डीट्रॉइट

अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर
(डेट्रोईट या पानावरून पुनर्निर्देशित)

डीट्रॉइट (इंग्लिश: Detroit; स्थानिक प्रचलित उच्चार : डेट्रॉईट) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डीट्रॉइट शहर मिशिगनच्या आग्नेय भागातील वेन काउंटीमध्ये डीट्रॉइट नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलिकडील बाजूस कॅनडातील विंडसर हे शहर आहे.

डीट्रॉइट
Detroit
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
डीट्रॉइट is located in मिशिगन
डीट्रॉइट
डीट्रॉइट
डीट्रॉइटचे मिशिगनमधील स्थान
डीट्रॉइट is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डीट्रॉइट
डीट्रॉइट
डीट्रॉइटचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 42°19′53″N 83°02′45″W / 42.33139°N 83.04583°W / 42.33139; -83.04583

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिशिगन
स्थापना वर्ष इ.स. १७०१
क्षेत्रफळ ३७०.४ चौ. किमी (१४३.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६०० फूट (१८० मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,१३,७७७
  - घनता १,९८५.३ /चौ. किमी (५,१४२ /चौ. मैल)
  - महानगर ४२,९६,२५०
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
DetroitMI.gov


डीट्रॉइट शहर येथील मोटारवाहन उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. फोर्ड, जनरल मोटर्स तसेच क्रायस्लर ह्या जगप्रसिद्ध मोटार कंपन्यांची मुख्यालये डीट्रॉइट आणि त्याच्या उपनगरांत असल्याने हे शहर जगाची मोटारवाहन राजधानी (Automobile Capital of World) ह्या नावाने तसेच मोटर सिटीमोटाऊन ह्या टोपणनावांनीदेखील ओळखले जाते.[][]

२४ जुलै १७०१ रोजी ॲंतोइन देला मोथा कादिलाक ह्या फ्रेंच शोधकाने डीट्रॉइटची स्थापना केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हेन्री फोर्ड व इतर उद्योगपतींनी येथे मोटार कारखाने उघडले व अमेरिकन मोटार उद्योगाचे डीट्रॉइट हे सर्वात मोठे केंद्र बनले ज्यामुळे ह्या भागाचा झपाट्याने विकास झाला. प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असताना १९५० च्या दशकामध्ये डीट्रॉइट हे अमेरिकेतील पाचवे मोठे शहर होते. तेव्हापासून येथील मोटार उद्योगाची अधोगती, शहरातील रहिवाशांचे उपनगरांमध्ये स्थलांतर इत्यादी विविध कारणांमुळे डीट्रॉइट शहराची लोकसंख्या घटत आहे. २००० ते २०१० ह्या १० वर्षांदरम्यान डीट्रॉइटची लोकसंख्या २५ टक्के घसरली आहे.[][] आजच्या घडिला ७.१३ लाख लोकसंख्या असलेले डीट्रॉइट शहर अमेरिकेतील १८व्या क्रमांकाचे शहर आहे तर ४३ लाख वस्ती असलेले डीट्रॉइट महानगर क्षेत्र अमेरिकेत ११व्या स्थानावर आहे.

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

डेट्रॉईट शहर डीट्रॉइट नदीच्या काठावर वसले असून कॅनडा देशाच्या सीमेवरील ते सर्वात मोठे शहर आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ १४३.० चौरस मैल (३७० चौ. किमी) इतके असून त्यापैकी ४.२ चौरस मैल (११ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे.

हवामान

संपादन

ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे डीट्रॉइटचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.

डीट्रॉइट विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 67
(19)
70
(21)
82
(28)
89
(32)
95
(35)
104
(40)
105
(41)
104
(40)
100
(38)
92
(33)
81
(27)
69
(21)
105
(41)
सरासरी कमाल °फॅ (°से) 31.1
(−0.5)
34.4
(1.3)
45.2
(7.3)
57.8
(14.3)
70.2
(21.2)
79.0
(26.1)
83.4
(28.6)
81.4
(27.4)
73.7
(23.2)
61.2
(16.2)
47.8
(8.8)
35.9
(2.2)
58.43
(14.67)
सरासरी किमान °फॅ (°से) 17.8
(−7.9)
20.0
(−6.7)
28.5
(−1.9)
38.4
(3.6)
49.4
(9.7)
58.9
(14.9)
63.6
(17.6)
62.2
(16.8)
54.1
(12.3)
42.5
(5.8)
33.5
(0.8)
23.4
(−4.8)
41.03
(5.02)
विक्रमी किमान °फॅ (°से) −21
(−29.4)
−20
(−28.9)
−4
(−20)
8
(−13.3)
26
(−3.3)
36
(2)
42
(6)
38
(3)
29
(−1.7)
17
(−8.3)
0
(−17.8)
−11
(−23.9)
−21
(−29.4)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 1.91
(48.5)
1.88
(47.8)
2.52
(64)
3.05
(77.5)
3.05
(77.5)
3.55
(90.2)
3.16
(80.3)
3.10
(78.7)
3.27
(83.1)
2.23
(56.6)
2.66
(67.6)
2.51
(63.8)
32.89
(835.6)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 11.3
(28.7)
9.2
(23.4)
6.8
(17.3)
1.7
(4.3)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
.3
(0.8)
2.9
(7.4)
11.1
(28.2)
43.3
(110.1)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 13.4 11.3 12.7 12.6 11.6 10.1 9.6 9.5 9.9 9.8 12.3 13.9 136.7
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 10.9 7.9 5.5 2.1 0 0 0 0 0 .3 3.5 9.0 39.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 120.9 138.4 186.0 216.0 275.9 303.0 316.2 282.1 228.0 176.7 105.0 86.8 २,४३५
स्रोत: HKO (sun, 1961–1990)[]

जनसांख्यिकी

संपादन
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८२० १,४२२
इ.स. १८३० २,२२२ +५६%
इ.स. १८४० ९,१०२ +३०९%
इ.स. १८५० २१,०१९ +१३०%
इ.स. १८६० ४५,६१९ +११७%
इ.स. १८७० ७९,५७७ +७४%
इ.स. १८८० १,१६,३४० +४६%
इ.स. १८९० २,०५,८७७ +७७%
इ.स. १९०० २,८५,७०४ +३८%
इ.स. १९१० ४,६५,७६६ +६३%
इ.स. १९२० ९,९३,६७८ +११३%
इ.स. १९३० १५,६८,६६२ +५७%
इ.स. १९४० १६,२३,४५२ +३%
इ.स. १९५० १८,४९,५६८ +१३%
इ.स. १९६० १६,७०,१४४ −९%
इ.स. १९७० १५,१४,०६३ −९%
इ.स. १९८० १२,०३,३६८ −२०%
इ.स. १९९० १०,२७,९७४ −१४%
इ.स. २००० ९,५१,२७० −७%
इ.स. २०१० ७,१३,७७७ −२५%

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणाऱ्या डीट्रॉइटची लोकसंख्या १९५० साली सर्वाधिक होती व ते अमेरिकेमधील पाचवे मोठे शहर होते. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. त्याचबरोबर येथील मोटार उद्योगाची अधोगती होत असल्यामुळे अनेक लोक इतरत्र स्थानांतरित झाले आहेत. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान डीट्रॉइटची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ७,१३,७७७ लोकसंख्या असलेल्या डीट्रॉइटमधील ८२.७ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. आजच्या घडीला डीट्रॉइट शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी व दारिद्र्य आहे तर डीट्रॉइटची अनेक उपनगरे उच्चभ्रू व श्रीमंत आहेत.

अर्थव्यवस्था

संपादन

वाहतूक

संपादन

खालील चार व्यावसायिक संघ डीट्रॉइट महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले डीट्रॉइट हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
डीट्रॉइट लायन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग फोर्ड फील्ड १९३०
डीट्रॉइट पिस्टन्स बास्केटबॉल द पॅलेस ऑफ ऑबर्न हील्स नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन १९४१
डीट्रॉइट रेड विंग्ज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग जो लुईस अरेना १९२६
डीट्रॉइट टायगर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल कोमेरिका पार्क १८९४

शहर रचना

संपादन
डीट्रॉइट आंतरराष्ट्रीय नदीकाठ

डीट्रॉइटची काही उपनगरे

संपादन
  1. डिअरबॉर्न
  2. लिव्होनिया
  3. वॉरन
  4. कॅंटन
  5. ट्रॉय
  6. फार्मिंग्टन हिल्स

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

संपादन
  1. ^ "Michigan Cities". Encyclopedia Britannica Online. April 8, 2007 रोजी पाहिले. [Detroit] is the automobile capital of the world
  2. ^ "SAE World Congress convenes in Detroit". April 12, 2007 रोजी पाहिले.
  3. ^ "Annual Estimates of the Resident Population for Incorporated Places over 100,000, Ranked by July 1, 2009 Population: April 1, 2000 to July 1, 2009". U.S. Census Bureau. July 1, 2009 रोजी पाहिले.
  4. ^ Wisely, John; Spangler, Todd (March 24, 2011). "Motor City population declines 25%". USA Today. June 20, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: authors list (link)
  5. ^ "Climatological Normals of Detroit". Hong Kong Observatory. 2011-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 13, 2010 रोजी पाहिले.