जरुळ
जरुळ (Jarul) महाराष्ट्र राज्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक छोटेसे खेडेगांव आहे. ते वैजापूरपासून साधारणतः ९ कि. मी. अंतरावर सारंगी नदीकिनारी वसलेले आहे.
?जरुळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५१४ मी |
जिल्हा | औरंगाबाद |
लोकसंख्या | २,९७४ (2011) |
कोड • दूरध्वनी |
• +०२४३६ |
इतिहास
संपादनहे एक जुने छोटेसे खेडे असून, येथील रहिवासी राजेरजवाड्यांच्या आठवणी सांगतात. असे मानले जाते की सूर्यवंशी राजा निकमवंशीय पिढ्या येथे नांदत आहेत[ संदर्भ हवा ]. कालांतराने, मूळचे निकम हे आडनांव बदलून त्याचे मतसागर असे बनले.[ संदर्भ हवा ]
प्रशासन
संपादनपंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मूळ घटक असलेली ग्रामपंचायत येथील प्रशासन चालवते.
ग्रामपंचायत
संपादन- निर्वाचित प्रमुख नाव: श्री. दिगंबर परसराम मतसागर सरपंच [ संदर्भ हवा ] - निर्वाचित ऊपप्रमुख नाव: श्री. हिराबाई भास्करराव कुहिले ऊपसरपंच[ संदर्भ हवा ]
- सामाजिक सौख्य नांदवने[ संदर्भ हवा ]
- विविध सामाजिक कार्ये पार पाडने[ संदर्भ हवा ]
- उत्सव साजरे करने[ संदर्भ हवा ]
- देवस्थानांची निगा राखने[ संदर्भ हवा ]
समाजव्यवस्था
संपादनखालील अनेक जातीधर्माची लोक येथे वर्षानुवर्षापासुन गुन्यागोविंदाने नांदत आहेत.[ संदर्भ हवा ]
सोसायटी
संपादन- कर्ज वाटपासाठी विविध विकास कार्यकारी (वि. वि. का.) सोसायटी. - सदस्य संख्या १३. चेरमन, रुस्तुम जगन मतसागर. उप-चेरमन, दिनकर कारभारी कुहिले. - कर्जांचे प्रकार: पिक कर्ज, बायोगॅस (गोबर गॅस) कर्ज, पाईपलाईन कर्ज.[ संदर्भ हवा ]
नागरी सुविधा
संपादन- जलपुरवठा संकुल (जलकुंभ)
- नळ परियोजना
- सरकारी दवाखाना व औषधालय (प्राथमिक आरोग्य केंद्र)
- मासिक लसीकरण योजना
- गरीब व होतकरु आदिवासी विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह
- बस स्थानक
- व्यापारी संकुल
- गुरांचा (जनावरांचा) दवाखाना
उद्योगधंदे
संपादनमहाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाने येथे नवीन औद्यौगिक वसाहत निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून, काही छोटे प्रकल्प येथे होऊ घातले आहेत [१] Archived 2011-09-28 at the Wayback Machine..
दळणवळण
संपादनयेथील सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक रोटेगाव आहे. हे उत्तर मध्य रेल्वेवर आहे. औरंगाबाद ते मुंबई हा राज्य महामार्ग येथुन पुढे नासिककडे जातो व त्याची दुसरी शाखा शिर्डी या पौराणिक शहराकडे जाते.
- राज्यमहामार्गाला जोडणारा बारामाही डांबरी रस्ता
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व्यवस्था
काही महत्त्वाची वैशिष्ट्ये -
- भरभराटीचा शेती व्यवसाय[ संदर्भ हवा ]
- लघु पाटबंधारे प्रकल्प[ संदर्भ हवा ]
- ईतर कोल्हापुर पद्धतीचे बंधारे[ संदर्भ हवा ]
- रोटेगांव रेल्वे स्थानक[ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाची औद्यौगिक वसाहत
- राज्य महामार्ग
- शिर्डी - साई बाबा मंदिरला जाण्यासाठीच्या प्रवासादरम्यान विसावा
शिक्षण संस्था
संपादनमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांची ईयत्ता दहावीपर्यंत शाळा येथे आहे. तसेच दहावीच्या परिक्षांचे केंद्रही येथे आहे. येथे तीन ठिकाणी वस्तीशाळा असुन या सर्व शाखांचे निकाल समाधानकारक लागत आहेत.
प्रसिद्ध व्यक्ति
संपादन[ संदर्भ हवा ]
- भाऊराव भिमाजी पाटील मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- रंगनाथ रामचंद्र मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- शिवराम आश्राजी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- रावसाहेब आबाजी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- भागाजी चंद्रभान मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- दामुजी मुरलीधर मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- बाबुराव त्र्यंबक मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- सखाराम शिवराम मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- मुक्ताजी सखाहरी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- वामन लक्ष्मन राऊत (स्वातंत्र्य सेनानी)
- अस्माजी किसन गायके (स्वातंत्र्य सेनानी)
- विश्वनाथ भागाजी परदेसी (स्वातंत्र्य सेनानी)
हैदराबाद मुक्तिसंग्राममध्ये सहभागी स्वातंत्र्य सैनिक.