उल्हास वासुदेव पाटील

(डॉ. उल्हास वासुदेव पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. उल्हास वासुदेव पाटील (२३ फेब्रुवारी १९६०) हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व रावेर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आहे. काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये डॉ.उल्हास पाटील यांचे नाव घेतले जाते. सध्या ते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. [] काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीतील नेत्यांमध्ये डॉ.उल्हास पाटील यांचे नाव घेतले जाते. सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी जळगाव जिल्हा हा भाजपचा गड झाला होता.  अशा स्थितीतही त्यांना तब्बल ५६ हजार ५१४ मतानी ते विजयी झाले होते.[] मात्र त्यांना खासदारकीचा पाच वर्षांचा पूर्ण कालावधी मिळाला नाही. अवघे 13 महिन्यात सरकार कोसळले, लोकसभा बरखास्त झाली. पुन्हा झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अवघ्या तेरा महिन्यांचा विरोधी पक्षाचा कालावधी मिळाल्यानंतरही त्यांनी जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले, अर्थात ते खासगी आहे. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालय, सहकारी बँक, विधी महाविद्यालय, फॅशन डिझायनिंग कॉलेज सुरू केले.

डॉ. उल्हास वासुदेव पाटील
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
मतदारसंघ जळगाव

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र

जन्म २३ फेब्रुवारी, १९६० (1960-02-23) (वय: ६४)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष काँग्रेस
आई गोदावरी पाटील
वडील वासुदेव पाटील
पत्नी डॉ. वर्षा पाटील
अपत्ये १ मुलगा, १ मुलगी

डॉ. अनिकेत पाटील
डॉ. केतकी पाटील

शिक्षण एम.बी.बी.एस., एम.डी.
व्यवसाय डॉक्टर, राजकारण
धर्म हिंदू

सातपुड्याच्या कुशीत असलेल्या रावेर तालुक्यातील विवरे गावातील एका शेतकरी कुटुंबात उल्हास पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासून कुशाग्र बुद्धमत्ता लाभलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची पदवी घेऊन जळगावात वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. घरात राजकारणाचा गंधही नव्हता. त्यामुळे त्या वाटेला जाणे शक्यच नव्हते; परंतु माजी मंत्री (कै.) बाळासाहेब चौधरी यांच्यामुळे ते सन १९७८ मध्ये तरुण वयातच काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. सुरुवातीला ते पुणे जिल्हा युवक काँग्रेस सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. यावेळी त्यांच्यातीले नेतृत्वगुण ठळकपणे समोर आले. तेंव्हापासून ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते निवडून देखील आले मात्र त्यांना केवळ १३ महिन्यांची खासदारकी मिळाली. १३ महिन्यांच्या खासदारकीनंतर सन १९९९ मध्ये ते पराभूत झाल्यानंतर २००४ मध्येही त्यांनी काँग्रेसतर्फे कडवी लढत दिली, अवघ्या वीस हजार मतांनी ते पराभूत झाले. सन २००७ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. सन २००९ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तर २०१४ मध्येही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिली. मात्र, त्यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली.[] मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच होती. काँग्रेसने या जागेची मागणी केली. मात्र राष्ट्रवादीने लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना उमेदवार न मिळाल्याने अखेर पक्षाने ही जागा काँग्रेसला सोडली. काँग्रेसतर्फे डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. [] मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र जळगाव जिल्हा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये डॉ. उल्हास पाटील यांचे मोठे वजन आहे. काँग्रेस पक्षात कितीतरी चढ उतार आले तरी त्यांनी काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याने त्यांच्या कार्याची दखल दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी घेत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली.

शिक्षण

संपादन
  • एम.बी.बी.एस (१९८३)
  • एम.डी (स्त्रीरोग तज्ञ) एप्रिल १९८७
  • एफ.आय.एम.सी.एच., बी.जे. मेडिकल कॉलेज पुणे

राजकीय व संसदीय जबाबदाऱ्या

संपादन
  • महाविद्यालयीन दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य म्हणजे. (सन १९७८ पासून)
  • सहसचिव, युवक काँग्रेस, जिल्हा पुणे.
  • १२व्या लोकसभेसाठी खासदार
  • १३ आणि १४व्या लोकसभेसाठी लोकसभेचे उमेदवार
  • २००४ मध्ये केवळ २०,००० मतांनी १४वी लोकसभा पराभूत
  • मानवी संसदीय स्थायी समितीचे सदस्य संसाधन विकास (बारावी लोकसभा)
  • आरोग्य मंत्रालयासाठी संसदीय सल्लागार सदस्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. (बारावी लोकसभा)
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य विज्ञान नवी दिल्ली. (१९९८ - १९९९)
  • वैद्यकीय शिक्षण समितीचे सदस्य, भारत सरकार (१९९८ - १९९९)
  • एड्स नियंत्रण समितीचे सदस्य (१९९८ - १९९९)

व्यावसायिक पार्श्वभूमी

संपादन
  • ससून हॉस्पिटल, पुणे येथील वैद्यकीय अधिकारी.
  • माजी स्त्रीरोग विभाग प्रमुख: सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव.
  • जळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य स्त्रीरोगतज्ञ म्हणून परिचित. जळगाव येथे १९९० पासून आजपर्यंत १०० खाटांची रुग्णालय.
  • मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदविका आणि पदवीसाठी पदव्युत्तर शिक्षक म्हणून काम.
  • प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांमध्ये विविध शोधनिबंध सादर.

समाजकार्य

संपादन
  • स्वयंसेवी संस्था अर्थात गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष. सदर संस्था नोंदणीकृत असून १९९३ पासून कार्यरत आहे.
  • गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असून येथे दररोज सुमारे १००० रुग्णांवर बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि इनडोअरमध्ये उपचार केले जातात.
  • या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या सवलतीच्या दरात जळगाव, बुलढाणा, अकोला, बुरहानपूर येथील सर्वसामान्य माणसाला अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
  • जळगाव जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजू रूग्णांवर मोफत उपचार करणे.
  • वैद्यकीय निदान, डोळा, कर्करोग शोधणे, हृदयरोग तपासणी, पल्स पोलिओ कार्यक्रम, एड्स शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान, मोती बिंदू, कान-नाक-घसा तपासणी, कुटुंब नियोजन कार्यक्रम.

शैक्षणिक संस्था

संपादन
  • डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये एमबीबीएसच्या २०० जागांची क्षमता असलेला अभ्यासक्रम.
  • अभियांत्रिकी महाविद्यालय
  • नर्सिंग कॉलेज (डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम)
  • मॅनेजमेंट कॉलेजेस
  • कृषी अभियांत्रिकी आणि कृषी महाविद्यालय
  • फिजिओथेरपी कॉलेज
  • कॉलेज ऑफ फिजिशियन अंतर्गत पदव्युत्तर संस्था आणि प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग डिप्लोमासाठी सर्जन.
  • डीएनबी, नवी दिल्ली अंतर्गत पदव्युत्तर संस्था स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मध्ये पदवीधर डिप्लोमा.
  • पदवीधर विज्ञान महाविद्यालय (जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र)
  • गृहविज्ञान, फॅशन डिझाईनमधील पदविका अभ्यासक्रम (महिला), इंटिरियर डिझाइन.
  • संगीत, ललित कला आणि पदवी आणि पदव्युत्तर संस्था
  • जळगाव, भुसावळ आणि सावदा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा.
  • लॉ कॉलेज: ३ आणि ५ वर्षे दोन्ही पदवी अभ्यासक्रम.
  • दंत, होमिओपॅथी इन्स्टिट्यूट्स

सांस्कृतिक

संपादन
  • अध्यक्ष व संघटन सचिव: प्रथम खान्देश साहित्य संमेलन, जळगाव.
  • सदस्य: जिल्हा साहित्य संघ, जळगाव.
  • कवी संमेलन, साहित्य संमेलन, संगीत स्पर्धा, नाट्य स्पर्धा आदींचे दरवर्षी आयोजन.

सहकार

संपादन
  • संस्थापक अध्यक्ष: गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक लि., जळगाव
  • मुख्य प्रवर्तक: गोदावरी केळी उत्पादक सह-ऑपरेटिव्ह मार्केटिंग आणि प्रोसेसिंग लि. (प्रस्तावित)

संदर्भ

संपादन
  1. ^ ब्यूरो, सरकारनामा (2021-08-27). "प्रदेश काँग्रेस उपाध्यपदी डॉ. उल्हास पाटील तर जळगाव शहर अध्यक्षपदी श्याम तायडे". Sarkarnama. 2023-05-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Loksabha 2019 : रावेरमधून डॉ. उल्हास पाटलांसाठी "करो..या...मरो'". eSakal - Marathi Newspaper. 2023-05-24 रोजी पाहिले.
  3. ^ "डॉ. उल्हास पाटील यांनी माघार घ्यावी". Maharashtra Times. 2023-05-24 रोजी पाहिले.
  4. ^ "रावेरची जागा काँग्रेसला, डॉ. उल्हास पाटील प्रबळ दावेदार". Lokmat. 2019-03-29. 2023-05-24 रोजी पाहिले.