एशियाना एरलाइन्स
एशियाना एरलाइन्स (कोरियन: 아시아나항공) ही दक्षिण कोरिया देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी आहे. कोरियन एर खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
| ||||
स्थापना | १७ फेब्रुवारी १९८८ | |||
---|---|---|---|---|
हब | इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
मुख्य शहरे |
बुसान जेजू | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | एशियाना क्लब | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
उपकंपन्या | एर बुसान | |||
विमान संख्या | ८५ | |||
गंतव्यस्थाने | १०८ | |||
ब्रीदवाक्य | 아름다운 사람들 | |||
मुख्यालय | सोल, दक्षिण कोरिया |
सोल येथे एशियाना एरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. इतर एरलाइन्स सोबतच ही एरलाइन्स स्वदेशात १४ ठिकाणी आणि परदेशात ९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.[१] डिसेंबर २०१४पर्यंत या एरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या १०१८३ होती. एशियाना एरलाइन्स ही एर बुसानची सर्वात मोठी भागीदार आहे. एर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप २०१५ला स्पॉन्सर करते.
इतिहास
संपादनएशियाना एरलाइन्सची स्थापना १७ फेब्रुवारी १९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एर सन १९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰[२] हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एर लाइन्सची स्थापना १७ फेब्रुवरी १९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर १९८८ मध्ये बूसान पर्यंत विमान उड्डाणाने सुरुवात झाली.सन २००७ पर्यंत कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (३०.५३%), कुम्हो ऊध्योग (२९.५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (१५.०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( ११.०९%), कोरिया डेवलपमेंट बँक ( ७.१८%), इतर %.८३%) असी होती.[३]
नियमित सेवा प्रारंभ
संपादनडिसेंबर १९८८ मध्ये बोईंग ७३७ क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यंत उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला. सन १९८९ मध्ये एशियाना एरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली. सन १९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे ९ बोईंग ७४७-४००s, १० बोईंग ७६७-३००s, ८ बोईंग ७३७-४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एर सेवा सुरू केल्या. सन १९९१ मध्ये एशियनाने बँकॉक,सिंगापूर,हाँग काँग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या. डिसेंबर १९९१ मध्ये बोईंग ७४७-४०० कोंबीचे सहायाने ट्रान्स पॅसिफिक विमान सेवा लॉस एंजिल्स पर्यंत सुरू केली. सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “होची मिनह सिटी” साठी एर सेवा सुरू केली. जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन एशियन एरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एरलाइन काम करू लागली.[४] डिसेंबर १९९९ मध्ये KOSDAGचे यादीत ही समाविष्ट झाली. दि.२८-१-२००३ रोजी ही एर लाइन प्रशिद्धी प्राप्त एर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपऱ्यात जाले पसरविले. सन २००४मध्ये या एरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायनाच्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एर लाइन्स २३ देश्यातील ९१ मार्गावर ७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात १२ शहरांना १४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय १४देशयात २९ शहरात २८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन २०१२ मध्ये एशियाना एर लाइन्सचे उत्पन्न US$५.३ बिलियन होते.
कंपनीची नवीन ओळख
संपादनफेब्रुवरी २००६ मध्ये एशियाना एर लाइन कंपनीने कुमहो एशियाना ग्रुप सारख्या इतर पेरेंट कंपन्याशी एकसुत्रता राखण्याच्या दृष्टीने स्वताहाचा चेहरा परिवर्तन केले. प्रथम वर्ग,व्यवसाय वर्ग,किफाइति वर्ग असे जे प्रवासाचे वर्ग होते त्यात बदल करून त्याला प्रथम, व्यवसाय,प्रवास वर्ग असे अनुक्रमे नामकरण बदल केले. त्या अनुक्रमाणेच त्या वर्गांना पिवळा,नीला,तांबडा रंग दिले. सर्व विमान सेवकांना नवीन पोशाख दिले.
भविष्यकालीन विकास
संपादनएशियाना एर लाइन्सने सन २००० पासून कंपनीचे परिवर्तनाकडे तसेच ज्यासटीत ज्यास्त सेवा देणेकडे लक्ष केन्द्रित केले होते. असियनाची सन २०१३ पर्यंत प्रतेक आठवड्यास ९० (४५ एऊन-जाऊन) प्रवाशी विमाने धावत होती. असियनाची सध्याची ८३ विमानांची असणारी सेवा वाढवून ती मे २०१४मध्ये प्राप्त होणाऱ्या एर बस A३८० चे सहाय्याने ८५ करण्याची योजना होती. विमान सेवेतील कर्मचारी वर्गाला विस्वासात घेऊन सुरक्षा व्यवस्था सुधारण्याचा मानस होता.
लक्षणीय यश
संपादन. १९९० चे मध्यंतरी एर कं.ने प्रदूषण विरहित सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आणि इकडे लक्ष केन्द्रित केले. त्यासंबंधाने सन १९९५ मध्ये विमानातील धूम्रपान, सिगारेट विक्री बंद केली. . ISOचे नियमावलीतील कसोटीस एशियाना पात्र ठरली आणि असियनांला सन १९९६ मध्ये प्रथम वर्ग सर्टिफिकेशन ISO १४००१ आवार्ड दिला. सन २००१ मध्ये प्रदूषण मंत्रालयाने एशियाना एर लाइन्सला ‘ विमान सेवा व्यवसायात मित्रत्व जपणारी, प्रदूषण मुक्त करणारी’ पहिती विमान कंपनी म्हणून गौरव केला. प्रदूषण मुक्त वातावरण असावे असे वाटणाऱ्या इतर विमान कंपन्यांनी याची दाखल घेतली आणि प्रदूषण कमी कसे करता येईल याची माहिती मिळवून या उपक्रमात सामील होणाराणा आधारभूत सुविधा प्राप्त करून देणेची तसेच सहभागी करून तेथेच सेवा देणेची कार्यवाही केली. १७-२-२००९ रोजी AIR TRANSPORT WORLD (ATW) ने एशियाना कंपनीला “ एरलाइन ऑफ द एर “ आवार्ड दिला की जो एर लाइन उध्योगात अतीशय मानाचा मानला जातो. सन २०१० चे जागतिक विमान सेवा अवॉर्ड मध्ये SKYTRAX ने मे २०१० मध्ये एशियाना विमान कंपनीला जगातील “उत्कृष्ट विमान कंपनी “ हा किताब बहाल केला. सन २०११ आणि २०१२ सालात कतार विमान कंपनी नंतर एशियाना विमान कंपनीने जगात दुसरे स्थान प्राप्त केले होते.
सारांश
संपादनअसियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही. जुलै २०१३ मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे. कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे २०१४मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.
कायदेशीर भागीदारी करार
संपादनएशियाना एर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल २०१४मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे. एर अस्ताना, एर बूसान,( सहाय्यक), एर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एर लाइन्स , एटीहाड एर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S७ एरलाइन्स, शांडोंग एरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.
विमानातील सेवा
संपादनएशियाना एरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात[५]. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते. फर्स्ट सूट वर्ग [६] आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणाऱ्या विमानातच आहेत.[७]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "आशिया प्यासिफिक एर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऐण्ड पॉलिसी रेफॉरमस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "डिरेक्टरी:वर्ल्ड एरलाइन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ १९९९~१९९4 "हिस्टरी/इनट्रोडकशन अँड हिस्टरी/अबाऊट अस/एसियाना" Check
|दुवा=
value (सहाय्य) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा] - ^ "एशियाना विमानातील सेवा" (इंग्लिश भाषेत). 2017-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "फर्स्टक्लास/क्लासेस ऑफ सर्विस/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एरलाइन्स" (इंग्लिश भाषेत). 2013-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "फ्लाइटस बाय रुट टायप/स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एरलाइन्स" (इंग्लिश भाषेत). 2013-10-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-07-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |