तळोजा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर पनवेलच्या ९ किमी उत्तरेस व खारघरच्या ४ किमी पूर्वेस स्थित असलेल्या तळोजा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे संकूल आहे. सिडको ह्या सरकारी संस्थेने तळोजामधील पायाभूत सुविधा बांधण्याची जबाबदारी घेतली असून सध्या तळोजा नवी मुंबई भागातील वेगाने प्रगती करणाऱ्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रामधील एक मोठे कारागृह तळोजा येथेच आहे.

तळोजा
भारतामधील शहर

तळोजा शहराचे दृश्य
तळोजा is located in महाराष्ट्र
तळोजा
तळोजा
तळोजाचे महाराष्ट्रमधील स्थान

गुणक: 19°4′00″N 73°5′34″E / 19.06667°N 73.09278°E / 19.06667; 73.09278

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा रायगड जिल्हा
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

सध्या तळोजा भागातील तळोजा-पंचानंद व नावडे रोड ही दोन रेल्वे स्थानके दिवा-पनवेल ह्या मार्गावर स्थित आहेत. तसेच वाहतूकीसाठी एन.एम.एम.टी. ह्या बससेवेचे काही मार्ग तळोजामध्ये उपलब्ध आहेत. नवी मुंबई मेट्रो ह्या जलद परिवहन प्रणालीचे काम चालू असून भविष्यात मेट्रोद्वारे तळोजा ते सी.बी.डी. बेलापूरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवास सुलभ होईल.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

बाह्य दुवे

संपादन