चौदा रत्ने

समुद्रमंथनातून बाहेर आलेली रत्ने
(चौदा रत्ने (समुद्रमंथन) या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एकानंतर एक अशी चौदा अमूल्य अशा वस्तू म्हणजेच रत्ने बाहेर आली, त्यांना चौदा रत्ने म्हणतात.

  1. लक्ष्मी : विष्णुपत्नी
  2. कौस्तुभ मणी : श्रीविष्णूंनी गळ्यात धारण केलेला मणी. वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.[ संदर्भ हवा ]
  3. कल्पवृक्ष - पारिजात वृक्ष -(कल्पद्रुम) प्राजक्ताचे झाड.[] इंद्रादेवाला प्राप्त झालेला स्वर्गवृक्ष (स्वर्गाच्या बागेत लावलेला वृक्ष).
  4. सुरा वारुणी : दैत्यांचे मादक पेय[] -दारू, मद्य []
  5. धन्वंतरी : देवांचे वैद्यराज
  6. चंद्रदेव :(चंद्रमा)[] याला शिवाने मस्तकावर धारण केले.
  7. कामधेनू : इच्छापूर्ती करणारी गाय.
  8. ऐरावत : इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
  9. रंभा-मेनका इत्यादी अप्सरागण.
  10. उच्चैःश्रवा : सात तोंडे असलेला अश्व. सूर्यदेवाचे वाहन.[]
  11. हलाहल विष : कालकूट विष[]देवांच्या विनंतीनुसार हे विष शिवाने प्राशन केले .
  12. हरिधनु वा शारंग धनुष्य : भगवान विष्णूचे धनुष्य.
  13. शंख : श्रीविष्णूचा पांचजन्य शंख.
  14. अमृत : देवांचे पेय.

श्लोक

संपादन

चौदा रत्नांचे वर्णन करणारा संस्कृत भाषेतील श्लोक पुढीलप्रमाणे आहे :

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः ।
गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥
[][]

रामायण, महाभारत आणि पुराणांनुसार इतर रत्ने

संपादन

विविध पुराण तसेच रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्ये उल्लेख केलेली चौदा रत्ने ही किंचित वेगळी आहेत.[][१०]

  • कल्पवृक्ष ,
  • पांचजन्य शंख ,
  • ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी),(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एक दिव्य पुरूष: तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू गाय, (८) ऐरावत हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल विष, (१२) शार्ङ्ग धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्लोकाचा कर्ता अज्ञात आहे.

समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या ग्रंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो.

हे सुद्धा पहा

संपादन

समुद्रमंथन

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "समुद्र मंथन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
  2. ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
  3. ^ "समुद्र मंथन". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
  4. ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
  5. ^ "हिंदू सण व उत्सव-Hindu San Va Utsav by Ganesh L. Kelkar - Vasant Book Stall Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-09-15 रोजी पाहिले.
  6. ^ "कालकूट". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2015-08-22.
  7. ^ "कौस्तुभ". विकिपीडिया. 2015-06-07.
  8. ^ "पान:छन्दोरचना.djvu/35 - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2019-09-09 रोजी पाहिले.
  9. ^ Astrologer. "Samudra Manthan-churning of the ocean and its gifts- milky way". AstroPeep.com (इंग्रजी भाषेत). 2013-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-09 रोजी पाहिले.
  10. ^ "Samudra manthan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-27.