ताश्कंद

(ताश्कंत या पानावरून पुनर्निर्देशित)


ताश्कंद (लेखनभेद: ताश्केंत, उझबेक: Toshkent, Тошкент; रशियन: Ташкент) ही मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व त्या देशातले सगळ्यात मोठे शहर व तोश्केंत विलायती ह्या प्रांताची राजधानी आहे. ताश्कंद शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ आल्ताय पर्वतरांगेच्या पूर्वेस व चिर्चिक नदीच्या काठावर वसले आहे. ताश्कंदचा भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये असून येथे अनेकदा मोठ्या भूकंपांची नोंद झाली अहे. २६ एप्रिल १९६६ रोजी येथे झालेल्या ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपात येथील बव्हंशी कच्च्या इमारती जमीनदोस्त झाल्या व सुमारे ३ लाख रहिवासी बेघर झाले.

ताश्कंद
Toshkent
उझबेकिस्तान देशाची राजधानी


चिन्ह
ताश्कंद is located in उझबेकिस्तान
ताश्कंद
ताश्कंद
ताश्कंदचे उझबेकिस्तानमधील स्थान

गुणक: 41°16′N 69°13′E / 41.267°N 69.217°E / 41.267; 69.217

देश उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५ वे ते ३ रे शतक
क्षेत्रफळ ३३४.८ चौ. किमी (१२९.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर २३,०९,६००
  - घनता ६,९०० /चौ. किमी (१८,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००
http://tashkent.uz/

अनेक शतकांचा इतिहास असलेले ताश्कंद शहर ८व्या शतकात इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली आले. इ.स. १२१९ साली मंगोल सम्राट चंगीझ खान ह्याने ताश्कंद शहर संपूर्णपणे उद्ध्वस्त केले. परंतु रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र असल्यामुळे ताश्कंद शहर पुन्हा बांधले गेले व भरभराटीला पोचले. इ.स. १८६५ साली रशियन साम्राज्याने ताश्कंदवर अधिपत्य मिळवले. सन १९२० व १९३० च्या दशकांदरम्यान सोव्हिएत संघ काळात ताश्कंदचे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले.. १९३० साली उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी समरकंदवरून ताश्कंदला हलवली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम रशियामधील अनेक कारखाने ताश्कंदला हलवण्यात आले. त्यामुळे ताश्कंदचे महत्त्व अधिकच वाढले. सोव्हिएत राजवटीने येथे अनेक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संशोधन संस्था देखील प्रस्थापित केल्या. १९९१ सालच्या सोव्हिएतच्या विघटनापूर्वी ताश्कंद हे सोव्हिएतमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.

आज २०१५ साली, ताश्कंद उझबेकिस्तानमधील आघाडीचे शहर आहे. येथील ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ उझबेकिस्तानमधील सर्वात वर्दळीचा असून तो उझबेकिस्तान एअरवेजचा प्रमुख वाहतूकतळ आहे.

गॅलरी

संपादन

जुळी शहरे

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत