कामोठे
कामोठे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव व सिडकोने वसवलेला नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. कामोठे शहर सायन-पनवेल महामार्गानजीक पनवेल शहराच्या जवळ वसलेले असून ते प्रामुख्याने निवासी क्षेत्र आहे.
कामोठे | |
भारतामधील शहर | |
कामोठे सेक्टर ३६ |
|
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | रायगड जिल्हा |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:३० |
मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील मानसरोवर रेल्वे स्थानक कामोठ्यामध्येच स्थित आहे. तसेच वाहतूकीसाठी बेस्ट व एन.एम.एम.टी. ह्या बस सेवांचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.