अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम

एच.आय.व्ही. विषाणुच्या संसर्गामुळे होणारी परिस्थिती

एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम" एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होणे शक्य असते. त्यांवर इलाज करणेही अवघड होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.[१]

एच्आयव्ही विषाणुची रचना

एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणे आहेत - ""असुरक्षित लैंगिक संबंधातून", "बाधित रक्तातून" तसेच बाधित आईकडून अर्भकाला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि यूएनएड्स यांच्यानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित विषमलैंगिक (हेट्रोसेक्शुअल) संबंधांतून पसरत आहे. भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष [२] झाले आहे. एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. इ.स.१९८१ मध्ये सुमारे ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत.

एड्सचा प्रसार संपादन

एड्स यापैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो :

 • असुरक्षित लैंगिक संबंध
 • दूषित रक्त चढवल्याने
 • संसर्गित आईकडून अर्भकाला
 • बाधित आईकडून स्तनपान करणाऱ्या मुलाला
 • दूषित सुईतून

एड्सचा प्रतिबंध संपादन

 
एच्आयव्ही किंवा एडस्चे चिन्ह्

एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही 'ॲंटीरेट्रोव्हायरल' औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून खालील प्रतिबंधात्मक गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

 • एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
 • लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.
 • तुम्हाला एच. आय. व्ही. संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एच. आय. व्ही. संसर्ग तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते.
 • जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
 • रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.
 • इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा.

एड्सची लक्षणे संपादन

एच.आय.व्ही.चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. काही लक्षणे खाली दिली आहेत.

 • ताप
 • डोकेदुखी
 • थकवा
 • मळमळ आणि भूक कमी होणे
 • लसिकांची सूज
 • नागीण
 • वजन कमी होणे (६ महिन्यात १० किलोपेक्षा जास्त)
 • वारंवार तोंड येणे
 • वारंवार जुलाब
 • वारंवार आजारी पडणे
 • अंगावर लालसर डाग येणे

ही सर्व लक्षणे साध्या रोगांत दिसून येतात त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही.

उपचार संपादन

एच. आय. व्ही. वर उपचार उपलब्ध असून सरकारी रुग्णालयात ए. आर. टी. मोफत मिळते. असे औषधे आता उपलब्ध आहे ज्याना प्रति उत्त्क्रम-प्रतिलिपि-किण्वक विषाणु चिकित्सा [anti reverse transcript enzyme viral therapy or anti-retroviral therapy] औषधच्या नावाने ओळखले जाते. सिपलाची ट्रायोम्यून या सारखे औषध महाग आहेत.प्रति व्यक्ति वार्षिक खर्च सुमारे 15000 रुपये होताे आणि हे प्रत्येक जागी सहज मिळत नाही। याच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही.जर या औषधांना घेणे थांबवले तर आजार परत वाढतो म्हणून एकदा आजार झाल्यावर हे आयुष्य भर घ्यायला लागतात.जर औषध बंद केले तर आजाराचे लक्षण वाढते व एड्स ने ग्रस्त व्यक्तिचा मृत्यू होतो.

बाह्यदुवे संपादन

संदर्भ संपादन

 1. ^ "एड्स काय आहे?". Archived from the original on 2007-02-12. 2007-03-02 रोजी पाहिले.
 2. ^ "भारतात आजपर्यंत एड्‌सकडे दुर्लक्ष".