खैबर पख्तूनख्वा (पूर्वीचे नावः वायव्य सरहद्द प्रांत; उर्दू: خیبر پختون خواہ ; रोमन लिपी: Khyber Pakhtunkhwa) हा पाकिस्तानाच्या ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. पेशावर हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या वायव्येस अफगाणिस्तानाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ईशान्येस गिलगिट-बाल्टिस्तान, पूर्वेस आझाद काश्मीर, पश्चिमेस व नैऋत्येस संघशासित जनजातीय क्षेत्र, दक्षिणेस बलुचिस्तान, पंजाब, तर आग्नेयेस इस्लामाबाद हे राजकीय विभाग वसले आहेत.
खैबर पख्तूनख्वा خیبر پختون خواہ |
---|
|
देश |
पाकिस्तान |
---|
राजधानी |
पेशावर |
---|
क्षेत्रफळ |
७४,५२१ वर्ग किमी |
---|
लोकसंख्या |
२,०२,१५,००० |
---|
जिल्हे |
२४ |
---|
प्रमुख भाषा |
उर्दू, पश्तो |
---|