खुणावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

  ?खुणावडे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.०४४०८ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,६३६ (२०११)
• १,५६७/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४१०
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान संपादन

डहाणू बस स्थानकापासून इराणी मार्गाने गेल्यावर पुढे श्री गजानन एन्टरप्राईजेस, वडापाव गाडी, ट्रॉपिकल फ्लोरा ही दुकाने गेल्यानंतर खुणावडे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे.

हवामान संपादन

पावसाळ्यात खुणावडे गावात आणि त्याच्या आसपास भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

खुणावडे हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३९ कुटुंबे राहतात. एकूण १६३६ लोकसंख्येपैकी ७९३ पुरुष तर ८४३ महिला आहेत. गावाची साक्षरता ३३.८८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४०.४० आहे तर स्त्री साक्षरता २८.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २२.०७ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते.

नागरी सुविधा संपादन

खुणावडे गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठरावीक वेळी मिळतात. डाहाणू बस स्टेशनवर ऑटोरिक्षासुद्धा असतात.

जवळपासची गावे संपादन

बोर्डी, जळवाई, जांभुगाव, अस्वाली, रामपूर, घोलवड, विकासनगर, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे ही जवळपासची गावे आहेत. अस्वाली ग्रामपंचायतीमध्ये अस्वाली, जळवाई आणि खुणावडे ही गावे येतात.

संदर्भ संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/