कोरोनाव्हायरस
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल इंजेक्शने उपलब्ध आहेत..
विषाणूंचा एक गट | |||||||||||||||
माध्यमे अपभारण करा | |||||||||||||||
विकिपीडिया Wikispecies | |||||||||||||||
प्रकार | टॅक्सॉन, organisms known by a particular common name | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
उपवर्ग | विषाणू | ||||||||||||||
पासून वेगळे आहे |
| ||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
| |||||||||||||||
कोरोनाव्हायरस प्रथम १९६० च्या दशकात सापडले. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये (नंतर ह्यूमन कोरोनाव्हायरस २२ E ई आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी असे नाव देण्यात आले) होते. २००३ मध्ये सार्स-सीओव्ही, एचसीओव्ही एनएल २००४ मध्ये एचकेयू १, २०१९ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एसएआरएस-कोव्ही -२ (पूर्वी 2019-एनसीओव्ही म्हणून ओळखले जाणारे) या कुटुंबातील अन्य सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये गंभीर श्वसनमार्गाचे संक्रमण होते.
२०२० साली महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. १५ जून २०२० पर्यंत १,१०,७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४,१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६,०४९ जण पूर्ण बरे झाले.[१]
शोध
कोरोनाव्हायरस पहिल्यांदा १९३० च्या दशकात सापडले जेव्हा संसर्गजन्य ब्रॉन्कायटिस विषाणूमुळे (आयबीव्ही) पाळीव कोंबड्यांचा तीव्र श्वसन संसर्ग झाल्याचे दिसून आले. १९४० च्या दशकात माऊस हेपेटायटिस व्हायरस (एमएचव्ही)[२] आणि ट्रान्समिसिसिबल गॅस्ट्रोएन्टेरिटिस व्हायरस (टीजीईव्ही)व आणखी दोन प्राणी कॉर्नोव्हायरसपासून अलग ठेवण्यात आले[३].
१९६०[४]च्या दशकात मानवी कोरोनाव्हायरस सापडले. सर्वात आधी अभ्यास केलेला सामान्य सर्दी असलेल्या मानवी रुग्णांद्वारे होता, ज्याला नंतर मानवी कोरोनाव्हायरस २२९इ आणि ह्यूमन कोरोनाव्हायरस ओसी ४३ओसी असे नाव देण्यात आले. माणसां मध्ये सार्स-सीओव्ही, २००३ मध्ये एचसीओव्ही एनएल ६३ २००४ मध्ये एचकेयू १, २०१२ मध्ये मेर्स-सीओव्ही आणि २०१९ मध्ये एसएआरएस-कोव्ह -२ यासह इतर मानवी कोरोनव्हायरस ओळखले गेले. यापैकी बहुतेकांना श्वसनमार्गाच्या गंभीर आजाराचे संक्रमण होते.
आकृतिबंध
कोरोना व्हायरस हे कंद आकाराच्या पृष्ठभागाचे अंदाजानुसार मोठे प्लीओफॉर्मिक गोलाकार कण आहेत. व्हायरस कणांचा व्यास सुमारे १२०एनएम (NM-Nanometer) आहे.[५]विद्युतपरमाणू सूक्ष्म आलेखामध्ये विषाणूंचा लिफाफा विद्युतपरमाणूची दाट कवच असलेली एक वेगळी जोडी म्हणून दिसून येते.
MERS-CoV | SARS-CoV | SARS-CoV-2 | |
---|---|---|---|
Disease | MERS | सार्स | COVID-19 |
Outbreaks | 2012, 2015, 2018 |
2002–2004 | 2019–2020 महामारी |
रोगशास्त्र | |||
Date of first identified case |
June 2012 |
November 2002 |
December 2019[६] |
Location of first identified case |
जेद्दाह, सौदी अरेबिया |
Shunde, चीन |
वूहान, चीन |
Age average | 56 | 44[७][a] | 56[८] |
Sex ratio (M:F) | 3.3:1 | 0.8:1[९] | 1.6:1[८] |
Confirmed cases | 2494 | 8096[१०] | १३,५८,६९,७०४[११][b] |
Deaths | 858 | 774[१०] | २९,३५,२७१[११][b] |
Case fatality rate | 37% | 9.2% | 2%[११] |
लक्षणे | |||
Fever | 98% | 99–100% | 87.9%[१२] |
Dry cough | 47% | 29–75% | 67.7%[१२] |
Dyspnea | 72% | 40–42% | 18.6%[१२] |
Diarrhea | 26% | 20–25% | 3.7%[१२] |
Sore throat | 21% | 13–25% | 13.9%[१२] |
Ventilatory use | 24.5%[१३] | 14–20% | 4.1%[१४] |
Notes |
कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे
कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांना वेदना, अनुनासिक रक्तसंचय, वाहणारे नाक, घसा खवखवणे किंवा अतिसार होऊ शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. काही लोकांना संसर्ग होतो पण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांना बरे वाटत नाही.बहुतेक लोक (सुमारे ८०%) विशेष उपचार न घेता या आजारातून बरे होतात. कोरोना होणाऱ्या प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ती गंभीर आजारी पडते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होतो. वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते.[१५]
उपचार
- या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.
- दृष्टोत्पत्तीस आलेल्या लक्षणांवर लाक्षणिक उपाययोजना करतात.
- गंभीर अवस्थेत रुग्णाला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.
२०१९-२०२० वूहान कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक
२०१९मध्ये कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार चीनमधील वूहान शहरात आढळून आला. याला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. सुरुवातीस वुहान व आसपासच्या प्रदेशात पसरलेला हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्रतेचा असून याने रोग्यांच्या मरण्याचे प्रमाण मोठे आहे.
१३ मार्च २०२०अखेर जगात १,३२,७५८ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ४९५५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२२ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. चीनमधील हूबै प्रांतात या आजारामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. हूबै प्रांतातील वूहान शहरातून या विषाणूची लागण सुरू झाली. या आजारामुळे चीन देशात १३ मार्च २०२० अखेर ३१८० जणांचा बळी गेला असून ८० हजार ९९१ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती जारी केली आहे.[१६]
६ एप्रिल २०२०अखेर जगात एकूण १२,१०,९५६ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ६७,५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी युरोपीय देशांत ४९,४७९ तर अमेरिकेत ९,६८० मृत्यू झाले आहेत.[१७]
करोना व्हायरस आणि इतर रोग-तुलना
लक्षण | करोना | नेहमीचे सर्दी-पडसे | फ्ल्यू | ॲलर्जी |
---|---|---|---|---|
ताप | नक्की | क्वचित | नक्की | कधीकधी |
कोरडा खोकला | नक्की | अगदी कमी | नक्की | कधीकधी |
श्वसनास त्रास | नक्की | नाही | नाही | नक्की |
डोकेदुखी | कधीकधी | क्वचित | नक्की | कधीकधी |
वेदना | कधीकधी | नक्की | नक्की | नाही |
घशाला सूज | कधीकधी | नक्की | नक्की | नाही |
थकाव | कधीकधी | कधीकधी | नक्की | कधीकधी |
अतिसार | क्वचित | नाही | कधीकधी | नाही |
नाक वाहणे | क्वचित | नक्की | कधीकधी | नक्की |
शिंका | नाही | नक्की | नाही | नक्की |
भारतामध्ये कोरोना व्हायरस
दिनांक २८ मार्च २०२०पर्यंत भारतातील कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा ९१८ इतका आहे.[१८] भारतात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
६ एप्रिल २०२०अखेर भारतात कोरोना रोगाच्या रुग्णांचा आकडा ४,०६७ इतका आहे. भारतात एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला.[१९]
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस
महाराष्ट्रामध्ये दिनांक २८ मार्च २०२० पर्यंत १८१ कोरोना रुग्ण आढळले. महाराष्ट्रामध्ये दिनांक २३ मार्च २०२०पर्यंत ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.[२०] महाराष्ट्रातील इतिहासात अत्यावश्यक सेवा व सामग्री सोडून प्रथमच सर्व महत्त्वाच्या संस्था व देवस्थाने बंद ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्यात १५ जून २०२०पर्यंत १,१०,७४४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ४,१२८ जणांचा मृत्यू झाला आणि ५६,०४९जण पूर्ण बरे झाले.[२१]
कोरोनाची बाधा ओळखायची टेस्ट
RTPCR = Reverse-transcriptase Polymerase chain reaction (PCR)
कोरोना व्हायरसपासून (COVID-19) कशी काळजी घ्यायची
- स्वच्छ हात धुणे.
पाणी आणि साबणाने ४० सेकंद हात धुणे. जर एखादा अल्कोहोल असणारे हॅंड वाॅश वापरत असेल तर २० सेकंद पुरेसे आहेत. जर त्याचा हात अस्वच्छ असेल किंवा मातीमुळे खराब झाला असेल तर साबण आणि पाण्याचाच वापर केला पाहिजे.
- हातरुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे.
खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवणे. रुमाल नसेल तर टिश्यू पेपरचा वापर करावा, अन्यथा हाताच्या कोपराने तोंड झाकावे. टिश्यू पेपरचा वापर केल्यावर तो तात्काळ बंद कचरापेटीत फेकून देणे.
- तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका.
कोरोना वायरस लोकांच्या थुंकीतून एखाद्या पृष्ठभागावर पडू शकतो. नकळत एखाद्याचा हात त्या पृष्ठभागाला लागू शकतो. त्यामुळे तोंड, नाक चेहरा, डोळे यांना स्पर्श करणे अनुचित.
- कमीत कमी तीन फुटाचे अंतर व मुखपट्टीचा (मास्कचा) वापर.
समोरच्या व्यक्ती सोबत बोलत असताना त्याच्यापासून कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवा. (या अंतराला सोशल डिस्टन्सिंग म्हणतात.)
- आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश.
कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणं अत्यंत गरजेचे आहे.यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. [२२]
'व्हायरस' हा मध्यवर्ती विषय असलेले इंग्रजी चित्रपट
- The Andromeda Strain (१९७१). (Michael Crichtonच्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट)
- Carriers (२००९)
- Contagion (२०११)
- The Flu (२०१३) : H5N1 या विषाणूवरील साऊथ कोरियन चित्रपट
- The Happening (२००८)
- I am Legend (२००७)
- Outbreak (१९९५)
- Pandemic (२०१६)
- 12 Monkeys (१९९५)
कोरोना व्हायरसचा उल्लेख असलेले पुस्तक
- १८८१ साली प्रकाशित झालेल्या 'The Eyes of Darkness' या Dean Koontz[२३] लिखित कादंबरीत वूहान-४०० या विषाणूची कल्पना मांडली आहे. पण यात या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे व लक्षणांचे वर्णन कोरोनापेक्षा पूर्ण वेगळे आहे. समाजमाध्यमांवर मात्र या उल्लेखाचा दुरुपयोग करून 'चीन हा देश कोरोना व्हायरस हे जैविक हत्यार म्हणून वापरण्यासाठी विकसित करत आहे' अशी खोटी बातमी पसरवली जात आहे.[२४]
'व्हायरस' या विषयावरील कादंबऱ्या
- The Andromeda Strain (Michael Crichton)
- The Scarlet Plague (Jack London)
- The Stand (Stephen King) (या कादंबरीवर १९९४ साली अमेरिकेच्या दूरचित्रवाणीवर मालिका निघाली होती.).
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "Coronavirus Deaths In Maharashtra Now 5,537 With Addition Of Pending Cases". NDTV.com. 17 जून 2020 रोजी पाहिले.
- ^ "Murine coronavirus". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-04-05.
- ^ "Murine coronavirus". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-04-05.
- ^ "Murine coronavirus". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-04-05.
- ^ Fehr, Anthony R.; Perlman, Stanley (2015). "Coronaviruses: An Overview of Their Replication and Pathogenesis". Methods in molecular biology (Clifton, N.J.). 1282: 1–23. doi:10.1007/978-1-4939-2438-7_1.
- ^ Wang C, Horby PW, Hayden FG, Gao GF (February 2020). "A novel coronavirus outbreak of global health concern". Lancet. 395 (10223): 470–473. doi:10.1016/S0140-6736(20)30185-9. PMID 31986257.
- ^ Lau EH, Hsiung CA, Cowling BJ, Chen CH, Ho LM, Tsang T, et al. (March 2010). "A comparative epidemiologic analysis of SARS in Hong Kong, Beijing and Taiwan". BMC Infectious Diseases. 10: 50. doi:10.1186/1471-2334-10-50. PMC 2846944. PMID 20205928.
- ^ a b "Old age, sepsis tied to poor COVID-19 outcomes, death". CIDRAP, University of Minnesota. 29 March 2020 रोजी पाहिले.
- ^ Karlberg J, Chong DS, Lai WY (February 2004). "Do men have a higher case fatality rate of severe acute respiratory syndrome than women do?". American Journal of Epidemiology. 159 (3): 229–31. doi:10.1093/aje/kwh056. PMID 14742282.
- ^ a b "Summary of probable SARS cases with onset of illness from 1 November 2002 to 31 July 2003". World Health Organization. April 2004.
- ^ a b c "COVID-19 Dashboard by the Center for Systems Science and Engineering (CSSE) at Johns Hopkins University (JHU)". ArcGIS. Johns Hopkins University. 28 June 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c d e "Report of the WHO-China Joint Mission on Coronavirus Disease 2019 (COVID-19)" (PDF). World Health Organization. February 2020.
- ^ Oh MD, Park WB, Park SW, Choe PG, Bang JH, Song KH, et al. (March 2018). "Middle East respiratory syndrome: what we learned from the 2015 outbreak in the Republic of Korea". The Korean Journal of Internal Medicine. 33 (2): 233–246. doi:10.3904/kjim.2018.031. PMC 5840604. PMID 29506344.
- ^ Ñamendys-Silva SA (March 2020). "Respiratory support for patients with COVID-19 infection". The Lancet. Respiratory Medicine. doi:10.1016/S2213-2600(20)30110-7. PMID 32145829.
- ^ "Q&A on coronaviruses (COVID-19)". www.who.int (इंग्लिश भाषेत). जागतिक आरोग्य संस्था. 14 मार्च 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ जागतिक आरोग्य संघटना. "Coronavirus disease 2019 (COVID-19) Situation Report – 53" (PDF). World Health Organization. १४ मार्च २०२० रोजी पाहिले.
- ^ "Coronavirus disease 2019 (COVID-19) Situation Report – 77" (PDF). World Health Organization. ७ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
- ^ "Coronavirus India Updates: coronavirus cases in India surpass 900, death toll at 19". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.
- ^ "WHO COVID-19 Dashboard". who.sprinklr.com. 2020-04-07 रोजी पाहिले.
- ^ "Coronavirus cases in India surge to 873, death toll at 19. State-wise tally". Livemint (इंग्लिश भाषेत). 28 मार्च 2020 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Coronavirus Deaths In Maharashtra Now 5,537 With Addition Of Pending Cases". NDTV.com. 17 जून 2020 रोजी पाहिले.
- ^ AuthorGuideMarathi. "कोरोना व्हायरसपासून कशी काळजी घ्यायची? जाणून घ्या". GuideMarathi (इंग्रजी भाषेत). 2020-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-23 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); More than one of|access-date=
and|ॲक्सेसदिनांक=
specified (सहाय्य) - ^ "Title: The Eyes of Darkness". www.isfdb.org. 2020-03-14 रोजी पाहिले.
- ^ "Partly false claim: a 1981 book predicted the coronavirus 2019 outbreak". Reuters (इंग्रजी भाषेत). 2020-03-11. 2020-03-14 रोजी पाहिले.