ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर २०२४ मध्ये स्कॉटलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाशी खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा करणार आहे.[] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) सामने खेळविले जातील.[] दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका असेल.[] ऑस्ट्रेलियाने याआधी २०१३ मध्ये स्कॉटलंडचा दौरा केला होता.[]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२४
स्कॉटलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ४ – ७ सप्टेंबर २०२४
संघनायक रिची बेरिंग्टन मिचेल मार्श
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रँडन मॅकमुलेन (१३४) जॉश इंग्लिस (१३०)
सर्वाधिक बळी ब्रॅड करी (५) शॉन ॲबॉट (६)
कॅमेरॉन ग्रीन (६)
  स्कॉटलंड[]   ऑस्ट्रेलिया[]

१५ ऑगस्ट २०२४ रोजी, स्पेन्सर जॉन्सनला स्नायूंच्या-ताणामुळे संघाबाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी शॉन ॲबॉटची निवड करण्यात आली.[] २४ ऑगस्ट २०२४ रोजी, जॉश हेझलवूडला पोटरीच्या ताणामुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[]रायली मेरेडिथला त्याच्या जागी नियुक्त करण्यात आले.[] ६ सप्टेंबर २०२४ रोजी, नेथन एलिसला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

संपादन

१ला टी२० सामना

संपादन
४ सप्टेंबर २०२४
१४:००
धावफलक
स्कॉटलंड  
१५४/९ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५६/३ (२० षटके)
जॉर्ज मुन्से २८ (१६)
शॉन ॲबॉट ३/३९ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी विजयी
द ग्रेंज क्लब, एडिनबरा
पंच: इयान मॅकडोनाल्ड (स्कॉ) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: ट्रॅव्हिस हेड (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • चार्ली कॅसल, जॅस्पर डेव्हिडसन (स्कॉ) आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑ) यांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
  • ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पॉवरप्लेमध्ये ११३ धावा करून सर्वाधिक धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा १०२ धावांचा विक्रम मोडला.[१०][११]

२रा टी२० सामना

संपादन
६ सप्टेंबर २०२४
१४:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९६/४ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१२५ (१६.४ षटके)
जॉश इंग्लिस १०३ (४९)
ब्रॅड करी ३/३७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७० धावांनी विजयी
द ग्रेंज क्लब, एडिनबरा
पंच: इयान मॅकडोनाल्ड (स्कॉ) आणि रायन मिल्ने (स्कॉ)
सामनावीर: जॉश इंग्लिस (ऑ)
  • स्कॉटलँडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जॉश इंग्लिस ४३ चेंडूंतील शतक हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद शतक होते[१२]

३रा टी२० सामना

संपादन
७ सप्टेंबर २०२४
१४:००
धावफलक
स्कॉटलंड  
१४९/९ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५३/४ (२० षटके)
कॅमेरॉन ग्रीन ६२* (३९)
ब्रॅड करी २/२० (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
द ग्रेंज क्लब, एडिनबरा
पंच: डेव्हिड मॅकलीन (स्कॉ) आणि रायन मिल्ने (स्कॉ)
सामनावीर: कॅमेरॉन ग्रीन (ऑ)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कूपर कॉनोलीचे (ऑ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
  • ट्रॅव्हिस हेड (ऑ) ने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १००० धावा पूर्ण केल्या.[१३]

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "११ वर्षांनंतर पहिल्यांदाच द्विपक्षीय पुरुष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया स्कॉटलंडचा दौरा करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "सप्टेंबरमध्ये पुरुषांच्या टी२० मालिकेत स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे". क्रिकेट स्कॉटलंड (इंग्रजी भाषेत). १४ जून २०२४. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "सप्टेंबरमध्ये ऐतिहासिक टी२० दौऱ्यासाठी स्कॉटलंड ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "११ वर्षांनंतर स्कॉटलंड आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार". टाइम्स ऑफ स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  5. ^ "ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी स्कॉटलंडचा पुरुष संघ जाहीर". क्रिकेट स्कॉटलंड. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "कॉनोलीचा नव्या वेशातील ऑसी संघात प्रवेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "स्पेन्सर जॉन्सन यूके दौऱ्यातून बाहेर पडला, शॉन ॲबॉटला बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "हेझलवूड पोटरीच्या ताणाने स्कॉटलंड टी२० मधून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "हेझलवूडच्या दुखापतीनंतर मेरीडिथ आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी सज्ज आहे". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "ऑस्ट्रेलियाने रचल्या आंतरराष्ट्रीय टी२० इतिहासातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा". न्यूज १८. १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "ट्रॅव्हिसच्या २५ चेंडूतील ८० धावांच्या खेळीमुळे स्कॉटलंडची धूळदाण". ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  12. ^ "जॉश इंग्लिस ४३ चेंडूंत शतकाने मिळवून दिला, ऑस्ट्रेलियाला मालिका विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ सप्टेंबर २०२४. १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
  13. ^ "ट्रॅव्हिस हेड आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन". क्रिकेट.कॉम. १२ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन