आँग सान सू क्यी
आँग सान सू क्यी (जन्म जून १९ १९४५, रंगून - हयात) ह्या म्यानमार देशाच्या निर्वाचित पंतप्रधान, नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या अध्यक्षा व बर्मामधील लोकशाहीवादी चळवळीच्या कार्यरत नेत्या आहेत. त्यांनी आपल्या देशात लोकशाहीव्यवस्था आणण्यासाठी लष्करी राजवटीविरुद्ध सुमारे 25 वर्षे संघर्ष केला. म्यानमारच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी ९ जून २०१२ रोजी पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवले.
Former State Counsellor of Myanmar and Leader of the National League for Democracy | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Aung San Suu Kyi |
---|---|
जन्म तारीख | जून १९, इ.स. १९४५ यांगून |
नागरिकत्व | |
निवासस्थान |
|
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
नियोक्ता | |
सदस्यता |
|
राजकीय पक्षाचा सभासद |
|
पद |
|
मातृभाषा | |
वडील |
|
आई |
|
भावंडे |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
लष्करी राजवटीविरुद्ध केलेल्या आंदोलनामुळे स्यू की यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली. ब्रम्हदेशाचा लष्कर प्रमुख ने विन याने त्यांना तीन वेळा स्थानबद्धतेमध्ये ठेवले होते. सू क्यी ह्यांना १९९१ साली नोबेल शांतता पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांना १९९२ साली भारत सरकारने त्यांनी म्यानमारमधील लष्करी जुलूमशाही राजवटीविरुद्ध चालवलेल्या अहिंसा चळवळीसाठी त्यांना जवाहरलाल नेहरु शांतता पुरस्कार देऊन गौरवले.
त्यांचे नाव तीन वेगवेगळ्या नावांच्या आधारावर आहे, आँग सान हे वडिलांकडून, क्यी हे आईकडून तर सू हे आजीच्या नावातून आले आहे. त्यांच्या पतीचे नांव मायकेल असून मुलांचे नांव अलेक्झांडर आणि किम असे आहे.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
जीवन
संपादनआँग सान सूकी यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजात झाले होते. या महाविद्यालयास त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि आस्थेने भेट दिली. तेथील वातावरण आणि गतकालीन आठवणींनी त्यांना गहिवरून आले होते. आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो. किंबहुना भारतीय नागरिक असल्याचा भास होतो असे त्यांनी आदरपर्वूक नमूद केले. भारताशी आपले नाते हे केवळ बौद्धिक नाही तर मानसिक आहे. या मैत्रीचा गहिरा रंग त्यांनी हळुवारपणे रेखाटला. आपल्या इच्छा वा महत्त्वाकांक्षा या चूक नाहीत, हे श्रीराम कॉलेजने शिकविले लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रदीर्घ संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांना श्रीराम महाविद्यालयाने दिली. ही त्यांची मते प्रेरक आणिा स्फूर्तीदायक वाटतात. आपल्या छोटेखानी पण प्रभावशाली अशा भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींशी चांगलीच जवळीक साधली व त्यांची मने जिंकून घेतली, हे येथे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे. एखादा राजकीय नेता आपल्या संस्थात्मक स्नेह भावाच्या आधारे लोकजीवनाशी किती जवळचे संपादन करु शकतो, हे त्यांनी विचारपूर्वक आणि कृतीतूनही दाखवून दिले त्यामुळे त्यांच्या नेहरु स्मृती व्याख्यानापेक्षाही त्यांची ही लेडी श्रीराम कॉलेजची भेट महत्त्वाची असल्याचे दिसून येते. बदलाचे वारे दीर्घकाळ नजर कैदेत राहून राजकीय विजनवातातून बाहेर पडल्यांनतर सुकी यांनी एकानंतर एक विक्रम नोंदविले आहेत. त्यांनी 2012 च्या पोटनिवडणुकीत दमदार विजय संपादन केला आणि आता त्यांचा प्रवास राजकीय सत्तेच्या दिशेने झेपावत आहे. त्यांचे समर्थक व अनुयायी हे प्रबळ सत्ताकांक्षेने भारावले आहेत. त्यांच्या नॅशनल डेेमोक्रेटीक लिग या पक्षाला खरोखर उज्वल भविष्यकाळ आहे. सुकी यांच्या भारत भेटीनंतर त्यांचे नैतिक बळ उंचावले आहे. आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आता म्यानमारच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याच्या दृष्टीने वाटचाल आरंभेली आहे.
सुकी यांच्या भारत भेटीनंतर लगेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्यानमारला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी सुकी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आणि त्यांच्या अथक परिश्रमातून प्रदीर्घ अशा लोकशाही प्रस्थापनेचा लढा सफल होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनी म्यानमारवर तेथील लष्करी राजवटीच्या काळात जे जाचक आर्थिक निर्बंध अमेरिकेले लादले होते ते सर्व मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे म्यानमारचा राजकीय व आर्थिक एकाकीपणा संपल्याची सुचिन्हे दिसत आहेत. उदारीकरणाच्या लाटेमध्ये आता जगातील कुठलाही देश बंदिस्त राहून आर्थिक विकास करु शकत नाही, हे कटू सत्य आहे. म्यानमारचे एकाकीपण संपावे तेथील राजकीय लोकशाही सुरळीत व्हावी तसेच सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने दमदार पावले टाकावीत म्हणून सुकी यांनी पुढे यावे आणि त्यांनी नजिकच्या भविष्य काळामध्ये म्यानमारला एक समर्थ आणि बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी कंबर कसावी. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मागास, गरीब आणि एकाकी पडलेल्या म्यानमारला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सुकी यांचे नेतृत्व अधिक पक्षदर्शक आणि तेवढेच फलदायी ठरेल यात शंका नाही तोच त्यांच्या भारत भेटीचा संदेश होय.
इतर
संपादनब्रह्मदेश हा अखंड भारताचा एक भाग होता. ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया एका नव्या वळणावर उभी आहे आणि ब्रह्मदेशातील लोकशाही प्रक्रिया गेली अनेक वर्षे लष्करशाहीच्या प्रभावामुळे कुंठित झाली होती. आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रॅसी या पक्षाने अलीकडे झालेल्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळविला आहे. तथापि लोकशाही प्रक्रियेने त्यांच्याकडे सत्ता कशी सुुपूर्द होईल याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आँग सान सू की यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थिरीकरणासाठी अभूतपूर्व संघर्ष केला आहे. त्यांच्या अखंड संघर्षामुळे म्यानमारला लोकशाहीचे सोनेरी क्षण अनुभवता येत आहेत. गेली अनेक वर्षे त्या लष्करशाहीच्या नजरकैदेत होत्या. त्यांनी म्यानमारमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. अभूतपूर्व संघर्षाची परिणती म्यानमारमध्ये वाहत असलेले बदलाचे वारे खरोखरच स्वागतार्ह आहे. भारताच्या शेजारच्या या छोट्याशा देशाने लोकशाहीच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्या वाटेवरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे म्यानमारमध्ये झालेल्या पोटनिवडणुका होत. या निवडणुकीत आँग सान सू की यांनी अभूतपूर्व विजय मिळविला आहे. या निवडणुकींचा निकाल घोषित झाला असून सू की यांच्या पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या निरीक्षकांनी या निवडणुका योग्य पद्धतीने झाल्या, अशी पावती दिली आहे. म्यानमारमध्ये गेली 50 वर्षे लष्करशाहीचा वरवंटा फिरत होता आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात होती. तेथील अर्थकारण डबघाईला आले आहे. साचेबद्ध राजकीय प्रणालीमुळे सामाजिक व आर्थिक विकास खुंटला आहे आणि संस्थात्मक जीवन संकटात सापडले आहे. अशावेळी सू की यांचा विजय हा खरोखरच अंधारात प्रकाशाचा किरण म्हटला पाहिजे. मागील वर्षापासून म्यानमारमध्ये सत्तांतरणाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. जनरल थॅन श्वेना यांनी आपली सत्तासूत्रे थिएन सिनकडे सोपविली व त्यांनी हळूहळू लोकशाही प्रक्रियेने निवडणुकांचा मार्ग खुला केला. आँग सान सू की यांचा संसदेतील प्रवेश हा निर्णायक ठरणारा आहे. कारण त्यांच्या बुद्धिमत्ता व चातुर्यामुळे त्या लोकशाही प्रक्रियेवर चांगलाच प्रभाव टाकू शकतील. 2015 साली त्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविणार आहेत. त्यांना सध्याचे वातावरण पोषक असून भावी परिवर्तनाच्या दिशेने त्या पावले टाकत आहेत. नाड्या लष्कराच्या हाती आँग सान सू की यांचा पक्ष विजयी झाला असला तरी सत्तेच्या नाड्या अद्यापही लष्कराच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्तांतर सहज घडेल असे वाटत नाही. सू की यांना मागे जसा संघर्ष करावा लागला तसा यापुढेही त्यांना संघर्ष करावा लागणार आहे. कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पूजलेला आहे. त्यांच्या जीवनातील राजकीय लोकशाहीचा प्रदीर्घ लढा अद्यापही संपलेला नाही. जोपर्यंत त्यांच्या हाती म्यानमारच्या संपूर्ण सत्तेची सूत्रे येत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांच्या स्वप्नातील लोकशाही म्यानमार कृतीत येऊ शकणार नाही. कारण सामाजिक, आर्थिक, लोकशाही ही गोरगरिबांना तेव्हाच न्याय देऊ शकते जेव्हा ती मुक्त व निर्भय वातावरणात आशा आकांक्षा व्यक्त करू शकते. लोकशाहीची क्रूर चेष्टा आँग सान सू की यांच्या पक्षाने दोन वेळा विजय मिळविला. 2010 साली त्यांना स्पष्ट बहुमतही मिळाले होते. परंतु लष्करशाहीने लोकशाही पायदळी तुडविली व त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. आता त्यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचा पक्ष हळूहळू बाळसे धरेल आणि आपले स्थान बळकट करेल. लष्करशाहीची ही दुहेरी चाल आहे. ऑग सान सू की यांना नजरकैदेत ठेवण्याऐवजी त्यांना संसदेत पाठविण्याचा उमाळा लष्करशाहीला का आला त्याचे कारण असे की, पाश्चिमात्य राष्ट्रांनी ब्रह्मदेशावर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. ते त्यांना सैल करून घ्यावयाचे आहेत म्हणून त्यांनी हा सगळा लोकशाहीचा देखावा मांडला आहे, अशी टीका केली जात आहे. या निवडणुकीत 60 लाख मतदार होते. 17 राजकीय पक्ष आणि 157 उमेदवार रिंगणात होते. आँग सान सू की यांच्या पक्षाने 44 जागा जिंकल्या आणि लोकशाही प्रक्रियेत एक मैलाचा दगड गाठला. त्यांनी आपल्या भाषणात ब्रह्मदेशात नवे लोकशाही युग अवतरले आहे व हा जनतेचा विजय आहे. यापुढे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या विजयामुळे पाश्चिमात्य देशांचा ब्रह्मदेशकडे बघण्याचा कल बदलणार आहे आणि एक लोकशाही राष्ट्र या नात्याने त्याची प्रतिमा उजळ होणार आहे. समारोप ऑक्सफोर्ड विद्यापीठातील नामांकित विद्वान डॉ. एरिस यांच्याशी आँग सू की यांनी विवाह केला होता. गेले 20 वर्षे त्या नजरकैदेत आहेत. पण तरीही लोकांच्या हृदयात त्यांनी आपले स्थान कोरले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी झुंजारपणे वाटचाल केली आहे. आँग सान सू की यांच्या पक्षाने मिळविलेला विजय हा पुढील मोठ्या यशाची चाहूल देणारा आहे. संसदेत त्यांच्या पक्षाच्या प्रवेशाने बरेच चित्र बदलेल. जनतेच्या अपेक्षांचा प्रतिध्वनी उमटू लागेल आणि राष्ट्र नव्या दिशेने झेपावू लागेल. लष्करशाहीचा दृष्टिकोन बदलत आहे. सू की यांचा पक्ष आता निराशेतून आशेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि 2015 साली त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी होतील, असा त्यांच्या पक्षाला विश्वास वाटतो. गेली 49 वर्षे लष्करशाहीच्या दडपशाहीने विकास खुंटला होता. जनतेचा आवाज दबलेला होता. आता यापुढील काळात खऱ्या अर्थाने परिवर्तनाची पहाट होईल, असा सामान्य जनतेला विश्वास वाटतो. सू की यांच्या विजयाने आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे पाश्चिमात्य जगाचे नकारात्मक मत बदलून ते सकारात्मक होईल आणि लोकशाहीच्या दृष्टीने पडत असलेली ही पावले पाहून प्रगत देशातील सत्ताधारी वर्ग म्यानमारवर लादलेले आर्थिक निर्बंध मागे घेईल आणि ब्रह्मदेशाची एका कोपऱ्यात पडलेली अर्थव्यवस्था प्रगतीसाठी मोकळी होईल. तेथील जनता दैन्य, दारिद्र्य आणि गरिबीमुळे पिचली आहे आणि तिला प्रगतीच्या नव्या वाटा यापुढे दिसतील, असा विश्वास वाटतो. आँग सान सू की यांच्या नेतृत्वात जी जादू आहे त्याचा करिश्मा या निवडणुकीने पुन्हा एकदा दाखविला आहे. म्यानमारचे चित्र पुढील काळात झपाट्याने बदलेल असा जगातील विचारवंतांना विश्वास वाटत आहे.
संदर्भ- डॉ.वि.ल.धारूरकर यांचा आनंद नगरी मधील लेख