नकल डकव अहवाल

संपादन

@प्रसाद साळवे: 1) २३:५७, ५ ऑक्टोबर २०१३‎ प्रसाद साळवे 2) २३:५९, ५ ऑक्टोबर २०१३‎ प्रसाद साळवे 3) ०९:२३, ६ ऑक्टोबर २०१३‎ प्रसाद साळवे असा संबंध लेखच्या लेखच जशाच्या तसा रामटेके यांच्या ब्लॉगवरून उतरवून काढलेला आहे. शिवाय लेखाला स्वत:च ब्लॉगचा संदर्भही दिला आहे. त्यामुळे नकल-डकव सिध्द होते आणि इतिहास आणि मजकूर काढून टाकावा अशी मी विनंती करत आहे. WikiSuresh (चर्चा) ०३:२५, ३० मे २०१८ (IST)Reply

  झाले. -- अभय नातू (चर्चा) ०४:३९, ३० मे २०१८ (IST)Reply

@Sureshkhole, अभय नातू, आणि Tiven2240: या लेखात रामटेके यांच्या ब्लॉगवरून लेख जशाचा तसा उतरवला असे म्हटले गेले आहे. तसेच प्रताधिकार उल्लंघन साचा लावल्यानंतर एक तासातच तो मजकूर उडवला आहे. दुसरे म्हणजे तो मजकूर नेमका किती होता तर अलीकडील बदल वरून तो २६०९६ बाईट्स आशयाएवढा होता. असे दिसते. दुसरी गंमत म्हणजे फरक मध्ये तो दिसू नये याची काळजी घेण्यात आली आहे. कारण ते बघितले असता पुढील प्रमाणे मजकूर दिसतो.

  • आपण यातील फरक बघू शकत नाही कारण, त्यापैकी एक संस्करण वगळले आहे. वगळल्याचा क्रमलेख येथे त्याचा तपशील सापडेल.
  • ०४:३९, ३० मे २०१८ अभय नातू (चर्चा | योगदान) ने महाड सत्याग्रह पानावर२९ आवृत्यांची दृष्यताबदलली:माहिती लपवली आहे (प्रताधिकार उल्लंघन) (धन्यवाद)'

हा प्रकार दुष्यता न लपवता केला असण्यास काही तांत्रिक अडचण आहे काय ?? दृश्यात ठेऊन व काही काळ / दिवस वाट पाहता आली असती काय ??

म्हणून विनंती आहे कि प्रताधिकार साचा लावल्यावर तो मजकूर वगळण्यास एक दोन दिवस थांबायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. हा प्रकार आज पहाटे काळाराम मंदिर सत्याग्रह या लेखा बाबतीतही केला गेला आहे. व तासाभरात वगळून दृश्यता लपवली आहे. याला झोपेत धोंडा घालणे या सारखे म्हणता येईल..??

म्हणून प्रताधिकार साचा लावल्यावर अहवाल दिल्यानंतर मजकूर किती दिवसांनी वगळावा याचा निकष ठरवावा. कारण त्या काळात लेखातील मजकूर ज्याने टाकला त्याला तो पाहता व हटवता येईल. दरम्यान काळात त्यावर काही कार्यवाही नाही झाली तर तो कोणीही वगळला तर हरकत नसावी. कृपया याचा विचार व्हावा ही विनंती. प्रसाद साळवे (चर्चा) १०:१५, ३० मे २०१८ (IST)Reply

नातूंनी इतक्या घाईने लेखावर केलेली कारवाई पूर्णत चूकीची वाटते. किमान २४ तास तरी साचा ठेवायचा आहे, मग किती मजकूर कॉपीपेस्ट आहे किती नाही हे कळाले असते. अख्खा मजकूर काढून त्याचा इतिहासही मिटवणे यातून काय साध्य करायचे आहे? खरोखरच दोन्ही लेख पूर्णत कॉपीपेस्ट होते का? की काही वेगळे कारण?? कॉपीपेस्ट च्या नावाखाली बाह्य दुवे पण रिकामे केलेत!--संदेश हिवाळेचर्चा १०:४५, ३० मे २०१८ (IST)Reply
कॉपीपेस्ट मजकूर सुधार करण्यास सदस्यांना किमान २४ तास कालावधी देणे उचित राहिल. कृपया, @अभय नातू: यांनी २४ तासासाठी दोन्ही लेखातील (दुसरा- काळाराम मंदिर सत्याग्रह) बदल पूर्ववत करावे, म्हणजे लेखात कॉपीपेस्ट मजकूर बदलून विकिकरणीय करता येईल, त्यानंतरही जर कॉपीपेस्ट आढळल्यास आपण आवश्यक ती कारवाई करावी. धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १०:५३, ३० मे २०१८ (IST)Reply
@संदेश हिवाळे आणि प्रसाद साळवे:,
प्रताधिकार भंग मुळीच खपविला जाणार नाही हा नियम मराठीच नव्हे तर सगळ्याच विकिपीडियांवर लागू आहे हे तुम्हाला माहिती असेल.
इंग्लिश विकिपीडियावर असे वारंवार करणाऱ्यास तडीपार केले जाते हे सुद्धा नक्कीच माहिती असेल.
मराठी विकिपीडियावर सदस्यांबद्दल इतके कठोर धोरण (अद्याप) घेतेलले नाही परंतु सरळ सरळ उचलेगिरी केलेला मजकूर (कॉपीव्हायो किंवा इतर ठिकाणांवरुन मिळालेल्या अहवालानुसार) सापडल्यास तो शक्य तितक्या त्वरित काढलाच जाइल. या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
असला मजकूर काढण्याआधी प्रचालक प्रताधिकार भंग अहवाल बघतात याची खात्री बाळगावी आणि वारंवार प्रताधिकार भंग केलेल्या सदस्यांना तडीपार करणे तुम्हाला श्रेयस्कर वाटत असल्यास तसा प्रस्ताव मांडावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:३३, ३० मे २०१८ (IST)Reply


प्रताधिकार भंग मुळीच खपविला जाणार नाही हा नियम माहिती आहे आणि मान्यही आहे. मात्र अशा प्रताधिकार भंग मजकूरावर जर काम करून त्यात सुधारणा करणे शक्य असेल तर यासाठी त्याला काही वेळ द्यावा, असे मला वाटते. काही कालावधी उलट्यावर जर त्यात सुधारणा झाली नसल्यास तो कॉपीपेस्ट मजकूर काढावा. जलद गतीने मजकूर हटवणे हे नवीन बनवलेल्या लेखासाठी उत्तम राहिल, जून्या लेखांसाठी काही वेळ हवा.--संदेश हिवाळेचर्चा २०:४४, ३० मे २०१८ (IST)Reply

प्रताधिकार भंग हा वेळ गेल्याने बदलत नाही. हा गंभीर मुद्दा आहे व त्यामुळे विकिमीडिया आणि प्रताधिकार भंग करणारा सदस्य दोघेही गोत्यात येऊ शकतात. मजकूरावर काम करुन सुधारणा करायला वेळ द्या ही सबब विकिपीडिया प्रचालकापुढे नाही तर विकिमीडिया फाउंडेशनच्या वकीलांकडे किंवा सरळ कोर्टापुढे करावी. त्यांनी दिलेला निर्णय आपण मान्य करुयात (करावाच लागेल.)
लेख जुना असल्याने त्यातील प्रताधिकार भंगाचे महत्व कमी होत नाही. तुम्हाला असे लेख आढळल्यास कॉपीव्हायो चालवून त्याचा अहवाल घालावा.
पूर्वी जरी काहीही धोरण असले तरीही आता प्रताधिकार भंग असलेला मजकूर काढणे हे शक्य तितक्या त्वरेने केले जाईल.
तुमच्या सहकाऱ्याबद्दल धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:३७, ३१ मे २०१८ (IST)Reply

कॉपीव्हायो

संपादन

@Sureshkhole, अभय नातू, Tiven2240, आणि सुबोध कुलकर्णी:


प्रताधिकार भंग मुळीच खपविला जाणार नाही हा नियम मराठीच नव्हे तर सगळ्याच विकिपीडियांवर लागू आहे हे तुम्हाला माहिती असेल. उत्तर होय मान्य आहे. (मराठी विकीवर तो अगदी अलीकडेच नियम पाळला जात आहे. व कॉपीव्हायोमुळे तसे करणे सोपे झाले आहे.)

  • इंग्लिश विकिपीडियावर असे वारंवार करणाऱ्यास तडीपार केले जाते हे सुद्धा नक्कीच माहिती असेल. होय हे मान्य आहे...... अभिनंदन आम्हाला नेहमीच इंग्रजी विकिपीडिया वर आहे म्हणून मराठीत तसे असावे असे मुळीच नाही असे नातू म्हणत असत, परंतु या वेळी मात्र उदाहरणात इंग्रजी विकीचेच उदाहरण दिले. हे वेळ येईल तसे अशाप्रकारचे  परिवर्तन सुखदायक आहे.

सरळ सरळ उचलेगिरी केलेला मजकूर (आमची जुनी संपादने कॉपीपेस्ट आढळतील मे २०१८ नंतरची अजिबात नाही.)


हे मान्य आहेत पैकी एक नियम मान्य होऊ शकत नाही.


शक्य तितक्या त्वरित काढलाच जाइल

  • कारण लेखात मजकूर २०१३ मध्ये डकवला गेला म्हणजे ५ वर्षापूर्वी(असा अहवाल) मग शक्य तितक्या उशिरा लक्षात आले. आणि ज्याने डकवला, त्याला डकवला हे समजण्याच्या आतच काढला.


  • लेखाची दृश्यता का लपवली ?? याचे उत्तर दिले नाही.(अभय नातू यांनी या प्रश्नांचे समाधान न करता  त्यांस बगल दिली) कारण इतक्या जलद मजकूर काढल्यामुळे व दृश्यता लपवल्यामुळे त्यास पारदर्शक धोरण म्हणता येणार नाही. कारण कॉपीपेस्ट मजकूर कोणता होता आणि किती होता कळायला मार्ग नाही.(त्यांना कळले तरी पुरेसे) परंतु हे नातू मान्य करणार नाहीत कारण ते प्रचालक आहेत. 

कॉपीव्हायो बाबत महत्वाचे

संपादन

मराठी  विकिपीडियावर  एखाद्या लेखात किती टक्के कॉपीपेस्ट मजकूर वैध आहे/असावा ?? हे स्पष्ट सांगावे.  इंग्रजी Bal Gangadhar Tilak लेखात ४५.४ % दिसत आहे.  व कॉपीव्हायो साचा लावणाऱ्या ने त्यात किती टक्के मजकूर आहे हे अहवालात टाकावे.

  • कॉपीव्हायो साचा लावल्यावर किती कालावधीत मजकूर काढला पाहिजे याचे धोरण इंग्रजी विकिपीडिया वरून टायवीण यांनी सांगावे ही विनंती. म्हणजे कॉपीपेस्ट करणाऱ्याला त्यावर लक्ष देण्याइतका पुरेसा वेळ मिळावा. त्यासाठी सात दिवस अवधी पुरेसा असावा. म्हणजे १ तास वा २४ तास हा अवधी फारच कमी आहे.
  • जून २०१८ पासून पुढे नवीन लेखात तीन वेळा समज देऊनही एखादा सदस्य वारंवार कॉपीपेस्ट ७५ % टक्केच्या वर मजकूर टाकत असेल तर त्यास सहा महिने प्रतिबंधित करावे.
स्वतःला हवी ती विधाने नसत्या ठिकाणी वापरून स्वतःचे (लंगडे) घोडे पुढे दामटणे बंद करा. (आता लंगडे मी तुमच्या वादाला म्हणले आहे नाहीतर याल पुन्हा अंगावर लंगडे कोणाला म्हणले यावरुन काथ्याकूट करीत.)
प्रताधिकार भंगाबद्दलचे नियम इंग्लिशच नव्हे तर सगळ्याच विकिपीडियावर लागू होतात. मी स्पॅनिश/रशियन/जर्मन विकिपीडिया म्हणले असे समजा पाहिजे तर.
आमची जुनी संपादने कॉपीपेस्ट आढळतील मे २०१८ नंतरची अजिबात नाही.
आम्ही कोण? तुम्ही स्वतःला आदरार्थी बहुवचन लावीत आहात कि तुमचा कोणता कंपू आहे त्याचे समर्थन करीत आहात?
कारण लेखात मजकूर २०१३ मध्ये डकवला गेला म्हणजे ५ वर्षापूर्वी(असा अहवाल) मग शक्य तितक्या उशिरा लक्षात आले. आणि ज्याने डकवला, त्याला डकवला हे समजण्याच्या आतच काढला.
नकल-डकव जरी इतरांच्या लक्षात पाच वर्षांनी आली असली तरी नकल-डकव करणाऱ्याला ती करतानाच माहिती होते. नव्हे, ही नकल-डकव जाणीवपूर्वकच केली गेली हे उघड आहे. मग समजण्यापूर्वी म्हणजे काय?
लेखाची दृश्यता का लपवली
पूर्वीची चर्चा स्मरत नसेल तर आठवण करुन देतो की विकिपीडियावरील प्रताधिकारित मजकूर काढताना अशा संपादनांची दृष्यता काढणे आवश्यक आहे. असे न केल्यास प्रताधिकारित मजकूर सगळ्यांना दिसतो आणि प्रताधिकार भंग चालूच राहतो. गरज भासल्या यावरही वकीलांचा सल्ला घ्यावा.
दृश्यता इंग्रजी विकिपीडियावर झाकली जाते काय याची माहिती द्यावी.
इंग्लिश विकिपीडियावरून - Administrators may at their discretion unilaterally revision delete copyrighted content.
कारण कॉपीपेस्ट मजकूर कोणता होता आणि किती होता कळायला मार्ग नाही.
जेथे कॉपीपेस्ट मजकूर वेगळा करता येतो तेथे तितकाच मजकूर काढला जातो. यासाठी पूर्वीची संपादने पहावी. जेथे नकल-डकव मजकूर सोप्या मार्गाने वेगळा करता येत नाही तेथे प्रताधिकारित नसलेला शक्य तितका मजकूर वाचविण्याचा प्रयत्न केला जाउनही अधिक मजकूर वगळला जाऊ शकतो.
(त्यांना कळले तरी पुरेसे) परंतु हे नातू मान्य करणार नाहीत कारण ते प्रचालक आहेत.
पुन्हा एकदा - व्यक्तिगत आरोप आणि विधाने करू नयेत.
अभय नातू (चर्चा) ००:४७, ३१ मे २०१८ (IST)Reply


प्रसाद साळवेंचे समर्थन. अजून कॉपीपेस्टचे धोरण निश्चित झालेले नसताना इतक्या तडकाफडकीने मजकूर उडवण्याची आवश्यक नाही. आणि मे २०१८ नंतर कोणत्या सदस्याने नकल-डवक मजकूर भरल्यास त्याला तडीपार करा ना, पण इंग्लिश विकिपीडियावर असे वारंवार करणाऱ्यास तडीपार केले जाते हा नियम वारंवार सांगू नका. कॉपीपेस्टचे धोरण अगोदर ठरवा मग बाकी कार्य पुढे, म्हणजे सर्वांनाच सुधारणा करता येईल.--संदेश हिवाळेचर्चा ००:५४, ३१ मे २०१८ (IST)Reply
@संदेश हिवाळे:,
पुन्हा एकदा - विकिपीडियावर नियम नाही म्हणून मी प्रताधिकार भंग केला आणि तो चालवून घेण्याचा हेका धरला ही सबब कोर्टात किंवा विकिपीडियाच्या वकीलांपुढे चालवावी. प्रचालकांपुढे नाही.
सुधारणा करण्यास तुम्हाला आडकाठी नाही. वर लिहिल्याप्रमाणे कॉपीव्हायो चालवून अहवाल लावून द्या. शक्य तसे त्यावर कारवाई केली जाईल.
अभय नातू (चर्चा) ०१:०१, ३१ मे २०१८ (IST)Reply
@अभय नातू:
तुम्ही विनाकारण वादाची भाषा का वापरताय कळत नाही. परत एकदा तेच प्रताधिकार भंग झालेल्या मजकूरात जर योग्य त्या सुधारणा होऊ शकत असतील तर तो मजकूर प्रचालकाद्वारे 'तडकाफडकीने' काढणे अयोग्य वाटते. कृपया, धमक्या देऊ नये, वाद घालू नये आणि स्वतःचा हेका आवरावा. .--संदेश हिवाळेचर्चा ०८:५४, ३१ मे २०१८ (IST)Reply
सुधारणा करण्यास तुम्हाला आडकाठी नाही. वर लिहिल्याप्रमाणे कॉपीव्हायो चालवून अहवाल लावून द्या. शक्य तसे त्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे लेख सुधारणे म्हणजे मजकूर वगळणेच का ? इतर सुधार होऊ शकत नाहीत का? कॉपीपेस्ट मजकूरात सुधारणा करण्यास वाव द्यावा आणि प्रचालक पदाचा हुकूमशाही वापर टाळावा. आणि जर कॉपीपेस्ट मजकूर वगळणेच तुम्ही पक्के धोरण ठरवले असेल तर इतरही हजारो लेख यासाठी पात्र आहेत. ज्या लेखांत एकही संदर्भ नाही ते लेख, वर्ग:रिकामी पाने व वर्ग:अत्यंत लहान पाने. या तीन प्रकारात मोडणाऱ्या लेखांना काढून टाकण्यास पुढाकार घ्याल ?--संदेश हिवाळेचर्चा ०९:१०, ३१ मे २०१८ (IST)Reply
वरील सगळा संवाद वाचल्यास वादाची भाषा आणि व्यक्तिगत ताशेरे कोणी सुरू केले हे कळेल. न कळल्यास सांगेन. मजकूर वगळणे हे झालेला प्रताधिकार भंग काढण्यासाठी आहे. लेख सुधारण्यासाठी नाही. येथे धमक्यांचा बागुलबुवा उभा करीत आहात. आवरा! हिवाळे साहेब, हेकेखोरपणात तुमचा हात कोणीही धरणार नाही. येथेच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी व्यर्थ कटकटी करुन चर्चेत नसते फाटे फोडून पार विसंवाद केलेली उदाहरणे आहेतच. पाहिजे तर शोधून देतो. कॉपीपेस्ट मजकूरात सुधारणा करण्यासाठी पूर्ण वाव आहे. लेख (अपवाद सोडता) संरक्षित केलेले नाहीत. मनसोक्त लिहा, प्रताधिकार भंग न करता. प्रचालकपदाच्या अधिकाराचा वापर व त्याचा हिसका तुम्हाला इंग्लिश विकिपीडियावर दिसेल (किंबहुना दिसला आहेच) येथे नव्हे. मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत अत्यंत मवाळ धोरण घेउन शक्य तितक्या संपादकांना बरोबर घेउन काम करण्याचेच धोरण आहे. गेली पंधरा वर्षे हे चाललेले आहे.
कॉपीपेस्ट मजकूर वगळण्याचा आणि रिकामे लेख असण्याचा काय संबंध? बादरायण संबंध सुद्धा लागत नाही. व्यर्थ आकांडतांडव करुन नसत्या गोष्टी येथे ओढू नका. इतर ठिकाणी केल्यासारखे चर्चेस नसते फाटे फोडू नये.
अभय नातू (चर्चा) ०९:४५, ३१ मे २०१८ (IST)Reply

कॉपीव्हायो मजकूर धोरण

संपादन

'ती करतानाच माहिती होते. नव्हे, ही नकल-डकव जाणीवपूर्वकच केली गेली हे उघड आहे. पुन्हा एकदा - व्यक्तिगत आरोप आणि विधाने करू नयेत.(अभय नातू यांनी असा आरोप केला तर चालतो. केला)

मी शेकडो अनेक लेख निर्माण केले आहेत. ज्यात नकल डकव आढळते ते लेख मला कॉपीव्हायो माहित होण्यापूर्वीचेच आहेत. अर्थात कॉपीव्हायो शोधक व वगळक यांना माहित होते तर तो शोधून वगळण्यास इतका उशीर का झाला.?? मी तो जाणीवपूर्वक पेस्ट केला आहे हे सांगायला व वगळायला पाच वर्ष उशीर का लागला .?? (कदाचित त्यांनीच कॉपीव्हायो मराठी विकिपीडिया वर वापले नाही म्हणूनच हा माझ्यावर जाणीवपूर्वक केलेला आरोप आहे)

कॉपीव्हायो मजकूर धोरण स्पष्ट होणे आवश्यक आहे. तीन महत्वाचे प्रश्न

  • मराठी  विकिपीडियावर  एखाद्या लेखात किती टक्के कॉपीपेस्ट मजकूर वैध आहे/असावा ?? हे स्पष्ट सांगावे. (याचे उत्तर अहवाल टाकणारे अथवा अभय नातू यांनी अद्याप सांगितले नाही अर्थात पुन्हा याला बगल दिली आहे.
  • या पुढे सर्वच लेखात प्रताधिकार साचा लावल्यावर शक्य तितक्या लवकर याचा अर्थ एक तासाच्या आत मजकूर दृश्याता लपऊन वगळावा. ??? असे असल्यास त्याचा तसा नियम तयार करावा. हे सर्वच लेखा बाबतीत व्हावे म्हणजे प्रामाणिकता व पारदर्शकता दिसेल.
  • लेखात कॉपी पेस्ट केलेला मजकूर कोणी वगळावा हे देखील स्पष्ट करावे. (प्रचालक कि अन्य सदस्य कि कॉपी पेस्ट करणारा) याचे उत्तर सर्वच वगळू शकतात असेल तर संपादन वागल्यास दृश्यता लपवण्याचे अधिकार सर्वाना द्यावेत.

ता.क. : इंग्रजी Bal Gangadhar Tilak लेखात ४५.४ % दिसत आहे. हे सांगितल्यानंतर लोकमान्य टिळक लेखातील मजकूर वगळणे सुरु झाले तरी ८५.५ % मजकूर कॉपी पेस्ट दिसत आहे. प्रसाद साळवे (चर्चा) ०८:४७, ३१ मे २०१८ (IST)Reply

>'ती करतानाच माहिती होते. नव्हे, ही नकल-डकव जाणीवपूर्वकच केली गेली हे उघड आहे.
काय वाट्टेल ते!!!
नकल-डकव अनेकांनी केली. पण नकल-डकव करताना कोणीही ते आधी नकल करणार मग डकव करणार. यात व्यक्तिगत काय आहे? नकल-डकव करण्याची पद्धत मी लिहिली आणि करणाऱ्याला आपण नकल-डकव करीत आहोत हे नक्की माहिती असते हेही लिहिले. आता चोरकी दाढीमें तिनका ही हिंदी म्हण आठवते.
तुम्ही शेकडो लेख निर्माण केले हे कौतुकास्पद आहे पण जेथे नकल-डकव केली त्याला याची आड घेउन चालणार नाही.
कॉपीव्हायो मला किंवा इतर १० प्रचालकांना माहिती होते हे कसे ठरवले? अंदाजे अंधारात गोळीबार! खोले यांनी यात पुढाकार घेउन शोधले आणि ते मराठी विकिपीडियाने उचलून धरले.
पाच वर्षे चाललेली नकल-डकव प्रचालकांनी केली नाही. त्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी काढले. त्यांनी त्यांचे काम केले तर आता त्यावरुन आगपाखड का करता आहात?
कॉपीव्हायो सारखी अनेक उपयोजने असतील. ती येथे चालवण्याचे काम फक्त प्रचालकांचे नाही तर सगळ्या मराठी विकिसमाजाचे आहे. मग आता मीच तुम्हाला विचारतो. तुम्ही हे का नाही वापरले? आणि त्याहून मोठा प्रश्न - नकल-डकव मुळात केलीच का?
कॉपीव्हायोनी नकल-डकव झालेले लेख सापडले आणि हे सर्रास करणारे सापडले. आता त्यांचा कांगावा चालला आहे हे स्पष्टच आहे.
कॉपीव्हायोचे धोरण स्पष्ट करण्यासाठी ध्येय आणि धोरणे चावडीवर चर्चा करा. येथे किंवा इतर रँडम ठिकाणी इतस्ततः चर्चा करू नका.
लोकमान्य टिळक या मराठी विकिपीडियावरील लेखात मोठा प्रताधिकारभंग आहे असे येथे नमूद केल्यावर मी ते पडताळले व लगेचच त्यातील मजकूर काढणे सुरू केले. करताना मदत लागल्याने ज्यांना या बाबतीत अधिक माहिती आहे (खोले आणि दहिवळ) यांना मदतीसाठी हाक दिली. ता.क. लिहिताना पूर्ण सत्य लिहावे. स्वतःला सोयीस्कर इतकेच नव्हे.
अभय नातू (चर्चा) ०९:३९, ३१ मे २०१८ (IST)Reply
वरील लिहिण्या आधी मी काय लिहिले व विचारले ते नीट न वाचताच.. पुन्हा आणि पुन्हा प्रश्नाला बगल..

मराठी  विकिपीडियावर  एखाद्या लेखात किती टक्के कॉपीपेस्ट मजकूर वैध आहे/असावा ?? हे स्पष्ट सांगावे. या सारखे प्रश्नही अजूनही अनुत्तरीतच. हे ध्येय आणि धोरणे चावडीवर सांगिलेले असते तर येथे विचारले नसते. बर असेलच तर लक्षात आणून द्यायचे किंवा तेथे धोरण स्पष्ट करायला हवे. इथे वारंवार विचारून देखील सांगण्यात कमीपणा काय ? उत्तरे देण्यात कमीपणा काय ??. रेटो और चूप करो.. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:५१, ३१ मे २०१८ (IST)Reply

सगळे वाचले, सगळे लिहिले तरी प्रश्नाला बगल हा कांगावा सुरूच! शांतपणे हे सगळे वाचा. पाहिजे तर १-२ दिवस विकिसुट्टी घ्या. त्याने संवाद सुधारतो याचा मला अनुभव आहे.
उत्तर खरेच पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळी चर्चा सुरू करा. टक्केवारी काढताना कोणती अंगे ध्यानात घ्यावी लागतात किंवा लागतील याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? असल्यास ती चावडीवर मांडा. नसल्यास (नम्रपणे) विचारा. मी येथेच सुरुवात करुन देतो - अवतरणे, त्रयस्थ व्यक्तींनी केलेली (संदर्भित) विधाने, संदर्भातील मजकूर, इ.
आता यात अजून तीनाची तरी भर घाला म्हणजे आपण हा संवाद सुरू करू. येथे नव्हे, ध्येय आणि धोरणे चावडीवर.
अभय नातू (चर्चा) ०९:५६, ३१ मे २०१८ (IST)Reply
१-२ दिवस विकिसुट्टी घ्या रिकामा सल्ला आणि कॉपीव्हायो वगळण्यात आपण तज्ञ आहात हे समजले आहेच पण टक्केवारी काढताना कोणती अंगे ध्यानात घ्यावी लागतात किंवा लागतील याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? अर्थात यावर या आधीच तुम्हाला कल्पना असून टक्केवारी किती याचे उत्तर माहित आहे याची कल्पना आलीच.. कल्पोकल्पित % उत्तर मिळाल्याने चर्चा माझ्यापुरती थांबवतो. नाहीतर नेहमीप्रमाणे पुन्हा तुम्ही सल्ला आणि धमकी द्यालच प्रसाद साळवे (चर्चा) १०:०४, ३१ मे २०१८ (IST)Reply
अहो विद्वान,
टक्केवारी किती याचे उत्तर सरळ नाही, हे उत्तर माझ्याकडे तयार नाही. त्यासाठी अनेक अंगांनी मराठी विकिसमाजाला विचार आणि चर्चा करावी लागेल हे सांगतो आहे मी. हे न कळण्याइतके खुळे तुम्ही नक्कीच नाही. तरीही मला टक्केवारी माहिती आहे आणि कोणत्यातरी अचाट, अजब कारणापायी मी ही तुमच्यापासून लपवून ठेवीत आहे ही आवई उठवलीत!!??
आपली सबब गळून पडल्यावर मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जाणे हे येथे दिसते आहे (नेहमीप्रमाणे - ही एक म्हण आहे. तुम्हाला वेडं म्हणलेले नाही किंवा पेडगावला जाण्याचा सल्लाही दिलेला नाही. - असे न लिहिल्यास त्यावरुन एक वेगळे प्रकरण सुरू होईल.)
आणि पुन्हा एकदा नसलेल्या गोष्टी (धमकी) काढून कांगावा केला आहे.
सल्ला पाहिजे तर घ्या नाहीतर द्या सोडून. मी सल्ला दिला त्यावरुन तुम्हाला इतकी पोटदुखी होईल असे वाटले नव्हते.
अभय नातू (चर्चा) १०:१२, ३१ मे २०१८ (IST)Reply

माझे मत आणि सद्यस्थिती

संपादन

@अभय नातू, प्रसाद साळवे, आणि संदेश हिवाळे:, मी माझ्या मार्गाने संपादने करित असताना अचानक मला रामटेके यांचा ब्लॉग दिसला(ब्लॉग अतिशय उत्तम आहे! आणि लेखकानी खुप कष्टाने लिहिला आहे हे लक्षात येते.) आणि मला ब्लॉगमधील मजकूर/अनुक्रमाणिका आणि ”आम्ही” लोकांच्या संपादनांचे विषय यांत विलक्षण साम्य आढळले त्यामुळे मी त्यातील काही विषयांचे लेख तपासले असता मला आश्चर्याचा धक्का बसला आणि हे आणि इतर अनेक प्रताधिकार भंग ”आम्ही” लोकांनी केल्याचे दिसले आहेत, ज्यातील मी मोजकेच नोंदवले आहेत.

  • सध्याची प्रताधिकार भंग ध्येय धोरणे.
  • सध्या सापडत असलेल्या मजकूराचे गांभिर्य आणि आकारमान.
  • ते केलेले सदस्य वारंवार सारखेच("आम्ही" लोक) असल्याचे लक्षात येणे.
  • त्या सदस्यांचे दिलेल्या अहवालाकडे निट न पहाता मुद्याला वैयक्तिक आरोप करत बगल देणे किंवा हा लेख बघा तो लेख बघा म्हणत भरकटवणे.
  • विकीच्या कामात सतत अडथळा आणणे.

या सर्वांचा विचार करता आता इतिहासाता ह्या ”आम्ही” लोकांनी मोठ्याप्रमाणावर प्रताधिकार भंग केला आहे त्यांनी तो स्वत: काढून न टाकल्यास किंवा कारवाईत अडथळा आणल्यास त्यांना आता कायमस्वरुपी अवरुध्द करुन प्रचालकांनी स्वत:चा आणि इतर सदस्यांचाही वेळ, ऊर्जा वाचवावी असे माझे स्पष्ट मत आहे.(फ़ारतर त्यासाठी त्या ’आम्ही’ लोकांना एक महिन्याभराचा कालावधी द्यावा. त्या उपर जर प्रताधिकार भंग त्याच्या इतिहासात सापडले तर कायमस्वरुपी अवरुध्द करुन टाकावे आणि मोकळे व्हावे. कारण आता पुरे झाले!) आता ह्या चर्चापानाकडे पाहिल्यास जो वेळ प्रचालकांच्या आवश्यक प्रचालकीय कामात उपयोगात आणता आला असता तो इथे फ़ुकट गेला आहे, कारण ज्यांना शिकायच असतं ते सुरूवातीच्या एका महिन्यात हे शिकले असते आणि आम्हांला आता ही प्रताधिकार भंगाची घाण काढणे भाग पडले नसते. त्यामुळे ह्या चर्चापानावरील चर्चेचा गोषवारा लक्षात घेऊन मी खालील बाबीं करत आहे.(पुढील काही दिवसांत!!!) हा माझा संवादाचा शेवटचा प्रयत्न आहे, निदान आता तरी ध्येय, धोरणांच्या प्रक्रियांकडे उपरोक्त "आम्ही" लोकांनी गांभिर्याने पहावे आणि मग पुढील रडगाणे गावे अशी माफ़क आशा आहे.

  • प्रताधिकार भंग प्रक्रिया या नावाने एक माहिती देणारे पान तयार करीत आहे, ज्यात त्याची प्रक्रिया रितसर मांडली जाईल आणि ”आम्ही” लोकांच्या सर्व शंकाचे निरसन केले जाईल.
  • ह्या माझ्या प्रतिक्रियेवर जर वैयक्तिक आरोप केले गेले तर मला माझ्या पातळीवर कठोर पावले उचलावी लागतील आणि सर्वच उत्पादी संपादने आणि प्रताधिकार भंग उकरुन समोर ठेवावे लागतील शिवाय विकीवर(उत्पाती संपादने आणि प्रताधिकार भंग करणाऱ्या सदस्यांसाठी) इतरही अनेक मार्ग आहेत ज्यांचा मला नाईलाजास्तव उपयोग करावा लागेल.(जे स्वत: काढून टाकण्यास अजुनही ”आम्ही” लोकांना वाव आहे.)
  • आता पासून मी दिलेल्या प्रताधिकार भंगाची सदस्यवार यादी मी तयार करीन जेणेकरुन कोणी किती आणि कुठे प्रताधिकार भंग केले आहेत ह्याचा एकाच ठिकाणी मागोवा घेता येईल, जो ”आम्ही” लोकांचे डोळे उघडण्यास उपयोगाला येईल.
  • ता.क. टिळक लेखावरील प्रताधिकार टायविन आणि नातूंनी आधीच काढला आहे, शिवाय आता दिसत असलेल्या प्रताधिकार भंगाबाबत माझा अहवाल मी चर्चापानावर दिला आहे.WikiSuresh (चर्चा) १०:५९, ३१ मे २०१८ (IST)Reply
आम्ही हे मी स्वतःला आदरानेच स्वतःबद्दल म्हणतो आहे.. बाकी मला वारंवार आम्ही म्हणून आम्हाला(मला) आदराने बोलल्या बद्दल स्वयंभू लिंबू टिंबू सदस्याचे आभार... प्रसाद साळवे (चर्चा)

नमस्कार, मी वरील चर्चा वाचत आहे आणि मला अभय यांनी या लेखाच्या प्रताधिकार सामग्री आणि इतिहास हटवण्यास कोणतीही चूक केली आहे असे वाटत नाही. विकिपीडियावर असेस कारवाही केली जाते. विकिपीडिया ही एक मुक्त ज्ञानकोश आहे व त्यात प्रताधिकारित मजकूर असण्याची काहीही गरज नाही. प्रचालक आपले काम करत आहेत व प्रताधिकारित मजकूरावर कारवाही सुद्धा करतील. संदेश व प्रसाद हे विकिपीडियावर सक्रिय सदस्य आहेत व त्यांच्यातून असे कारवाही रोखण्यास चांगले वाटत नाही. कृपा नोंद घ्यावी :प्रचालकांना अधिकार आहे की नकल-डकव लगेचच वगळल्याचा. याची माहिती विकिपीडिया:नकल-डकव धोरणे यात स्पष्ट दिली आहे. सुरेश यांचा अहवालनुसार उचित कारवाही करण्यात आली आहे व भविष्यात सुद्धा नकल-डकव व प्रताधिकारित मजकूर मराठी विकिपीडियावर ठेवले जाणार नाही. प्रताधिकार भंग करणारे सदस्यांवर उचित कारवाही केली जाईल. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १४:१०, ३१ मे २०१८ (IST)Reply

@Tiven2240: प्रताधिकार सामग्री हटवण्यास प्रचालकांना कुणीही थांबवत नाही, पण माझे याबाबत एकढेच मत आहे की, प्रताधिकार सामग्री जर विकिकरणीय करता येऊ शकत असेल तर तसा त्याला वेळ द्यायला हवा. धोरण अध्याप स्पष्ट झालेले नसल्याने तडफाडकी मजकूर काढणे योग्य वाटत नाही. त्यासाठी अगोदर धोरण स्पष्ट करावे.
@Sureshkhole: तुम्ही तर स्वतःच ही चर्चा वैयक्तीक पातळीवर होतेय असे गृहित धरून भरे मोठे लिहिले. तुम्हाला व तुमच्याच "आम्ही लोकांना" सांगावेसे वाटते की मी रामटेके यांच्या ब्लॉगवरून काहीही कॉपीपेस्ट केलेले नाही. तुम्ही धोरण राबवताय की हुकूम गाजवताय हे सहज कळतेय. प्रताधिकार धोरण जेव्हा लागू होईल तेथून पुढे कॉपीपेस्ट करणाऱ्या सदस्यांना अवश्य तडीपार करावे, भूतकाळात अशा कृती केलेल्या सदस्यांवर कारवाईची भाषा करणे हे चूकीचे आहे. आधी याबाबतचे धोरण तयार करा, बाकी कामे पुढे. --संदेश हिवाळेचर्चा १४:४५, ३१ मे २०१८ (IST)Reply

टायविन यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार.. निश्चितच प्रताधिकार भंग मजकूर वागळूयात पण सर्वांच्या सहकाऱ्याने. नकल डकव धोरणाची मार्गदर्शक तत्वे तयार करूयात व सर्वाना विश्वासात घेऊन काम करूयात... पुनश्च धन्यवाद.@ प्रसाद साळवे (चर्चा) १४:३०, ३१ मे २०१८ (IST)Reply

@प्रसाद साळवे आणि संदेश हिवाळे:

  • आपण इतर सदस्यांचा उल्लेख स्वयंभू लिंबू टिंबू सदस्याचे असा केला आहे. हा असंसदीय भाषेत वैयक्तिक हल्ला आहे हे मी नोंदवतो आहे.
  • चोर हा चोरच असतो मग त्यानी चोरी करुन 4 वर्षे होऊदेत नाहीतर 40 चोरी काही उलटत नाही भूतकाळामधून. त्यामुळे जुना प्रताधिकार भंगाबद्दल तुम्हांला आता काही होणार नाही हा गैरसमज काढून टाका.
  • प्रताधिकार भंग मजकूर काढून टाकणे अपेक्षित असते आणि तो अगदी इतिहासामधूनही काढला जातो ही सर्व विकीवरील प्रक्रिया आहे. हेे नियम खोले, नातूं किंवा जोशी-कुलर्णींच्या घरात नाही, विकीमिडीया फ़ांडेशन आणि प्रताधिकाराच्या कायद्यामधून आलेले आहेत हे मी तीसऱ्यांदा सांगतोय. त्यामुळे ही हुकूमशाही असेल तर ती कायद्याची आहे खोले किंवा आणखी कोणाचीही नाही.
  • प्रताधिकारीत मजकूराचे विकीकरण करणे म्हणजे चोरीच्या मालाला नव्या रंगारंगोटीने बाजारात नवी वस्तू म्हणून विकावयास आणणे होय. हे ही मी दुसऱ्यांदा सांगतोय. त्यामुळे आता मजकूर ठेवा आणि मग तो गावढंळ पध्दतीने कसाबसा शब्द वाढवून/कमी करुन बदला असले प्रकार विकीवर करता येत नाहीत.

आपल्या जवळपास प्रत्येक लेखात आपण प्रताधिकार भंग केला आहे हे स्पष्ट पाहिले आहे. शिवाय आत्ता जरी आंबेडकर, किंवा आपल्या लाडक्या लेखांची तपासणी केली असता आजुनही प्रताधिकार भंग आपणच केल्याचे दिसत आहे. WikiSuresh (चर्चा) १५:५२, ३१ मे २०१८ (IST)Reply


सुरेश खोले,
नकल-डवक मजकूर सुधारणे म्हणजे त्यातील प्रत्येक वाक्य वा शब्दांची अदलाबदल करणे नव्हे आणि तुम्ही वर सांगितले तसे रंगरंगोटी करणे तर मुळीच नव्हे. थोडक्यात, एखाद्या वस्तूला पाहून स्वतः २०-३०% पर्यंत त्यासारखी प्रतिकृती तयार करणे. म्हणजेच मोठ्या मजकूराचा स्वतःच्या शब्दात लहानसा सारांश बनवणे. याने प्रताधिकार भंग होणार नाही किंवा ती वस्तू चोरली असेही होणार नाही. माझ्यासाठी कोणतेही लेख 'लाडके' नाहीत पण आवडीच्या विषयांत मोडणाऱ्या लेखांवर लेखन करायला मला आवडते. तुम्हाला आणि मलाही नकल-डवक मजकूर नको आहे, पण यातही मुख्य बाब ही आहे की माझा कल हा लेखातील प्रताधिकार मजकूर काढून त्या लेखाच्या विस्ताराकडे असतो तर तुमचा कल फक्त प्रताधिकार मजकूर वगळण्यापुरताच मर्यादित असतो. नकल-डवक मजकूराला सुधारणे याचा अर्थ धोरणे राबणाऱ्यांनी पूर्णत चूकिचा काढला असल्याचे दिसते आहे. नकल-डवक मजकूर लेखात असण्याचे/ठेवण्याचे कुणीही समर्थन करत नाही पण नकल-डवक मजकूर वगळण्यासोबतच लेखात कशी भर घालता येईल याबाबतचा विचार करणे महत्त्वाचे आहे. अर्थातच धोरणे राबवणारे सदस्य लेखात भर घालण्याचे काम क्वचितच करताना आढळतात. माझ्या मताचा चूकीचा सतत चूकीचा अर्थ काढत असल्याचे या चर्चेत स्वारस्य उरले नाही तथापि येथील माझी ही शेवटची चर्चा, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:३०, १ जून २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १८:३०, १ जून २०१८ (IST)Reply
धोरण अध्याप स्पष्ट झालेले नसल्याने
हे पुन्हा पुन्हा का येते आहे? वर अनेक वेळा प्रताधिकारित मजकूर त्वरित काढून टाकला जाईल असे लिहिलेले आहेच.
सारांश वगैरे लिहिण्यासाठी मजकूर येथे ठेवू नये. मूळ स्रोतावर वाचून येथे सारांश लिहावा. यासाठीचा सोपा मार्ग हवा असल्यास कळवावे. न मागता सल्ला देत नाही आहे.
असो. वरील गदारोळाचा आढावा खाली देत आहे.

आढावा

संपादन
प्रताधिकार किंवा इतर कोणतेही धोरण विशिष्ट विकिपीडियाला स्वतःसाठी लागू करता येते परंतु ते कायद्याच्या चौकटीत राहूनच. विकिपीडिया/विकिमीडियाने स्वतःचे धोरण केल्याने कायद्याची ऐशीतैशी करण्याची मुभा मिळत नाही.
कायद्याचे किंवा कायद्याबद्दल नुसते वरवर वाचन केले असता असा प्रताधिकारित मजकूर विकिपीडियावर ठेवता येत नाही हे स्पष्टपणे कळते. यानंतर वरील चर्चा वाचल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात -
सदस्य संदेश हिवाळे, प्रसाद साळवे आणि इतर काही सदस्यांनी प्रताधिकारित मजकूर येथे आणून कायदा मोडला.
हे कदाचित अनवधानाने झाले असेल, कदाचित मुद्दामही केले असेल. त्रयस्थ व्यक्तीच्या मनातील हेतू काय हे जाणणे अशक्य आहे तरी त्यावर अंदाज बांधत नाही.
असा मजकूर प्रचालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तो काढण्यास सुरुवात केली त्यावेळी या दोन सदस्यांनी तो काढण्यास विरोध केला आणि त्याद्वारे विकिपीडिया/विकिमीडियासही कायदा मोडण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा प्रचालकांनी हे का व कसे करीत आहे हे स्पष्ट केले तेव्हा या दोन सदस्यांनी प्रचालकांशी वाद घालून प्रताधिकारित मजकूर काढण्यात वापरता येऊ शकणारा वेळ घालविला व ही परिस्थिती (मराठी विकिपीडियावर प्रताधिकारित मजकूर) कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
वरील आढावा वाचून लक्षात येते की सदस्य संदेश हिवाळे आणि प्रसाद साळवे हे मराठी विकिपीडिया आणि पर्यायाने विकिमीडिया फाउंडेशनला कायद्याच्या गोत्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यांनी असे करणे त्वरित थांबवावे ही प्रचालकांतर्फे आणि एकूण मराठी विकिसमाजातर्फे आग्रह करीत आहे.
अभय नातू (चर्चा) २२:४७, १ जून २०१८ (IST)Reply

@अभय नातू: मी या कॉपीपेस्ट मजकूर बाबत चर्चा करण्यासाठी येथे बोललो मात्र याचा अर्थ हा नाही की मी या लेखात कॉपीपेस्ट मजकूर टाकला, जो अर्थ तुम्ही काढला व पुढील आरोप केला सदस्य संदेश हिवाळे, प्रसाद साळवे आणि इतर काही सदस्यांनी प्रताधिकारित मजकूर येथे आणून कायदा मोडला. खरेच या आरोपात तथ्य आहे का? या लेखात माझी एकूण १३ संपादने आहेत आणि कुठल्या संपादनात मी कायदा मोडला ? कृपया स्पष्ट करा (मला पाहणे शक्य नाही). आपण आरोप ठेवला त्यामुळेच बोलावे लागले, याला वाद घालणे समजू नये.--संदेश हिवाळेचर्चा २३:३७, १ जून २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २३:३७, १ जून २०१८ (IST)Reply

@संदेश हिवाळे: जर आपण हा दुवा पाहिले तर त्यात स्पष्ट केले आहे की Lawful Behavior – You do not violate copyright or other laws. चर्चेत व लेखात कायद्याचा उल्लंधन झालेला स्पष्ट दिसत आहे. कृपा ही चर्चा इथेच थांबावी. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २३:४६, १ जून २०१८ (IST)Reply

ठिक आहे. मी आधीच चर्चा थांबवली होती. नातूंचे उत्तर ऐकल्यानंतर चर्चा थांबवण्यास हरकत नाही, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:५८, १ जून २०१८ (IST)Reply

नकल-डकवीचे उदाहरण

संपादन
सहज पाच मिनिटे चाळले असता एक उदाहरण सापडले -
ठाणाळे लेणी या लेखात २८ मे, २०१८ रोजी ८:५६ वाजता तुम्ही हा बदल केलात -
https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=1598394&oldid=1491577&title=%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80
कॉपीव्हायो सांगते की या मजकूराचा मोठा भाग marathiworld.com/bhramanti-m/thanale-leni या यूआरएल वर जसाचा तसा सापडला.
https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80+&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0
वेबॅक मशीन सांगते की मराठीवर्ल्डवर हा मजकूर २४ जानेवारी रोजी होता.
https://web.archive.org/web/20180124094413/marathiworld.com/bhramanti-m/thanale-leni
याचा अर्थ -
  1. २४ जानेवारीला हा मजकूर मराठीवर्ल्डवर लिहिला गेला
  2. २८ मे रोजी तुम्ही हा मजकूर येथे डकवला (मूळ लेखनातील शुद्धलेखनाच्या चुकींसह!!!)
  3. २८ मे नंतर तुम्ही यात बदल केले, जेकरणे कॉपीव्हायोला आता हे लिखाण हुबहू नक्कल वाटत नाही
या सगळ्या प्रकाराचा दुसरा अँगल -
तुम्ही नकल-डकव केलीत आणि बदल झाल्यावर मी नकल-डकव केलीच नाही असे कानावर हात ठेवले आणि प्रचालकांना हे शोधून काढण्यास आव्हान दिले.
पुन्हा एकदा - चूक करुन ती नाकारली आणि त्यापायी इतरांचा वेळ खर्ची घातलात.
सदस्यांनी असा खोडसाळपणा करू नये ही आशा आणि अपेक्षा आहे परंतु वेळ पडल्यास ती शोधून काढली जाईल आणि उघडकीस आणली जाईल याची खात्री बाळगावी.
अभय नातू (चर्चा) ०१:२९, २ जून २०१८ (IST)Reply
माझा प्रश्न तुम्ही लक्षात घेतलेला दिसत नाही, मी केवळ "याच लेखातील" माझ्या कॉपीपेस्ट मजकूर बाबत स्पष्ट विचारले आहे. पूर्वी काही लेखात माझ्याकडून चूकीने नकल-डवक झाल्याचे मला मान्य आहेच, कारण या नियमांशी इतका परिचित नव्हतो. पण महाड सत्याग्रह या लेखात मी नकल-डवक केले आहे का, याचेच स्पष्टीकरण मला हवे होते. मी ना कानावर हात ठेवले व ना कोणती चूक नाकारली. मी एक विचारले व तुम्ही दुसरेच सांगतले. कृपया, जर कोणी सदस्यांना एखाद्या गोष्टीबाबत स्पष्टीकरण मागितल्यावर दुसऱ्याच गोष्टींना स्पष्ट करत त्याला त्या सदस्यांचा खोडसाळपणा समजू नये. येथे प्रत्येकाचाच वेळ महत्त्वाचा आहे. --संदेश हिवाळेचर्चा १५:४९, २ जून २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:४९, २ जून २०१८ (IST)Reply
मग तुम्हीच माझ्या लिखाणाचा अर्थ लक्षात घेतला नाहीत. तु्म्ही या पाच लेखांत नकल-डकव केली हे मी म्हणलेले नाही. (आणि हे पाच कोणते?) तुम्ही पूर्वीपासून नकल-डकव केली आहे असे म्हणले असता आता मी या पाच लेखात नकल-डकव केली नाही असे म्हणून पळवाट काढता आहात असे मला वाटते. चर्चा पाच लेखांमध्येच सीमित आहे हे तुम्ही एकतर्फीच कधी आणि कसे ठरवले?
पुन्हा एकदा चर्चा निरर्थक ठिकाणी वळवण्याचा प्रकार दिसतो आहे. त्याला मुद्दामहून वळसा घालत लिहीत आहे की - तुम्ही पूर्वीपासून नकल-डकव केलेली आहे आणि हा प्रताधिकार भंग काढण्यासाठी अनेकदा अडचणी उभ्या केलेल्या आहेत.
अभय नातू (चर्चा) ०२:१८, ४ जून २०१८ (IST)Reply

जाणीवपूर्वक नकल-डकव

संपादन

मला वाटते चर्चेत सहभागी असलेल्या सर्वच सूज्ञ संपादकांनी खालील मजकूर आपले संपादन जतन करताना त्या पानावर असंख्य वेळा वाचला असणार. आता ही सूचना इतकी स्पष्ट असताना आणखी कोणत्या धोरणाची वाट पहायची? -

इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे.विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे.इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत,भाषिक,प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते.असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येईल.

लेख बनविण्यासाठी नकल-डकव पद्धत वापरून विकी तत्वांचे उल्लंघन जाणीवपूर्वक अनेक संपादक करत आले आहेत यावर दुमत असण्याचे कारण नाही (उदा. नुकताच सापडलेला मागाठाणे लेणी हा लेख). आता Copyvio बद्दल – एखादी रोग निदानाची प्रभावी पद्धत सापडली तर जुन्या व नव्या सर्वच रुग्णांसाठी ती वापरायला हवी. रोग जुना असेल तर बळावलेला असू शकतो, त्यावर तातडीने उपचार व्हायला हवा. अनुभवी व ताज्या दमाच्या प्रचालकांनी कोणतीही सूट न देता उचित कारवाई करावी ही विनंती. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:११, २ जून २०१८ (IST)Reply

या सर्व चर्चेतून 'नकल-डवक मजकूर कोणतीही सूट न देता काढला जावा' यावर मी सहमत आहे. या नकल-डकवबाबत सर्वांनी एकजूटीने काम करने अधिक श्रेयस्कर राहिल. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे व्यर्थ आहे. --संदेश हिवाळेचर्चा १६:३८, २ जून २०१८ (IST)Reply
अनेक दिवसांच्या निरर्थक काथ्याकूटीनंतर का होईना इतर सदस्यांशी सहमत झालात हे पाहून आनंद झाला. -- अभय नातू (चर्चा) ०२:१९, ४ जून २०१८ (IST)Reply
सदस्य हे आपल्या शंका, व त्याच्या समाधानासाठी चर्चा करतात आणि आपले मत मांडतात. मात्र ते मत जर प्रचालकांना विरोधी वाटले तर ते त्याला निरर्थक म्हणू शकतात, इतर नाही. त्यामुळे 'निरर्थक काथ्याकूटी' हा शब्दप्रयोग तुमच्यापुरता मर्यादित राहतो. यावर आता परत चर्चा नाही, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा ०९:१५, ४ जून २०१८ (IST)Reply
चर्चा, काथ्याकूट आणि निरर्थक काथ्याकूट - या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी येथे तिन्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही गेले काही दिवस घातलेला वाद हा तिसऱ्या प्रकारातच मोडतो.
अभय नातू (चर्चा) २२:४१, ४ जून २०१८ (IST)Reply
प्रचालकांनी पूर्वग्रह मनात बाळगून एखाद्या सदस्याशी केलेली चर्चा प्रचालकांना 'निरर्थक काथ्याकूट' जरूर वाटू शकते. आणि हे मी माझ्या-तुमच्या अलीकडील सर्वच चर्चेतून अनुभवलेय व अभुवतोय.
--संदेश हिवाळेचर्चा ०८:४२, ५ जून २०१८ (IST)Reply
चर्चा संपली असे वारंवार म्हणून चर्चा चालू ठेवली हे पाहून आश्चर्य (थोडेसेच) वाटले.
प्रचालकांनी शेकडो लोकांशी चर्चा केलेली आहे. त्यांतील खडे कोणते आणि जोंधळे कोणते हे ते निश्चित जाणतात.
यासाठी नाव, गाव, पत्ता महत्वाचे नसून विकिपीडियाचे नियम, क्राउडसोर्सिंगची जाण असणे, इतरांचा मान राखणे, सारखे स्वतःचेच घोडे पुढे (न) दामटणे, इ. गुणांचा निकष लागतो.
आता हे समजून चर्चा संपवलीत तर बरे. नाहीतर आहोतच आपण.
अभय नातू (चर्चा) ०८:५४, ५ जून २०१८ (IST)Reply
मी सुबोध कुलकर्णींच्या चर्चेवर मत देऊन माझी चर्चा संपवली आहेच, मात्र त्यानंतरही माझ्यावर सतत आरोप केला जात असल्याने इच्छा नसतानाही परत परत बोलावे लागले. वरील गुणांचे निकष प्रचालकांसह सर्व सदस्यांनी पाळलेले उत्तम! यापुढे तुम्ही चर्चा/आरोप करो वा ना करो मी उत्तर देणार नाही, व येथे वेळ घालणार नाही. आता संपवलीत तर उत्तम.
--संदेश हिवाळेचर्चा १४:१५, ५ जून २०१८ (IST)Reply
वरील चर्चा शांतपणे वाचा. प्रत्येक वाक्यातून कोणानकोणावर तरी आरोप तुम्ही केलेले आहेत. त्यांचे खंडन करुन तुमचे लिहिणे दाखवले की लगेच माझ्यावर आरोप म्हणून कांगावा करीत आहात.
अनेकांचा खूप वेळ वाया घालवला आहात तुम्ही, तरी चर्चा संपवलीत तर बरेच. नाहीतर अखंड राहू देत. तुमचे हे वर्तन तीन-चार वेळा सोडून दिलेले आहे पण आता धसास लावावेच लागेल.
अभय नातू (चर्चा) १८:३२, ५ जून २०१८ (IST)Reply

@संदेश हिवाळे: ह्या लेखाचा मजकूर पाहून तरी मी जातीयवादी आहे की, नाही ह्याचा काहीसा अंदाज आपल्याला आला असावा अशी माझी आशा आहे. हा लेख खास माहिती शोधून लिहिला आहे, अजुन ह्याच्यावर खूप काम बाकी आहे, मला काही पुस्तके मिळाली नाहीत त्यामुळे अजुन माहिती जोडणे बाकी, आहे शिवाय हे भाषांतर नसून मी स्वत: पुस्तके शोधून लिहिलेला मजकूर आहे. सुरेश खोले संवाद हवा? २३:४३, १२ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"महाड सत्याग्रह" पानाकडे परत चला.