दालन:मंदिर/निवडक मंदिरे/8
लिंगराज मंदिर
संपादनलिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिशा येथे आहे. भुवनेश्वर येथील सर्व मंदिरांमध्ये हे सर्वात मोठे व भव्य आकाराचे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती इ.सन 1000 च्या सुमारास झालेली आहे. मंदिराची उंची 45 मीटर आहे. गर्भगृह,जगमोहन (सभामंडप) अशी या मंदिराची सुरुवातीच्या काळातील रचना होती. नंतरच्या काळात दोन मंडप बांधण्यात आले. मंदिराच्या बाह्य भिंतीवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. गर्भगृहामध्ये त्रिभुवनेश्वरची मूर्ती आहे. त्रिभुवन म्हणजे स्वर्ग,पृथ्वी व पातळ अशी संकल्पना त्यामागे आहे. मंदिरावर उंच शिखर असून शिखरावर असलेल्या उभ्या रूंद पट्ट्यांवर प्राण्यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. लिंगराज मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरे आहेत. यामध्ये विष्णू ,गणपती, सुभद्रा, पार्वती,कार्तिकेय व बलराम इत्यादी महत्वाची मंदिरे आहेत. <ref> प्राचीन कलाभारती,म. श्री. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे <ref>