ऑपेरा

(ऑपेरा संगीत या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑपेरा (Opera) हे प्रामुख्याने एक संगीत नाटक असते ज्यामध्ये एक किंवा अनेक गायकसंगीतकार रंगमंचावर संवाद व संगीताने रचलेली एक कथा सादर करतात. ऑपेरामध्ये पारंपारिक नाटकाचे अभिनय, पार्श्वभूमीवरील देखावे, रंगभूषा, नृत्य इत्यादी अनेक घटक वापरले जातात. ऑपेराचे प्रयोग साधारणपणे ऑपेरागृहांमध्ये (Opera house) भरवले जातात. ऑपेरा हा पश्चिमात्य संस्कृतीमधील शास्त्रीय संगीताचा एक भाग मानला जातो.

पॅरिस ऑपेराचे प्रयोग भरवण्यासाठी वापरले जाणारे पॅरिसमधील पाले गानिये हे जगातील सर्वात प्रसिद्ध ऑपेरागृहांपैकी एक आहे.
सिडनी येथील ऑपेरागृह

१६व्या शतकाच्या अखेरीस ऑपेराचा इटलीमध्ये उगम झाला. जगातील पहिला ऑपेराचा प्रयोग फ्लोरेन्स येथे इ.स. १५९८ साली भरवण्यात आला. १७व्या शतकामध्ये ऑपेरा झपाट्याने युरोपभर पसरला व जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड येथे ऑपेराचे अनेक प्रकार निर्माण झाले. जॉर्ज फ्रीडरिक हान्डेलमोझार्ट हे १८व्या शतकामधील सर्वात लोकप्रिय ऑपेरा संगीतकारांपैकी होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्योआकिनो रोसिनी, गाएतानो दॉनिझेत्ती इत्यादी इटालियन ऑपेराकारांनी ऑपेरावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. १९व्या शतकाच्या मध्यकाळात जर्मनीचा रिचर्ड वॅग्नर व इटलीचा ज्युझेप्पे व्हेर्दी हे युरोपातील सर्वात लोकप्रिय ऑपेरानिर्माते होते. प्यॉतर इल्यिच चैकोव्स्की हा १९व्या शतकातील एक लोकप्रिय रशियन ऑपेराकार होता. एक्तॉर बर्लियोझने फ्रेंच भाषेमध्ये अनेक ऑपेरा लिहिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ज्याकोमो पुचिनीने ऑपेराची लोकप्रियता वाढवली.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत