चर्चा:मुखपृष्ठ

Active discussions

विकिपीडिया:मुखपृष्ठ अलीकडील मृत्यूसंपादन करा

 अभय नातू, V.narsikar: मुख्य पृष्ठावरील "अलीकडील मृत्यू" मध्ये नवे नाव नोंदवावे ही विनंती आहे. त्यातील सर्वात नवीन व्यक्तीचे पण आता वर्षश्राद्ध झाले आहे! इ.स. २०२० आणि इ.स. २०१९ वरुन काही नावे घ्यावी. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:२८, ७ फेब्रुवारी २०२० (IST)

 Dharmadhyaksha:
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच हे करतो.
अभय नातू (चर्चा) ००:४६, ८ फेब्रुवारी २०२० (IST ==

राम कथासंपादन करा

... ... ‌प्रभू रामचंद्रांची कथा सर्वात अगोदर कोणत्या भाषेमध्ये व कोणी लिहिली यासंबंधी सामान्य माणसाला माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे .परंतु सर्वांना आज प्रभुरामचंद्र,अयोध्या आणि राम-रावण युद्ध या गोष्टींची माहिती असतेच. प्राकृत,अपभ्रंश, संस्कृत, कन्नड, हिंदी या भाषांतील रामकथांचा तौलनिक अभ्यासासह झालेले संशोधनात्मक लेख संबंधित साहित्यातून असा निष्कर्ष निघतो की, प्रभू रामचंद्राची कथा सर्वात अगोदर जैन वाङ्मयामध्ये सापडते. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात आचार्य विमलदेवसूरी यांनी 'पउमचरियं' ही रामकथा लिहिली .ती प्राकृत भाषेत होती. कल्पकता,नावीन्य, रचनेची अद्भुतता, संघर्ष,आणि सुबोधता यामुळे ही कथा जनसामान्य व सन्मान्य झाली. त्यानंतर ती कथा पुढील चार-पाच शतके तरी रुजली. इ.स.च्या सातव्या शतकातील संघदासगणि यांनी ही कथा 'वसुदेवहिंडी ' या शीर्षकाने, पण प्राकृत भाषेतच नव्याने लिहिली. त्याच शतकामध्ये संस्कृत भाषा मूळ धरू लागली होती. रविषेण यांनी 'पद्मपुराण' संस्कृतमध्ये भाषांतरित केली. हा अनुवाद इ.स.६८०च्या सुमारास झाला. त्यानंतर अपभ्रंश भाषेमध्ये स्वयंभू यांनी ही रामकथा आठव्या शतकात लिहिली. पुन्हा नवव्या शतकामध्ये 'उत्तर पुराण ' या शीर्षकाखाली मुनी गुणभद्र यानी ही रामकथा लिहिली. प्राकृत भाषेमध्ये आचार्य शिलांक यांनी रामकथा लिहिली. या कथेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत राहिली. त्यानंतर हरीषेण, पुष्पदंत, आचार्य भद्रेश्वर, आचार्य हेमचंद्र ,आचार्य धनेश्वर सुरी आणि मेघविजय या ऋषी-मुनींनी ही राम कथा संस्कृतमध्ये विस्ताराने लिहिली. हा काळ सतराव्या शतकातला आहे. त्यानंतरचा रामकथेचा पुढील प्रवास हा बहुतेक सर्वांना ज्ञात असतो. रामायणाचा हा खरा इतिहास चक्रावून टाकणारा आहे. जैन धर्म हा पुनर्जन्म किंवा अवतार मानत नाही. प्रभुरामाचा प्रवास हा मानवाकडून महामानवाकडे असा मानला जातो. ‌

हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! 49.35.77.153 १६:५७, २६ जुलै २०२० (IST)

"मुखपृष्ठ" पानाकडे परत चला.