गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस

गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे गोव्यामधील मडगांव रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. कोकण रेल्वेपश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसला मडगांव ते चंदीगढ दरम्यानचे २,३६७ किमी अंतर पार करायला ४० तास लागतात. गोवा एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस व दिल्ली-त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस ह्या गोव्याला दिल्लीसोबत जोडणाऱ्या इतर गाड्या आहेत.

गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

तपशीलसंपादन करा

वेळापत्रकसंपादन करा

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२४४९ मडगांव – चंदीगढ १२:२५ ०४:२५ मंगळ, बुध
१२४५० चंदीगढ – मडगांव ०१:३० १५:०० सोम, शनी

मार्गसंपादन करा

स्थानक संकेत स्थानक/शहर
MAO मडगांव
KRMI करमळी
THVM थिविम
PERN पेडणे
RN रत्‍नागिरी
PNVL पनवेल
BSR वसई रोड
BRC वडोदरा
KOTA कोटा
NZM हजरत निजामुद्दीन
NZM नवी दिल्ली
PNP पानिपत
UMB अंबाला
CGD चंदीगढ

बाह्य दुवेसंपादन करा