खोकला
खोकला ही शरीराची संरक्षणात्मक प्रतिक्षिप्त क्रिया असून याद्वारे श्वसनमार्गातील क्षोभजनक पदार्थ, धूर, धूलीकण, प्रदूषित हवा किंवा श्वसनमार्गातील जंतू फुप्फुसातून सोडलेल्या हवेच्या दाबाने बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासनलिकांत अडकलेले स्राव काढून टाकून श्वासनलिका मोकळ्या व्हाव्यात हा खोकल्याचा हेतू होय.
स्वरूप
संपादनयामध्ये तीन क्रिया होतात. प्रथम मोठा श्वास घेतला जातो. नंतर ध्वनियंत्रणेच्या पट्ट्या एकमेकांजवळ येतात. छाती व पोट यातील विभाजन पटल (डायफ्रॅम) सैल होतो व छातीच्या पोकळीतील दाब वाढतो. फुप्फुसातील दबलेली हवा कंठद्वारामधून एकदम व मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची क्रिया व एक विशिष्ट आवाज याने खोकला निदर्शित होतो. खोकला अपोआप किंवा मुद्दामही काढत येतो. जर एखाद्याला सारखा सारखा खोकला येत असेल तर असे समजायला हरकत नाही, की त्याला एखाद रोग झाला आहे.[१]
उपाय
संपादन- रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या आधी एक-दीड ग्लास ताजे पाणी प्यावे. नंतर झोपायच्या १० मिनिटे आधी १०० ग्रॅम गूळ खवा गूळ खल्यांनातर मुळीच पाणी पिऊ नये फक्त चूल भरावी,सकाळ पर्यंत सर्दी पडसे बरे होते. डायबिटीज असलेल्या लोकांनी हा उपाय लेकरू नये.
- रोज सकाळी ७-८ तुळशीची पाने आणि २ काळी मिरी खाल्याने कधीच सर्दी पडसे होत नाही.
- ज्यांना सारखे पडसे होत असते. अशांसाठी एक उत्तम उपाय, ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे हलके जेवण करावे. त्या आधी २-३ मसालेदार व तळलेल्या पदार्थाचे सेवन बंद करावे. संध्याकाळच्या जेवणानंतर २ तासाची रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून कुटावे. त्यात थोडं तूप टाकून कणके सारखे मळावे. त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून पलटू कपड्याने दाबून शिकावी चांगली कुरमरीत शेकून झाल्यावर ताजी गरम खावी त्यानंतर पाणी पिऊ नये.
- पादेलोनाचा एक खडा आगीत तापवावा. नंतर चिमट्याने धरून अर्धा पेला पाण्यात बुडवून काढून घ्यावा. नंतर ते पाणी पिऊन घ्यावे.
- १०ग्रॅंॅंम आल्याचा रस, १०ग्रॅंॅंम मधात गरम करून दिवसातून २ वेळा प्यावे. दमा, खोकला यास उत्तम औषध आहे. आंबट खाऊ नये.[२]
- अर्धा चमचा दालचिनी पावडर एक ग्लास दुधात मिसळून उकळावे व ते गाळून प्यावे, याने कप व खोकला निघून जातो.
प्रसार
संपादनखोक्ल्यामुळेच अनेक सूक्ष्मजीवांना कमालीची मदत होते- एकतर खोकला ते घडवून आणतातच, पण वरून ह्याच खोकल्यावाटॅ त्यांचा हवेतून प्रसार होतो. त्यामुळे खोकताना काळजी घेणे बरे की आपल्या संसर्गामुळे दुसऱ्याला तर खोकला होणार नाही. सर्वाधिक वेळी खोकला हा श्वसनमार्गातील संक्रमणामुळे येतो. परंतु, खोकला हा रोग नसून ती रोग घालवण्याच्या प्रयत्नातली प्रतिक्रिया आहे. पण याशिवाय धूम्रपान, दूषित हवेचे श्वसन, दमा, दीर्घकालीन ब्रोंकायटिस, फुप्फुसातील कर्करोग, हृदयविकार यांमुळेही घडतो. अनेकवेळी लोक यावर चुकीचा उपचार सांगतात. पुन्हा एकदा, खोकला ही एक प्रतिक्रिया असून तो आजार नाही. तरी औषध घेताना असे घ्या ज्याने श्वासानातील विकार दूर होईल. याउलट 'कोडीन' ह्याप्रकारचे औषध घेतल्यास तात्पुरता खोकला दूर होऊ शकतो, पण याचाच अर्थ फक्त खोकला थांबला आहे. तर एकीकडे व्याधी/रोग वाढतच जाणार आहे.
दुखापत
संपादनअतिरेकाने श्वासनलिकांच्या अस्तराला इजा पोचू शकते. या अस्तराला झालेल्या दुखापतीमुळे पुन्हा खोकला येतो. याप्रमाणे खोकल्यामुळे अस्तराला अपाय व अपायामुळे पुन्हा खोकला असे दुष्टचक्र स्थापले जाते.
उपाय
संपादनवर्गीकरण
संपादन[[:File:Husten-abf-.ogg|]]
खोकल्याचा आवाज
| |
ही संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |
हळद व सुंठ दुधाबरोबर काढा करून पिल्यास आराम मिळतो. गरम पाण्यामध्ये मीठ टाकुन गुळण्या कराव्यात.
संदर्भ
संपादनबाह्यदुवे
संपादन- खोकला Archived 2014-08-02 at the Wayback Machine.
- [३]
- [४]