एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)

(एम्. चिन्नास्वामी मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता[२] असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम वर्गीय क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
ಎಂ.ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
मैदान माहिती
स्थान बंगळूर, कर्नाटक
स्थापना १९६९
आसनक्षमता ३८,३००[१]
मालक कर्नाटक राज्य सरकार
प्रचालक कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
यजमान कर्नाटक क्रिकेट संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २२-२७ नोव्हेंबर १९७४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा. ४-८ मार्च २०१७:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. २६ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. २ नोव्हेंबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० २५ डिसेंबर २०१२:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम २०-२० १ फेब्रुवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास आणि विकास संपादन

कर्नाटक सरकारच्या पुढाकाराने मैदानाची कोनशीला १९६९ मध्ये बसविण्यात आली आणि १९७० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. १९७२-७३ च्या मोसमात मैदान प्रथम प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले गेले. आणि वेस्ट इंडीच्या १९७४-७५ मोसमातील दौऱ्यावेळी मैदानाला कसोटी दर्जा मिळाला.

मैदानावर पहिली कसोटी २२ ते २९ नोव्हेंबर १९७४ दरम्यान खेळवली गेली. योगायोगाने, ही वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज यांची पदार्पणाची कसोटी होती. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा २५६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी विजय ह्याच मैदानावर १९७६-७७ च्या मोसमात टोनी ग्रेगचा इंग्लिश संघाविरुद्ध नोंदवला. मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ सप्टेंबर १९८२ रोजी खेळवला गेला. भारताने ह्या सामन्यान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

ह्या मैदानावर १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा प्रकाश दिवे लावले गेले. प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यानचा उपांत्यपूर्व सामना. ९ मार्च १९९६ रोजी खेळवल्या गेलेल्या ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३९ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. २००७ मध्ये, भारत आणि पाकिस्तान दरम्यान भारताची अवस्था ६१/४ अशी दयनीय झालेली असताना सौरव गांगुली आणि युवराज सिंगने ३०० धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडीत काढले. दिवसाच्या शेवटी भारताची धावसंख्या ३६५/५ अशी होती, की पूर्ण भारतात पहिल्या दिवसाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्या मैदानावरील ही सर्वोच्च भागीदारी आहे. ह्या मैदानावरील, सौरव गांगुलीच्या २३९ धावा ही डावखोऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सन २००० मध्ये बीसीसीआयने बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे केंद्र घोषित केल्यानंतर, ह्या मैदानावरील ह्या अकादमीमधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. मिस वर्ल्ड १९९६ कार्यक्रम ह्याच मैदानावर पार पडला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मैदानाची क्षमता ७०,००० पर्यंत वाढविण्याचे नियोजित केले आहे. त्याशिवाय ७० ते ८० हजार आसनक्षमतेचे आणखी एक क्रिकेट मैदान तयार करण्याचे सुद्धा ठरवले आहे. परंतू, आजपर्यंत ह्यापैकी कोणतीही योजना आजवर अंमलात आली नाही. बंगळूर फ्रँचायझी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हे होम ग्राउंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याला कर्नाटकचे निशाण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लाल आणि पिवळ्या रंगात रंगविले गेले.

चिन्नास्वामी मैदानाचे प्रकाशझोतातील विहंगम दृश्य.

आकडेवारी आणि विक्रम संपादन

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्या   भारत ६२६ वि पाकिस्तान   भारत ३८३/६ वि ऑस्ट्रेलिया   भारत २०२/६ वि इंग्लंड
सर्वात लहान धावसंख्या   भारत २१४ वि पाकिस्तान   भारत १६६/४ वि इंग्लंड   श्रीलंका १२२/९ वि वेस्ट इंडीज
सर्वोत्कृष्ट फलंदाजी   युनिस खान २६७ वि भारत   रोहित शर्मा २०९ वि ऑस्ट्रेलिया   आंद्रे फ्लेचर ८४* वि श्रीलंका
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी   हरभजन सिंग ११/२२४ वि ऑस्ट्रेलिया   युवराजसिंग ५/३१ वि आयर्लंड   युझवेंद्र चहल ६/२५
सर्वात मोठी भागीदारी   युनिस खानइंझमाम उल हक ३२४ वि भारत   शेन वॉटसनब्रॅड हॅडिन १८३ वि कॅनडा   मोहम्मद हफीझशोएब मलिक १०६ वि भारत
सर्वाधिक धावा   सचिन तेंडूलकर ८६९   सचिन तेंडूलकर ५३४   सुरेश रैना १०३
सर्वाधिक बळी   अनिल कुंबळे ४१   झहीर खान १४   युझवेंद्र चहल

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी संपादन

कसोटी संपादन

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२२-२७ नोव्हेंबर १९७४   भारत   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज २६७ धावा धावफलक
२८ जानेवारी-२ फेब्रुवारी , १९७७   भारत   इंग्लंड   भारत १४० धावा धावफलक
१५-२० डिसेंबर, १९७८   भारत   वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक
१९-२४ सप्टेंबर, १९७९   भारत   ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
२१-२६ नोव्हेंबर, १९७९   भारत   पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१४ डिसेंबर, १९८१   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
१४-१९ सप्टेंबर, १९८३   भारत   पाकिस्तान अनिर्णित धावफलक
१३-१७ मार्च, १९८७   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान १६ धावा धावफलक
१२-१७ नोव्हेंबर, १९८८   भारत   न्यूझीलंड   भारत १७२ धावा धावफलक
२६-३० जानेवारी, १९९४   भारत   श्रीलंका   भारत डाव आणि ९५ धावा धावफलक
१८-२० ऑक्टोबर, १९९५   भारत   न्यूझीलंड   भारत ८ गडी धावफलक
२५-२८ मार्च, १९९८   भारत   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया ८ गडी धावफलक
२-६ मार्च, २०००   भारत   दक्षिण आफ्रिका   दक्षिण आफ्रिका डाव आणि ७१ धावा धावफलक
१९-२३ डिसेंबर, २००१   भारत   इंग्लंड अनिर्णित धावफलक
६-१० ऑक्टोबर, २००४   भारत   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया २१७ धावा धावफलक
२४-२८ मार्च, २००५   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान १६८ धावा धावफलक
८-१२ डिसेंबर, २००७   भारत   पाकिस्तान अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २००८   भारत   ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २०१०   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ७ गडी धावफलक
३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर, २०१२   भारत   न्यूझीलंड   भारत ५ गडी धावफलक
१४-१८ नोव्हेंबर, २०१५   भारत   दक्षिण आफ्रिका अनिर्णित धावफलक
४-८ मार्च, २०१७   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ७५ धावा धावफलक

एकदिवसीय संपादन

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२६ सप्टेंबर १९८२   भारत   श्रीलंका   भारत ६ गडी धावफलक
२० जानेवारी १९८५   भारत   इंग्लंड   इंग्लंड ३ गडी धावफलक
१४ ऑक्टोबर १९८७   भारत   न्यूझीलंड   भारत १६ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर १९८९   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ३ गडी धावफलक
२६ फेब्रुवारी १९९३   भारत   इंग्लंड   इंग्लंड ४८ धावा धावफलक
१० नोव्हेंबर १९९३   दक्षिण आफ्रिका   झिम्बाब्वे no result धावफलक
०९ मार्च १९९६   भारत   पाकिस्तान   भारत ३९ धावा धावफलक
२१ ऑक्टोबर १९९६   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत २ गडी धावफलक
१४ मे १९९७   भारत   न्यूझीलंड   भारत ८ गडी धावफलक
२० मे १९९८   भारत   केन्या   भारत ४ गडी धावफलक
०४ एप्रिल १९९९   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान १२३ धावा धावफलक
२५ मार्च २००१   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ६० धावा धावफलक
१२ नोव्हेंबर २००३   भारत   ऑस्ट्रेलिया   ऑस्ट्रेलिया ६१ धावा धावफलक
१९ नोव्हेंबर २००५   भारत   दक्षिण आफ्रिका   भारत ६ गडी धावफलक
०६ जून २००७ आफ्रिका XI आशिया XI आशिया XI ३४ धावा धावफलक
२९ सप्टेंबर २००७   भारत   ऑस्ट्रेलिया no result धावफलक
२३ नोव्हेंबर २००८   भारत   इंग्लंड   भारत १९ धावा धावफलक
०७ डिसेंबर २०१०   भारत   न्यूझीलंड   भारत ५ गडी धावफलक
२७ फेब्रुवारी २०११   भारत   इंग्लंड बरोबरी धावफलक
०२ मार्च २०११   इंग्लंड   आयर्लंड   आयर्लंड ३ गडी धावफलक
०६ मार्च २०११   भारत   आयर्लंड   भारत ५ गडी धावफलक
१३ मार्च २०११   ऑस्ट्रेलिया   केन्या   ऑस्ट्रेलिया ६० धावा धावफलक
१६ मार्च २०११   ऑस्ट्रेलिया   कॅनडा   ऑस्ट्रेलिया ७ गडी धावफलक
०२ नोव्हेंबर २०१३   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ५७ धावा धावफलक

टी२० संपादन

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२५ डिसेंबर २०१२   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान ५ गडी धावफलक
२० मार्च २०१६   श्रीलंका   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक
२१ मार्च २०१६   ऑस्ट्रेलिया   बांगलादेश   ऑस्ट्रेलिया ३ गडी धावफलक
२३ मार्च २०१६   भारत   बांगलादेश   भारत १ धाव धावफलक
०१ फेब्रुवारी २०१७   भारत   इंग्लंड   भारत ७५ धावा धावफलक

प्रतिमासंग्रह संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "एम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआय". http://www.bcci.tv/venues/4/m-chinnaswamy-stadium (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-06-18. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "महान भारतीय गोलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन