चन्नकेशव मंदिर संपादन

चन्नकेशव मंदिर कर्नाटकातील बेलूर या ठिकाणी आहे. या मंदिराच्या गा भार्‍याचे विधान नक्षत्रा कृती आहे मंदिराच्या भिंतींवर विपुल प्रमाणात मूर्ती काम केलेले आहे गाभाऱ्यासमोर अंतराळ आणि त्याच्यासमोर नवरंग आहे. नवरंगाच्या तीनही बाजूला दगडाच्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. प्रवेश द्वारावर द्वाराशाखा आहे. मंदिराच्या अधिष्ठानावर अनेक थर आहेत. अधिष्ठानावर गजथर, नरथर, अश्वथर ,व्याल कोरलेले आहेत गाभार्‍याच्या भिंतीवर कोणाडे करून देव-देवतांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. या कोनाड्या भोवती तोरणे ,मकर तोरणे कोरलेली आहेत. मंडपाला सज्जे केले असून त्यांना आधार देण्यासाठी विविध अवस्थांमधील स्त्री मूर्ती बसवलेल्या आहेत. त्यांना कर्नाटकात मदनिका असे म्हणतात; तर उत्तर भारतात सुरसुन्दरी असे म्हणतात.सध्या मुख्य गाभार्‍या वरचे शिखर पडलेले आहे आणि मंडपावरचे छत सपाट आहे. <ref > प्राचीन कलाभारती. म. श्री. माटे, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे <ref>