प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम

प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांतर्फे देण्यात येणारा नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या राष्ट्रीय हित, सुरक्षा, जागतिक शांतता, सांस्कृतिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये मोठी सार्वजनिक अथवा खाजगी कामगिरी करणाऱ्यांस दिला जातो. हा पुरस्कार अमेरिकेच्या नागरिकांपुरता मर्यादित नसून जगातील कोणत्याही व्यक्तीस देता येतो. हा नागरी पुरस्कार असूनही सैनिकी पेशातील व्यक्तींना देता येतो व त्यांना आपल्या गणवेशावर हा लावण्याची मुभा असते.

Presidential Medal of Freedom.svg

अमेरिकेच्या काँग्रेसद्वारे देण्यात येणाऱ्या कॉंग्रेशनल गोल्ड मेडल या पुरस्काराशी समान महत्त्व असणारा हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

जॉन एफ. केनेडी यांनी हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.