त्र्यंबक सपकाळे
कवी त्र्यंबक सपकाळे जन्म एप्रिल २२, इ.स. १९३०, मृत्यू जानेवारी १३, इ.स. २०१४[१] हे मराठी कवी. सुरूंग या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९७७-१९७८मध्ये साली महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
त्र्यंबक सपकाळे | |
---|---|
जन्म नाव | त्र्यंबक सांडू सपकाळे |
जन्म |
एप्रिल २२, इ.स. १९३० आव्हाने, ता.जि.जळगाव,महाराष्ट्र) |
मृत्यू |
जानेवारी १३, इ.स. २०१४ जळगाव |
राष्ट्रीयत्व | मराठी-भारतीय |
धर्म | बौद्ध |
कार्यक्षेत्र | कवी |
साहित्य प्रकार | कविता |
विषय | विद्रोही कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | सुरूंग,ब्रोकन मॅन |
प्रभाव | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
वडील | सांडू सपकाळे |
अपत्ये |
पुत्र: दिलीप सपकाळे,महेंद्र सपकाळे,राजेंद्र सपकाळे कन्या: |
पुरस्कार |
केशवसुत पुरस्कार महाराष्ट्र शासन (इ.स. १९७७-७८) |
जीवन
संपादनकवी त्र्यंबक सपकाळे एप्रिल २२, इ.स. १९३०, रोजी (आव्हाने, ता.जि.जळगाव, महाराष्ट्र) येथे झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या कवी त्र्यंबक संपकाळे यांचे प्राथमिक शिक्षण आव्हाणे व मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण जळगाव येथील विद्यानिकेतन विद्यालयात झाले होते. भारतीय रेल्वेत तिकीट संग्राहकची(तिकीट कलेक्टर) नोकरी सांभाळत हजारो लोकांशी संपर्कात येऊन त्यांच्या दुःखाच्या भावना सुरूंग मध्ये मांडल्या. सुरूंग कविता संग्रहाचा विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.लोकशाहीचा फुलोरा, वर्तुळाचा परीघ,सूर्य,या झुंडशाहीत,मला देश विकायचा आहे,क्रांतीदूत कावळे,ओयासिस,या सारख्या कविता गाजल्या आहेत. तसेच काव्यसंग्रहातील काही निवडक कविता जपान, इंडोनेशिया आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. [२]
प्रकाशित साहित्य
संपादनसाहित्यकृती | साहित्यप्रकार | प्रकाशक | प्रकाशन वर्ष (इ.स.) | आवृत्ती |
---|---|---|---|---|
सुरूंग (कवितासंग्रह) | कवितासंग्रह | इ.स. १९७२ | १९७२ | |
ब्रोकन मॅन (कवितासंग्रह) | कवितासंग्रह | इ.स. | - | |
(कवितासंग्रह) | कवितासंग्रह | इ.स. |
कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता
संपादन" नागडा आलो,
पण इथेही नागवला गेलो
समाजपुरुषाच्या अहंकाराने
हे संस्कृतीप्रिय देशा !
माझा नागडेपणा तुला
कधी झाकताच आला नाही ."
कवितासंग्रह:सुरूंग
गौरव
संपादन- १९९२ साली जालना येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
पुरस्कार
संपादननिधन
संपादनविद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे यांचे दि.१३ जानेवारी २०१४ रोजी राहत्या घरी निधन झाले यांच्या पार्थिवावर नेरी नाका स्मशानभूमित बौद्ध धर्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत़े अजिंठा हौसिंग सोसायटीतील त्यांच्या राहत्या घरून अत्यंयात्रेस सुरुवात झाली. अंत्ययात्रेत अस्मितादर्श चळवळीचे अध्वयरू डॉ.गंगाधर पानतावणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा़.फ.मु़ शिंदे,भंते सुगतवंस महाथेरो, डॉ.मिलिंद बागुल, जयसिंग वाघ,ना़तू़पोहे,सुरेश साबळे, शशिकांत हिंगोणेकर, मुकुंद सपकाळे,प्रा.डॉ.म़सु़पगारे, बाबुराव वाघ, अशोक कोतवाल, डॉ.संजीवकुमार सोनवणे, प्रकाश किनगावकर, नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, प्राचार्य किसन पाटील, अ़फ़भालेराव, शंभू पाटील, मुकुंद नन्नवरे, अनिल पाटील, नामदेव कोळी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होत़े नेरी नाका स्माशनभूमीत कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव राजेंद्र सपकाळे यांनी अग्निडाग दिला़ मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली़
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "सुरुंग'कार विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे यांचे निधन". 2015-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
- ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-14-01-2014-791eb&ndate=2014-01-14&editionname=main[permanent dead link]
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |