ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.
कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .