चिखळे उर्फ चिखले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

  ?चिखळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ३६′ ११.४९″ N, ७३° ०७′ ४१.९६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.८४८ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
४,५३४ (२०११)
• ५,३४७/किमी
भाषा मराठी
सरपंच अभिजीत काटेला[]
बोलीभाषा वारली,वाडवळी, आगरी.
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०२
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान

संपादन

डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे 'ओम साई प्रोव्हिजन स्टोअरनंतर चिखळे रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ९.६ किमी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना भरतीबरोबर कासवे येथील समुद्र किनाऱ्यावर वाहून येतात. मुख्यतः ग्रीन सी टर्टल, होक्सर् बिल,आणि अलिव्ह रीडले जातीची कासवे आढळतात.

लोकजीवन

संपादन

हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११२० कुटुंबे राहतात. एकूण ४५३४ लोकसंख्येपैकी २२२७ पुरुष तर २३०७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७६.०० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८५.२० आहे तर स्त्री साक्षरता ६७.२२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५२२ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ११.५१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

अस्वाळी, खुणावडे, रामपूर, घोलवड, विकासनगर,नारळीवाडी,चिंबावे, आंबेवाडी, नरपड, ठाकूरवाडी, वाकी ही जवळपासची गावे आहेत.चिखळे ग्रामपंचायतीमध्ये चिखळे आणि विकासनगर ही गावे येतात.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४