिरे चंदेल घराण्यातील राजांनी बांधलेली आहेत. भारतीय मंदिर वास्तुकलेचा सर्वश्रेष्ठ आविष्कार म्हणजे चंदेल शैलीतील खजुराहो येथील मंदिरे होय. येथील मंदिरे इसवी सन 950 ते 10 50 काळात उभारण्यात आली.
खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिरातील मंडप व महामंडप यांच्या बाह्य बाजू अतिशय प्रेक्षणीय आहेत.हे मंदिर नागर स्थापत्य शैली मध्ये बांधलेले आहे. मंदिरावरील शिल्प कामांमध्ये पारंपारिक रूपके वापरलेली आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर विपुल शिल्पकाम केलेले आहे. येथील मिथुन शिल्प किंवा कामशिल्प अतिशय प्रसिद्ध आहेत. कंदारिया महादेव मंदिर तीस मीटर लांब व 30 मीटर रुंद आहे. हे मंदिर उंच पिठावर बांधलेले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.अर्धमंडप,मंडप, महामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणामार्ग अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या तीनही बाजूला सज्जे केलेले आहेत. या मंदिरावर पायथ्यापासून ते शिखरापर्यंत असंख्य कोन व प्रतीकोन केलेले आहेत. इतके कोन व प्रतिकोन भारतातील इतर कोणत्याही मंदिरांवर दिसत नाहीत.